आपण इतरांपेक्षा वेगळं किंवा सुंदर दिसावं हे प्रत्येक महिलेला वाटत असतं. अधिक करून तरुणीमध्ये मेकअपचा ट्रेण्ड पाहायला मिळतो आपणही एखाद्या अभिनेत्री सारखं दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटत त्यामुळे हल्ली सर्वच मुली आणि महिला मेकअप करताना पाहायला मिळतात पण तो किती व कसा करावा हे देखील हि देखील तितकंच महत्वाचं आहे. जरा हटके करायच्या नादात काहीतरी वेगळं होऊन जातं आणि नंतर ते भोगावं लागत. एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्रीला प्रोथेटसिक मेकअप केला होता त्यावेळी तिने अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं.

ज्या अभिनेत्रीला या समस्यांना सामोरं जावं लागलं त्या अभिनेत्रीच नाव आहे “यानिया भारद्वाज”. अभिनेत्री यानिया भारद्वाज छोरी या चित्रपटाच्या वेळी तिला भुताचा रोल करायचा होता छोरी हा चित्रपट मराठीतील ‘”लपाचीपी” या चित्रपटावर आधारित आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अभिनेत्री पूजा सावंत पाहायला मिळाली होती. याचाच रिमेक म्हणून प्रकाशित झालेल्या हिन्दी चित्रपटाचं “छोरी” यात मुख्य भूमिकेत यानिया भारद्वाज पाहायला मिळाली आहे. या चित्रपटाच्या वेळी तिला मेकपमुळे झालेला त्रास तिने तिच्या चाहत्या समोर शेयर केला आहे. त्यात अभिनेत्री यानिया भारद्वाज म्हणते कि “प्रोथेस्टिक हा मेकअप करायला तीन ते चार तास लागायचे आणि हा मेकअप घालवायला दोन तास लागायचे ह्या मेकअपमुळे मला एक वॅक्सीन घेतल्यासारखं वाटत होत या मेकअप मुळे चेहऱ्यावर फोड आले होते कधी कधी त्यातून रक्त हि यायचं शूटिंगला लवकर जावं लागायचं त्यामुळे जेवणाकडेही दुर्लक्ष होत होत.

हात आणि चेहरा प्रोथेस्टिकने झाकलेला होता त्यामुळे नीट जेवताही येत नव्हतं कधी कधी ताप यायचा त्यामुळे वेदनादायक औषधें घ्यावी लागत होती माझ्या फुफुसांना सूज आली होती त्यामुळे मला आता हॉस्पीटल मध्ये भरती करावं लागत मला माहित नव्हतं कि प्रोथेस्टिक माझं आरोग्य आणि शरीर खराब करेल शुटींगच्या शेवटच्या दिवशीही काही खाऊ किंवा पिऊ शकत नव्हते कारण ते पचन होत नव्हतं या समस्यांना तोंड देऊन शूटिंग पूर्ण केलं ३ डिसेंबर ला तो प्रदर्शित झाला आहे.” असं ती म्हणाली. मराठी मालिका अभिनेत्रींच्या बाबतीत देखील काही महिन्यांपूर्वी असाच प्रकार पाहायला मिळाला होता. अभिनेत्री प्रमिती प्रीत हिने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत हेमा जहागिरदार हे पात्र उत्तम रित्या साकारलं होत.तिच्या चेहऱ्यावर काही इन्फेक्शन झालं असल्यामुळे तिचा चेहरा खराब झाला होता. मालिकेतील तिच्या हटके लूकसाठी तिला अनेकदा वेगवेगळा मेकअप करावा लागत असल्यामुळे तिचं इन्फेक्शन आणखीनच वाढू लागलं आणि ह्याच कारणामुळे तिला मालिका देखील सोडावी लागली होती.