सीसीडी एक असं ठिकाण जे प्रत्येकच तरुणाच्या आयुष्यातलं एक भाग आहे. प्रत्येक शहरात प्रत्येक ठिकाणी आज अनेक सीसीडी म्हणजेच कॅफे कॉफी डे उभारलेले आहेत. आपल्यातील अनेक जण आपल्या मित्र मंडळीसह हमखास सीसीडीमध्ये विरंगुळा करताना दिसतात. आज मोठा नफा कमवत असलेली ही कंपनी मात्र एकेकाळी कर्जाच्या ढिगाऱ्याखाली दबली होती. कंपनीच्या मालकांवर मोठी संकट देखील आली. आज या बातमीमधून याच सीसीडी विषयी थोडी माहिती जाणून घेऊ. सीसीडीची सुरुवात कर्नाटकमध्ये राहणाऱ्या वी जी सिद्धार्थ यांनी साल १९९६ मध्ये केली होती.

आता त्या काळी आपल्या देशात कॉफी पेक्षा चहाची मागणी जास्त होती. त्यामुळे अनेकांनी सीसीडी फार दिवस चालणार नाही असं ही म्हटलं होतं. मात्र सिद्धार्थ यांनी माघार न घेता मेहनत सुरू ठेवली आणि बघता बघता सीसीडी २ दशकातील मोठा ब्रँड झाला. मात्र सिद्धार्थ यांच्या सीसीडीवर कालांतराने फार वाईट दिवस आले. कंपनीवर कर्जाचा डोंगर उभा राहिला आणि या भार न पेलवल्याने सिद्धार्थ यांनी साल २०१९ मध्ये आत्महत्या केली. २९ जुलै २०१९ रोजी ते मैगलोर येथून आपल्या गाडीने चालले होते. मात्र अचानक त्यांनी आपल्या वाहन चालकाला गाडी थांबवायला सांगितली. आणि त्यानंतर ते विचार करत पुढे एकटेच चालत गेले. त्या रात्री ते घरी गेलेच नाही. पुढेचे दोन दिवस ते बेपत्ता होते. त्यानंतर ३१ जुलै रोजी नेत्रवदी नदीच्या किनारी त्यांचे शव काही मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना सापडले. सीसीडी कंपनी तब्बल ७ हजार कोटींच्या कर्जात बुडाली होती. सिद्धार्थ यांच्या मृत्यू नंतर त्याची एक चिठ्ठी देखील समोर आली. ज्यामध्ये लिहिलं होतं की, “मी कंपनीला मोठं करण्यासाठी काही गुंतवणूक केली होती. मात्र मला तिथे अपयश आलं. कर्जदरांचे फोन इनकटॅक्स यांची वसुलीची भाषा मला सहन होतं नव्हती. त्यामुळे मी हे टोकाचं पाऊल उचललं.” अशात सिद्धार्थ यांच्या पत्नी मा हेगडे यांनी माघार घेतली नाही.

कर्जात असलेली कंपनी त्यात पतीचे निधन या सर्वामधून कंपनीला मोठं करण तितकं सोप नव्हतं. पण काहीतरी करून दाखवण्यासाठी आधी प्रयत्न आणि मेहनत तरी करून बघू असं ठेवून त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहलं त्यात त्या म्हणाल्या “आम्ही जे स्वप्न पाहिलं होत त्यात आम्हाला यश आलं नाही पण पुन्हा एकदा प्रयत करूयात मला तुमच्या सर्वांच्या मदतीची अपेक्षा आहे तुमच्या सर्वांच्या शिवाय पुढे जाणे अशक्य आहे जे झालं ते खूप वाईट झालं पण आता पुढे जाण गरजेचं आहे.” मालविका यांनी मेहनतीने या कंपनीला वर आणलं. २०२० साली त्या सीसीडीच्या सीईओ झाल्या. मालविका या कर्नाटकचे माझी मुख्यमंत्री एस एम कृष्ण यांच्या कन्या आहेत. त्यांना दोन मुलं देखील आहेत. गेल्या वर्षी त्यांचा मुलगा अमर्त्यचे काँग्रेस नेता डी के शिवकुमार यांच्या मुलीशी त्याचा विवाह झाला. आज सीसीडी आपल्या देशात एक मोठी कंपनी झाली आहे. सध्या एकूण ५७२ सीसीडी सुरू आहेत. हजारो कर्मचारी ह्या कंपनीसाठी काम करतात आज कॅफे कॉफी डे एक उत्कृष्ट ब्रँड बनला आहे. ७००० कोटींचं कर्ज असलेल्या कंपनीवर आता फक्त १२०० कोटी इतकंच कर्ज राहील आहे. शिवाय कंपनीची वॅल्युएशन आता हजारो कोटींच्या घरात गेली आहे. कठीण काळात न डगमगता खंबीरपणे लढण्यान यश नक्की हाती लागतं याच हे एक उत्तम उदाहरण असल्याचं दिसून येत.