हा फोटो आहे १९६९ सालच्या “चंदा और बिजली” या चित्रपटातला संजीवकुमार आणि अभिनेत्री पद्मिनी यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका होती. तर चंदूची भूमिका फोटोतील या बालकलाकाराने साकारली होती. १९६८ साली या हिंदी चित्रपटाचा मुहूर्त केला त्यावेळी हा फोटो काढण्यात आला होता. फोटोतील हा चिमुरडा दुसरा तिसरा कोणी नसून मराठी सृष्टीतील दिग्गज सचिन पिळगावकर यांचा हा फोटो आहे. काही दिवसांपूर्वी हिंदी चित्रपट अभिनेते संजीव कुमार आणि दिग्दर्शक गुरुदत्त यांचा वाढदिवस होता त्यांच्या वाढदिवसाच्या दिनी सचिन पिळगावकर यांनी त्यांच्यासोबत अभिनित केलेल्या चंदा और बिजली या चित्रपटाच्या काही आठवणी सोशल मीडियावरून शेअर केल्या होत्या.

गुरुदत्तजी हा चित्रपटात अगोदरच बनवणार होते त्यात सचिन जिनाच मध्यवर्ती भूमिकेत घेणार असे त्यांनी सांगितले होते. परंतु सचिनजी त्यावेळी ९ वर्षांचे होते या चित्रपटासाठी सचिनचे वय ११ असायला हवे म्हणून गुरुदत्त दोन वर्षे थांबण्यास तयार होते आणि सचिनसोबत “बहारें फिर भी आयेंगी” हा आणखी एक चित्रपट साकारणार होते. दुर्दैवाने हा चित्रपट पूर्ण होण्यागोदरच गुरुदत्त यांचे निधन झाले. त्यानंतर हा चित्रपट गुरुदत्त यांचे बंधू आत्मारामजी यांनी पूर्णत्वास आणला होता. सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या बालपणी जवळपास ६५ चित्रपट साकारले असल्याचे सांगितले जाते. यात अनेक हिंदी चित्रपटातून ते बालकलाकार म्हणून आणि पुढे जाऊन नायक बनण्यापर्यत मजल मारली होती. आजही हिंदी डान्स रियालिटी शोमधून सचिन पिळगावकर यांना आदराने आमंत्रित केले जाते. १९६२ साली वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी ते मराठी सृष्टीतील ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून ते बालभूमिकेत झळकले होते. बालिका वधू, गीत गाता चल, नदिया के पार, अखियों के झरोखों से, शोले यासारखे अनेक हिंदी चित्रपट त्यांनी साकारले. गायक, दिग्दर्शक, अभिनेता अशा सर्वच भूमिका त्यांनी चोख बजावल्या लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांना सोबत घेऊन मराठी सृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले. बालकलाकार, प्रमुख नायक ते दिग्दर्शक आणि परीक्षक अशा विविध भूमिकेबाबत त्यांचे नेहमीच कौतुक झाले.