
चला हवा येऊ द्या च्या ह्या आठवड्यात रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी हजेरी लावली आहे. वेगवेगळ्या स्कीटच्या माध्यमातून या कलाकारांनी नेहमीच प्रेक्षकाना खळखळून हसवलं आहे मात्र यातून अनेकदा कोणाच्या ना कोणाच्या तरी भावना दुखवल्याने या कलाकारांना अनेकदा माफी मागावी लागली आहे. परंतू ह्या गोष्टींमधून कोणाच्याही भावना दुखावण्याचा या कलाकारांचा मुळीच हेतू नसतो. चला हवा येउ द्या या झी मराठीवरील शोचे सूत्रसंचालन निलेश साबळे करत आहे.

मात्र नुकतीच त्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांची माफी मागितली आहे आणि पुन्हा अशी चूक होणार नाही असे आश्वासन यावेळी त्यांना दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, चला हवा येऊ द्या ह्या शोमध्ये अनेकदा राजकीय मंडळींची पात्र दाखवून विनोद निर्मिती केली जाते. ‘दिवाळी अधिवेशन’ हा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी चला हवा येऊ द्या मधील कलाकारांनी सादर केला होता त्यात राजकीय नेत्यांची हुबेहूब पात्र साकारण्यात आली होती. नारायण राणे यांचे देखील पात्र त्यात दाखवल्याने त्यांच्या समर्थकांनी या गोष्टीवर आक्षेप नोंदवला होता. यासंदर्भात निलेश साबळे ला या कार्यकर्त्यांनी आमच्या भावना दुःखावल्या असल्याचे स्पष्ट शब्दात सुनावले होते. नारायण राणे यांच्या समर्थकांनी आपला रोष देखील व्यक्त केला होता. याच अनुषंगाने निलेश साबळे याने काल मंगळवारी २३ नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली होती आणि त्यांची माफी देखील मागितली होती. निलेश साबळे आणि मालिकेतील अन्य सहाय्यक यांनी एकत्रित जाऊन नारायण राणे यांच्या घरी जाऊन त्यांची माफी मागितली होती त्यावेळी निलेश राणे तेथे उपस्थित होते.

चला हवा येऊ द्या या शोचे नारायण राणे प्रचंड चाहते आहेत. त्यांनी नेहमीच ह्या कलाकारांना सन्मानित केलं आहे. असं असूनही कोणाच्या भावना दुखावण्याचा आमचा मुळीच हेतू नव्हता. या व्यक्तिरेखा साकारत असताना जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांची आम्ही मनापासून माफी मागतो असं निलेश साबळे याने म्हटलं आहे. ईथुनपुढे आमच्याकडून अशी चूक पुन्हा होणार नाही असं आश्वासन देखील त्याने यावेळी दिलं आहे. दरम्यान दिवाळी अधिवेशन या कार्यक्रमात अनेक राजकिय मंडळींच्या व्यक्तिरेखा साकारण्यात आल्या होत्या. यातून निर्माण होणाऱ्या विनोदामुळे प्रेक्षकांचे देखील मनोरंजन होत असते. मात्र यातून कुणाच्याही भावना दुखावल्या जात असतील तर त्यांची आम्ही माफी मागतो असे निलेश साबळे यांनी म्हटलं आहे.