Breaking News
Home / ठळक बातम्या / मुलीच्या डोक्याला जबड्यात धरून वाघ घेऊन जाताना आईने जे धाडस दाखवलं

मुलीच्या डोक्याला जबड्यात धरून वाघ घेऊन जाताना आईने जे धाडस दाखवलं

चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीची हि घटना वाघाच्या जबड्यात मुलीला पाहून आई ओरडू लागली पण जवळ कोणी नसल्याने तिची हाक कोणापर्यंत पोहचू शकली नाही. शेवटी तिनेच जे धाडस दाखवलं ते पाहून वाघाने तिच्यावरच हल्ला चढवला पण घडलं असं कि शेवटी वाघाला हार मानवी लागली. हि घटना घडली १५ दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास घडलं असं .. आई अर्चना मेश्राम हि पहाटे टॉयलेटला जात असताना तिची ५ वर्षांची मुलगी प्राजक्ता तिच्या मागे मागे येऊ लागली. मागे कसलातरी आवाज येतोय हे ऐकून आई मागे वळली तर तिला धक्काच बसला.

tiger attack
tiger attack

अर्चना मेश्राम ह्यांच्या मुलीला एका वाघाने आपल्या जबड्यात धरून तो वाघ तिला ओढण्याचा प्रयत्न करत होता. हे पाहून अर्चना जोरजोरात ओरडायला लागल्या पण आसपास कोणीच नसल्याने त्यांनीच धाडस दाखवत जवळ पडलेल्या बाबूने त्या स्वतः वाघावर धावून गेल्या. बांबूचे फटके वाघावर पडताच वाघाने मुलीला सोडले पण बाजूला झालेला वाघ पुन्हा मुलीवर चाल करू लागला. आईने पुन्हा ओरडत त्याच्यावर प्रहार केला वाघ आता अर्चनाच्या अंगावर येणार हे पाहून अर्चनाने वाघाच्या दिशेने जोरजोरात बांबू जमिनीवर आपटायला सुरवात केली. तिची ती हिम्मत पाहून वाघाने हार मानत झुडपात निघून गेला. आईची माया आणि तिने दाखवलेली हिम्मत ह्यामुळेच तिची ५ वर्षाची मुलगी आज बचावली. पण ह्या हल्ल्यात प्राजक्ता खूप घायाळ झालेली आहे. १५ दिवसानंतर प्राजक्ता धोक्यातून बाहेर आली असली तरी तिच्या चेहऱ्यावर डोळ्याखाली फ्रॅक्चर झाले आहे. इतकच नाही तर तिचा वरचा जबडा खाली आला असल्यामुळे वरील दात खालच्या दातांवर नीट बसत नाहीत. ह्याकरता पुन्हा एकदा ऑपरेशन करण्यात येणार आहे. ती रिकव्हर नीट होईल कि नाही ह्यावर अजून शाश्वती देखील देण्यात येत नाही पण तिचा जीव मात्र बचावला आहे. आईने मुलीसाठी केलेल्या ह्या धाडसाचं करावं तितकं कौतुक कमीच आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *