प्रत्येक स्त्रीला मी खूप सुंदर दिसावं असं वाटतं असतं. त्यासाठी अनेक महिला वेगवेगळी आणि महागडी सौदर्य प्रसादन देखील वापरतात. अशात जेवढी महागडी नोकरी आणि मोठी पोस्ट तेवढा जास्त मेकअप अस काहीस चित्र तुम्ही देखील अनेकदा पाहिलं असेल. आता यावरून एखादी जिल्हाधिकारी महिला किती मेकअप करत असेल बर? असा प्रश्न विचारला तर तुमच्यातील अनेक जण खूप जास्त किंवा नॉर्मल थोडा फार असं म्हणतील. मात्र काहीच मेकअप करत नसेल असं कुणीच उत्तर देणार नाही. पण राणी सुईमुई या जिल्हाधिकारी असून चेहऱ्याला मेकअप तर सोडाच साधी पावडर देखील लावत नाहीत. आणि त्यांनी असं वागण्या मागचं करण ऐकून हा लेख वाचत असलेल्या अनेक महिलांना मेकअपची किळस येईल.

राणी सुइमुइ ( शीना मोल) या मलकपुरच्या जिल्हाधिकारी आहेत. त्यांनी नुकतीच एका महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. सुरुवातीला जिल्हाधिकारी बाईंनी इंग्रजी भाषेत कमी शब्दात जास्त आणि मार्मिक माहिती दिली. यावेळी त्यांच्या अंगावर घड्याळाशिवय कोणताही दागिना नव्हता. एवढंच काय तर चेहऱ्यावर साधा पावडर देखील लावला नव्हता. भाषण संपल्यावर काही विद्यार्थ्यांनी त्यांना काही प्रश्न विचारले. यातील एक विद्यार्थिनी म्हणाली की, “तुम्ही इथे येताना साधा पावडर देखील का लावला नाहीत.” प्रश्न ऐकताच जिल्हाधिकारी शांत झाल्या आपोआप त्यांच्या चेऱ्यावरच हसू बाजूला झालं आणि कपाळावर घाम फुटला. मात्र मन घट्ट करत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्या म्हणाल्या की,”माझा जन्म झारखंडच्या आदिवासी भागात झाला. जिथे अभ्रकाच्या मोठ्या खाणी आहेत. अशा एका लहानशा झोपडीत मी जन्मले. माझे आई आणि वडील खाण कामगार होते. माझ्या कुटुंबात मी आई बाबा दोन मोठे भाऊ आणि एक बहिण होती.मी ज्या खाणी जवळ राहायचे तिथे अनेक लहान मूल वेगवेगळ्या आजारांनी मृत्यू पावत होती. कारण ती खाण अभ्रकाची होती.

इथे खाणीत अनेक लहान मूल काम करतात. कारण माझ्या गावात लाईट, पाणी आणि शिक्षण अशी कोणतीही सुविधा नाही. दिवसभर खाणीत काम केल्या नंतर एक भाकरी खायला मिळते. खाण अभ्रकची असल्याने येथील जीवघेणे रसायने लहान मुलांच्या आणि मोठ्या व्यक्तींच्या देखील आरोग्यावर परिणाम करतात. याचं घातक रसायनांचा परिणाम माझ्या दोन भावांवर देखील झाला. दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मी माझी बहिण आई बाबा आम्ही चौघे जण राहू लागलो. मी देखील लहान असताना खाणीत काम करत होते. एक दिवस माझी तब्येत ठीक नसल्याने मी झोपडीत आराम करत होते. आई बाबा आणि बहीण खाणीत कामाला गेले होते. त्याचवेळी काळाने आघात केला. आणि खाण कोसळली. या वेळी माझ्या घरातील इतर सर्व सदस्यांना मृत्यूने कवटाळलं.” जिल्हाधिकारी असं म्हणत आहे हे वाचून कदाचीत तुम्हाला वाटत असेल की, या सर्वांचा आणि मेकअपचा काय संबंध. तुमच्या सारखाच प्रश्न त्या महाविद्यालयातील मुलांना देखील पडला होता. त्यावेळी या विषयी माहिती सांगत जिल्हाधिकारी म्हणाल्या की, “प्रत्येक सौंदर्य प्रसादनाच्या प्रोडक्टमध्ये अभ्रक वापरलं जात. अभ्रकाशिवय कोणतही सौंदर्यप्रसाधनाच साधन बनत नाही. प्रत्येक प्रोडक्टमध्ये अभ्रक वापरले जाते. ते अभ्रक जे खाणीतून काढता काढता त्याच्या बरोबर अनेक लहान मुलांचे मास आणि रक्त संडते. ते अभ्रक जे काढता काढता अनेक मुलं मृत्यू पावतात. तर आता ज्याने माझ्या संपूर्ण कुटुंबाचा जीव घेतला त्या पासून बनवलेले पावडर आणि लिपस्टिक मी कशी वापरू.” असं उत्तर जिल्हाधिकारी दिलं. त्यांची ही कहाणी ऐकून आज हा लेख वाचत असलेल्या सर्वच महिलांनी मेकअप करताना थोडा विचार करण गरजेचं आहे.