
चला हवा येऊ द्या सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम आहे पण या महामारीच्या काळात चित्रपट आणि नाटकांचे प्रयोग बंद पडले त्यामुळे त्यांच्या प्रमोशनसाठी जाण्याचा प्रश्नच राहिला नाही. चला हवा येउ द्या ह्या शोचा टीआरपी ह्यामुळे चांगलाच खाली आला. आता पुन्हा नव्याने सिनेसृष्टी आपला जम बसवू पाहत आहे. चला हवा येउ द्या ह्या शो ने आजवर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यातील सर्वच कलाकार उत्तम अभिनय साकारताना पाहायला मिळतात. ह्याच शो मधील एक अभिनेता गेली २ ते ३ आठवड्यांपासून पाहायला मिळत नव्हता त्यामुळे त्याने हा शो सोडला कि काय असा सवाल अनेकजण विचारताना पाहायला मिळत होते.

चला हवा येऊ मधील गुंठामंत्री म्हणून ओळख मिळवलेला पुण्यातील राजगुरूनगरचा “कृष्णा घोंगे” हा कलाकार गेली २-३ आठवडे शो मध्ये पाहायला मिळाला नाही त्यामुळे सोशिअल मीडियावर लोक त्याने शो सोडला कि काय असे अनेक प्रश्न विचारताना पाहायला मिळाले. नुकताच त्याने एक फोटो शेअर करत आपण काय करत आहोत ह्याची कल्पना दिली आहे. प्रतीक गांधी सोबत ‘रिस्क है तो ईश्क है’ म्हणत त्याने एक फोटो .कृष्णा घोंगे ह्यांच्या बाबत एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे कृष्णा आता झी च्या हिंदी शो मध्ये झळकणार आहे होय कृष्णा “झी कॉमेडी शो” चा एक भाग बनला आहे. प्रतीक गांधी झी कॉमेडी शो मध्ये आला होता तेंव्हा त्याने त्याच्यासोबत हा फोटो काढला. कृष्णा आता हिंदी शो मध्ये गेल्यामुळे तो चला हवा येऊ द्याच्या मंचावर पाहायला मिळणार नाही. अत्यंत सामान्य घरातील कृष्णा घोंगे कमी काळातच सर्वांच्या आवडीचा कलाकार बनला. कृष्णा घोंगे हा मूळचा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुडे बुद्रुक या गावचा. कृष्णाचे वडील भागूजी घोंगे हे शेतमजुरी करायचे यासोबतच ते छत्र्या दुरुस्त करणे, गवंडी काम करणे अशी मिळेल ती छोटी मोठी कामं करत असे. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक असायची.

लहान असल्यापासूनच त्याला नाटकात काम करायची विशेष आवड होती. ४ थ्या इयतेत असताना त्याने गवळ्याची रंभा ही स्त्रीव्यक्तिरेखा साकारली होती. पुढे सिएनसीमध्ये डीप्लोमाचे प्रशिक्षण घेतल्यावर चाकण येथील कंपनीत नोकरी केली. चाकण भागात मिंडा ह्या कंपनीत त्याने काही वर्ष काम देखील केले आहे. पण त्यात काही खास मिळवता येत नसल्याने आपल्या बहिणीकडे मुंबईला जाऊन काहीतरी करायचं असं ठरवलं. मोटार ड्रायव्हिंग स्कुलमध्ये कार शिकवण्याचे काम केले. शोरूममध्ये सेल्समनची नोकरी केली. नोकरी करत असताना एक आवड म्हणून फिल्ममेकिंगचे धडे गिरवले. पण आपल्या रांगड्या भाषेमुळे त्याला अनेक ठिकाणी नकार मिळाला. मग स्वतःच शॉर्टफिल्म बनवायला सुरवात केली त्यात त्याला अनेक पारितोषिके देखील मिळाली. पुढे निलेश साबळेशी ओळख झाली आणि निलेशच्या असिस्टंट म्हणून त्याला काम मिळालं. मग काही भागात त्याने अभिनय केला जो लोकांनी डोक्यावर घेतला आणि तो चला हवा येऊ द्या शो चा एक भाग बनला.