सुरांच्या मैफिलित गाजलेल्या नावांपैकी एक नाव म्हणजे महेश काळे. महेशने आजवर संगीत विश्वात मोठं नाव कमावलं आहे. त्याची अनेक गाणी ही थेट मनाला स्पर्श करणारी आहेत. अशात त्याच्या यशाबद्दल त्याला कधी विचारले असल्यास तो नेहमी आई बाबांचे नाव पुढे करताना दिसला आहे. मात्र आता त्याने त्याच्या यशाचा खारीचा वाटा त्याच्या आयुष्यातील एका प्रिय मुलीला दिला आहे. कोण आहे ती मुलगी जाणून घेऊ. सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात तुम्ही आजवर अनेक गोड गाणाऱ्या कलाकारांसह महेशच गाणं अनेक वेळा ऐकल असेल. अशात त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या शोमधील त्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या मध्ये अभिनेत्री स्पृहा जोशी महेशला प्रश्न विचारताना म्हणते की, “आता पर्यंत तू मिळवलेले यश तू कुणाला डेडीकेट करशील.” त्यावर पहिल्यांदा उत्तर देत त्याने त्याच्या जवळच्या आणखीन एका प्रिय व्यक्तीचा उल्लेख केला आहे. तो यावेळी म्हणाला आहे की, “मी आता पर्यंत आई बाबां बद्दल खूप वेळा बोललो आहे. मात्र मी अमेरिकेला गेल्यानंतर माझं गाणं टिकवण खूप कठीण होतं, तर त्यावेळी माझ्या सोबतीला फक्त एकच व्यक्ती होती. ती म्हणजे पूर्वा माझी पत्नी. तिच्यामुळेच मी आज इकडे हे शो करू शकतो ती सगळं काही सांभाळून घेते त्यामुळे माझा हा प्रवास मी तिला तिला डेडीकेट करतो. ” यानंतर पुढे तो असं म्हणाला की, “माझी कोणतीही मैफिल असेल किंवा कट्यारमधल गाणं असेल तसेच आपला सुर नवा ध्यास नवा हा शो असेल ही सगळी स्वप्न मी पहिले तिच्याबरोबर शेअर केली आहेत. आणि नंतर ती सर्वांसमोर आली आहेत.” त्यानंतर महेशने त्याच्या पत्नीसाठी एक सुंदर असं “तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके….” हे गाणं देखील गायलं.

महेश काळे हे आयसिएमए फाउंडेशन म्हणजेच इंडियन क्लासिक म्युजिक अँड आर्ट फौंडेशन चालवतात ज्यात अनेक कलाकार घडवले जातात. भारतीय कलासिक म्युजिक भारतातच नव्हे तर जगभरात पप्रेजेंट करण्याचं काम ह्या फाऊंडेशनच्या वतीनं केलं जात. महेश ह्यांच्या पत्नी पूर्वा काळे ह्या आयसिएमए च्या को फाऊंडर देखील आहेत. तिकडचं सगळं त्या योग्यप्रकांरे हॅण्डल करतात त्यामुळेच महेशला इतर प्रोग्रॅम अटेंड करता येतात. महेश आणि पूर्वा या दोघांचा विवाह साल २००५ मध्ये झाला आहे. या दोघांच्या लग्नाला आता जवळजवळ १५ वर्षे झाली आहेत. मात्र अद्याप सोशल मीडियावर त्याने त्याच्या पत्नीला त्याच्या कार्यातील खारीचा वाटा दिला नव्हता. पहिल्यांदाच त्याने पूर्वा बद्दल केलेलं हे वक्तव्य पाहून पूर्वासह चाहते आणि प्रेक्षकवर्ग खूप खुश आहे. नववर्ष २०२२ च्या शुभेच्या देत महेशने पूर्वा सोबतचा हा खास फोटो देखील शेअर केले आहेत. भारतीय कलासिक म्युजिक घराघरात पोहचवणाऱ्या ह्या जोडीला आमच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा…