बर्याच वर्षांनी मराठीमध्ये पुन्हा एकदा तमाशाचा फड रंगणार आहे. लावणीमागची कथा उलगडणार आहे. लेखक विश्वास पाटील यांच्या च्ंद्रमुखी या कादंबरीवर बेतलेल्या च्ंद्रमुखी या सिनेमाची घोषणा तशी दोन वर्षापूर्वीच झाली होती पण कोरोना लॉकडाऊनमुळे हा सिनेमा प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत होता. या सिनेमाची खरी चर्चा होती ती च्ंद्रमुखीच्या रूपात पडदयावर कोणती अभिनेत्री दिसणार याची. दोन दिवसांपूर्वी या सिनेमाचा दिग्दर्शक प्रसाद ओक आणि टीमने च्ंद्रमुखीच्या चेहर्यावरचा पडदा हटवला आणि अभिनेत्री अमृता खानविलकर च्ंद्रमुखीतील च्ंद्रा साकारणार असल्याचे समोर आले. अमृतावर तिच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असताना नुकताच अभिनेत्री मानसी नाईक हिने, मी अमृतापेक्षा चांगली च्ंद्रमुखी साकारली असती असे विधान केले आणि पुन्हा एकदा वादाची खपली निघाली. तर गेल्या आठवडय़ातही च्ंद्रमुखीसाठी प्राजक्ता माळी, सोनाली कुलकर्णी यांच्या नावाचे अंदाज बांधले जात असल्याने अफवांची पीक आले होते. यावरूनच आता या सिनेमाचा दिग्दर्शक प्रसाद ओक याने च्ंद्रमुखीच्या भूमिकेवरून सुरू असलेल्या अफवांमुळे च्ंद्रमुखीसाठी अमृताचेच नाव ठरले होते असं सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. प्रसादने त्याच्या इन्स्टापेजवर एक खास व्हिडिओ बनवून त्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

गेल्या काही दिवसात एखादया बहुचर्चित सिनेमावरून काही ना काही वादग्रस्त किंवा चर्चा घडवून आणणारी विधाने होत असतात. च्ंद्रमुखी या सिनेमाची घोषणा प्रसाद ओकने केली आणि कोरोनाचे सावट गडद झाले. च्ंद्रमुखी पडदयावर येण्यासाठी दोन वर्षाची वाट पहावी लागली. प्रेक्षकांनाही या सिनेमाची उत्सुकता होती. एकतर विश्वास पाटील यांच्या कादंबरीतील च्ंद्रमुखी सिनेमाच्या स्क्रिप्टवर चितारणे हे आव्हान होते आणि ते अभिनेता लेखक चिन्मय मांडलेकर याने पेलले. दिग्दर्शनाची धुरा प्रसाद ओकने सांभाळली. आता कोरोना निवळल्यानंतर हा सिनेमा प्रदर्शित करण्याच्या हालचालींना वेग आला तसे या सिनेमाचे प्रमोशनफंडे सुरू झाले. सर्वात आधी या सिनेमातील दौलतची भूमिका करणार्या अभिनेता आदिनाथ कोठारेचा चेहरा समोर आला तर त्यानंतर एका खास सोहळय़ात च्ंद्रमुखीच्या चेहर्यावरील पदर बाजूला सारून अमृता खानविलकरचा या सिनेमातील लूक आऊट करण्यात आला. दरम्यान प्रमोशनफंडा सुरू असताना कोण असेल च्ंद्रमुखी अशा पोस्ट सोशलमीडियावर फिरत होत्या तेव्हा अनेकांनी प्राजक्ता माळी, सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत अशी नावे कमेंटमध्ये दिली होती. जेव्हा अमृताचे पोस्टर आऊट झाले तेव्हा तिला शुभेच्छा देत अभिनेत्री मानसी नाईक हिने मी अमृतापेक्षा ही भूमिका चांगली केली अशी पोस्ट केल्याने चर्चेला उधाण आले.

यावरून प्रसाद ओक याने त्याच्या पोस्टमध्ये स्पष्टीकरण दिले आहे. प्रसाद ओक या पोस्टमध्ये असं म्हणत आहे की, जेव्हा च्ंद्रमुखी सिनेमा करायचे ठरले आणि लावणीकलेला ग्लोबल लेव्हलला न्यायचे ठरले तेव्हापासून दिग्दर्शक म्हणून माझ्या डोक्यात फक्त अमृता खानविलकर हिचेच नाव होते. मी दुसर्या कोणत्याही अभिनेत्रीचा विचारही केला नाही. अभिनय आणि नृत्य या दोन्ही कला असणारी अमृताच पडदय़ावरच्या च्ंद्रमुखीला न्याय देईल हा विश्वास मला होता. शिवाय च्ंद्रमुखीच्या व्यक्तीरेखेसाठी अमृताने सहा ते सात किलो वजन वाढवलं कारण ज्या काळातील ही च्ंद्रमुखी आहे त्या काळात लावणी कलावंत या झिरोफिगरच्या नसायच्या. आणि लावणी करणार्या नृत्यांगना ज्याप्रकारे नऊवारी साडी नेसतात त्या भरीव बांध्याच्या असतील तर चांगल्या दिसतात. त्यामुळे अमृताने वजन वाढवण्यावर खूप मेहनत घेतली आणि महत्त्वाचे म्हणजे लॉकडाऊनमध्ये सिनेमाचे शूटिंग थांबले त्या काळातही दीड वर्षे अमृताने तिचे वाढलेले वजन मेंटेन ठेवले. या भूमिकेसाठी अमृताच परफेक्ट आहे त्यामुळे आता हा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर असताना मी ही भूमिका केली असती असं जर कुणी म्हणत असेल तर तो विषय थांबला पाहिजे.