चला हवा येऊ द्या फेम तुषार देवल ह्याला एका हिंदी मालिका अभिनेत्रीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तुषार देवल हा संगीत दिग्दर्शक आहे चला हवा येऊ द्या ह्या मंचावर तो संगीताची धुरा सांभाळताना दिसतो यासोबतच कधी कधी तो आपल्या विनोदि अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवतो. गेल्या अनेक वर्षांपासून तो संगीत क्षेत्राशी जोडला गेलेला आहे आणि चला हवा येऊ द्या चा तो अविभाज्य भाग म्हणूनही बनलेला आहे. मात्र तुषार सध्या एका कारणास्तव खूपच त्रस्त झाला आहे आणि याला कारण देखील तसंच आहे.

याचे स्पष्टीकरण देताना तो म्हणतो की, हिंदी मालिका अभिनेत्री गुलकी जोशी हिचा युट्युब वर एक मुलाखतीचा व्हिडीओ आहे या व्हिडिओत cintaa च कार्ड दाखवलं जातंय त्यात तुषार देवलचा मोबाईल नंबर दाखवण्यात आला आहे. ह्या एका चुकीमुळे गेल्या काही दिवसांपासून तुषारला खूप सारे फोन कॉलस येत आहेत. व्हिडिओत जो मोबाईल नंबर देण्यात आला आहे त्यात लोकांनी तो गुलकी जोशीचा नंबर असल्याचे सांगत आहेत. दिवसाला जवळपास १०० फोन कॉलमुळे तुषार खूपच त्रस्त झाला आहे. या बाबत त्याने ही सर्व माहिती गुलकी जोशी यांना कळवली आहे. त्याची दखक घेऊन त्या व्हिडिओत असलेला मोबाईल नंबर ब्लर केला आहे मात्र आतापर्यंत हा व्हिडीओ६ हजार जणांनी पाहिला असल्याने अजूनही तुषारला त्यासंदर्भात फोन कॉलस येत आहेत. दरम्यान घडलेल्या या प्रकाराबद्दल गुलकी जोशी यांनी माझी माफी मागण्याची तसदी सुद्धा घेतली नाही असं तुषार म्हणतो. ह्या प्रकरणातून मी आता कसा मार्ग काढू असा प्रश्न त्याच्यापुढे उपस्थित झाला आहे.

गुलकी जोशी ही हिंदी मालिका अभिनेत्री आहे. बॉलिवूड अभिनेता शरमन जोशी यांची ती चुलत बहीण आहे. मॅडम सर ही मालिका ती अभिनित करत आहे. याशिवाय क्राईम पेट्रोल, ये है मोहोब्बतें, फिर सुबह होगी अशा अनेक मालिका गाजवल्या आहेत. गुलकी जोशी यांच्या मुलाखतीत तुषार देवलचा मोबाईल नंबर देण्यात आल्याने तो सध्या मोठ्या अडचणीत सापडलेला पाहायला मिळतो आहे. तो नंबर तिने ब्लर करून टाकला असला तरी त्या व्हिडिओचे व्हिव ६ हजारांहून अधिक झाल्याने अनेकांनी तुषारचाच नंबर सेव्ह करून लोक त्यालाच संपर्क साधण्याचं प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे तुषार देवल याला चांगलाच मनस्ताप झाला असून आतातरी तिने माझी माफी मागावी अशी त्याची छोटीशी अपेक्षा आहे. असो सर्वाना हसवणारा आणि चला हवा येऊ द्या च्या माध्यमातून रसिकांची मने जिंकणारा तुषार लवकरच ह्यातून बाहेर पडेल अशी अपेक्षा करूयात.