Breaking News
Home / जरा हटके / का मी काळीच आहे, का मी जाडी आहे चला हवा येऊ द्या फेम स्नेहल शिदमचा संघर्षमय प्रवास

का मी काळीच आहे, का मी जाडी आहे चला हवा येऊ द्या फेम स्नेहल शिदमचा संघर्षमय प्रवास

चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल या पर्वाची विजेती ठरली होती अभिनेत्री “स्नेहल शिदम “. स्नेहल शिदम या विजयामुळे चला हवा येऊ द्या या मंचाची आणि थुकरटवाडीचा एक महत्वाचा घटक बनली आहे. या मंचावर आता तिच्या नसण्याची कल्पनाच कोणी करू शकत नाही इतकी ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. खरं तर चला हवा येऊ द्या या शोमुळे तिला अनेक मालिकेतून अभिनय साकारण्याची संधी मिळाली आहे. माझा होशील ना, भागो मोहन प्यारे यासारख्या मालिकेतून तिला छोट्या मोठ्या भूमिका मिळत गेल्या.

actress snehal chidam
actress snehal chidam

कॉलेजमध्ये असल्यासपासूनच स्नेहल एकांकिका, नाटकांमधून अभिनय साकारत असे. एक संधी म्हणून चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल मध्ये सहभागी होण्यासाठी तिने ऑडिशन दिली होती आणि तिने सर्व स्पर्धकांमधून आपल्या सहजसुंदर अभिनयाने चक्क विजेतेपद देखील पटकावले मात्र या यशापर्यंत येण्याचा तिचा प्रवास मात्र खूपच खडतर होता. अगदी ओळखीचीच माणसं तिला तिच्या दिसण्यावरून टोमणे मारत असत. मी किती काळी आहे, मी किती जाड आहे याची दरवेळी ते आठवण करून द्यायचे. स्नेहल ने नुकतीच मीडियाला एक मुलाखत दिली आहे त्या मुलाखतीत ती आपल्या प्रवासाचा उलगडा करताना दिसत आहे. स्नेहल म्हणते की मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी आहे त्यामुळे काहीतरी काम करून नोकरी करून पैसे कमावणे हा पहिला उद्देश होता. प्रसिद्धी मिळण्याअगोदर ज्या ज्या वेळी मी ऑडिशनला जायचे त्या त्या वेळी मला रिजेक्ट केले जायचे. बहुतेकदा मैत्रिणीच्या भूमिकेसाठी बोलले जायचे मात्र त्यातही तू फिट बसत नाही असे सांगितले जायचे त्यानंतर मी आईच्या भुमीकेसाठी ऑडिशन द्यायचे मात्र वयाकडे पाहून तेही काम मिळत नसे.

chala hawa yeudya actress
chala hawa yeudya actress

त्यामुळे त्यांच्या नजरेतून मी कधीच कोणत्या भूमिकेत फिट बसले नाही. माझे रिजेक्शन का केले जात होते याची पुसटशी कल्पना मला हळूहळू येऊ लागली होती. अगदी जवळचे नातेवाईक देखील तू अजून काही करतेस की नाही असेच टोमणे मारायचे त्यावेळी मी का जाडी आहे?, मी का काळी आहे? असं वाटायला लागायचं. या गोष्टी इग्नोर करायच्या म्हटलं तरी त्या गोष्टी तुमच्या कायम डोक्यात राहत असतात. जेव्हा चला हवा ये द्या चा प्लॅटफॉर्म मिळाला तेव्हा मला खूप प्रसिद्धी मिळत गेली. आज मी जे काही आहे ते फक्त चला हवा येऊ द्या मुळे आहे. या शोमुळे माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं आहे. आपण कसे दिसतो ह्यापेक्षा आपण काय करू शकतो याचा विचार होणे गरजेचे आहे त्यानंतर प्रत्येकालाच आपले आयुष्य किती सुंदर आहे याची जाणीव होते. प्रयत्न करत रहा, यश नक्कीच तुमचंच असेल…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *