Categories
actress

“चांदणे शिंपीत जा” चित्रपटातील ही मराठी मुलगी पहा नंतर का करू लागली “नेपाळी” चित्रपटांत काम? दिसते खूपच सुंदर

“हे चांदणे फुलांनी शिंपित रात्र आली, धरती प्रकाश वेडी ओल्या दवांत न्हाली…” हे अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं लोकप्रिय गाणं आहे “चांदणे शिंपित जा” या मराठी चित्रपटातील. १९८२ सालच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते कमलाकर तोरणे यांनी तर आशालता वाबगावकर, आशा काळे, रविंद्र महाजनी, मधुकर तोरडमल, महेश कोठारे, अरुण सरनाईक, उषा नाईक, तृप्ती अशा अनेक मातब्बर कलाकारांनी हा चित्रपट आपल्या अभिनयाने चांगलाच गाजवला होता. चित्रपटातील हे गाणं चित्रित झालं होतं “तृप्ती” या अभिनेत्रीवर. या चित्रपटाव्यतिरिक्त तृप्ती ने महेश कोठारे यांची नायिका म्हणून “घरचा भेदी”(१९८४) या आणखी एका मराठी चित्रपटात काम केले होते.

actress trupti
actress trupti

तृप्ती ही केवळ मराठी चित्रपट अभिनेत्री नाही तर तीने अनेक हिंदी तसेच नेपाळी चित्रपटातून काम केले आहे आणि आजही ती एक नेपाळी अभिनेत्री म्हणूनच ओळखली जाते. तिच्याबद्दल आज अधिक जाणून घेऊयात… अभिनेत्री तृप्ती हिचे पूर्ण नाव आहे “तृप्ती नाडकर”. आज तृप्ती नेपाळी अभिनेत्री म्हणून जरी परिचयाची असली तरी तीचा जन्म एका मराठी कुटुंबातच झाला आहे. २ जानेवारी १९६९ रोजी दार्जिलिंग येथे तिचा जन्म झाला. मूळचे मुंबईला स्थायिक असलेले तृप्तीचे वडील कामानिमित्त दार्जिलिंगला रवाना झाले आणि तिथेच मायादेवी नावाच्या एका गायिकेसोबत त्यांची ओळख झाली त्यानंतर दोघांनी लग्नही केले. तृप्ती ही त्यांची एकुलती एक मुलगी. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासूनच तृप्तीने एक बालकलाकार म्हणून चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. मराठी कुटुंबात जन्मलेली आणि भाषेची उत्तम जाण या कारणाने तिला चांदणे शिंपित जा, घरचा भेदी अशा मराठी चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली. तिने साकारलेला “गोदाम”(१९८३)हा हिंदी चित्रपट देखील खूपच गाजला होता. गुजराथी, हिंदी चित्रपट साकारत असताना तिचे दिग्दर्शक असलेले काका ‘तुलसी घिमिरे’ यांनी नेपाळी चित्रपटात तिला प्रमुख नायिका साकारण्याची संधी दिली. वयाच्या १५ व्या वर्षी ‘कुसुमे रुमाल’ हा नेपाळी चित्रपट तिने आपल्या अभिनयाने गाजवला. “समझाना” या नेपाळी चित्रपटात तृप्तीच्या आई आणि वडिलांनीही अभिनय साकारला आहे.

marathi actresss in nepati film
marathi actresss in nepati film

मराठी हिंदी भाषेवर प्रभुत्व असलेल्या तृप्तीला नेपाळी भाषा फारशी येत नसल्याने या चित्रपटात तिचे डायलॉग डबिंग आर्टिस्टकडे सुपुर्त करण्यात आले होते. नावाजलेल्या नायिकांच्या यादीत आपले स्थान निर्माण केलेल्या तृप्तीने त्यावेळी चित्रपटासाठी तब्बल दीड लाख एवढे मानधन स्वीकारले होते. आपल्या कारकिर्दीत समझाना, कोसेली, लहुरे असे ब्लॉकबस्टर सिनेमे साकारत असतानाच १९८८ साली अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचे तिने ठरवले. कुसुमे रुमाल या चित्रपटावेळी तिचे लग्न ठरले होते. दरम्यान मुंबई स्थित इम्पोर्ट एक्स्पोर्टचा बिजनेस असलेल्या व्यक्तीशी तीने लग्नही केले. लग्न होऊन घरसंसार आणि मुलांना वेळ देता यावा यासाठी मोठा निर्णय घेत अभिनयातून एक्झिट घेण्याचे ठरवले. दोन मुलांच्या जन्मानंतर तिने स्वतःचा डान्स क्लास सुरू केला. तृप्तीचा थोरला मुलगा हा मुंबईतील तिने सुरू केलेला ‘तृप्तीज् डान्स क्लास’ चालवत आहे. तर तिचा धाकटा मुलगा जाहिरात आणि टीव्ही मालिका क्षेत्रात कार्यरत आहे. अभिनयातून ब्रेक घेतलेल्या तृप्तीने अनेक वर्षांनी “आमको काख” या चित्रपटात पुनरागमन केले. “कुसुमे रुमाल २”, “कोही मेरो ” असे आणखी काही चित्रपट तिने साकारले. आज एक नेपाळी अभिनेत्री म्हणून परिचयाची असलेली तृप्ती कधीकाळी मराठी चित्रपटातही गाजली हे एक मराठी प्रेक्षक कदापि विसरू शकणार नाही. तिच्यावर चित्रित झालेलं “हे चांदणे फुलांनी …” हे गाणं तर आजही तितकेच लोकप्रिय आहे आणि कायम राहणार..

Categories
actress

निवेदिता सराफ यांचे वडीलही होते मराठी चित्रपट अभिनेते आणि बहीणही दिसते अगदी सेम टू सेम

मराठी नाटक असो वा चित्रपट अगदी बालपणापासूनच निवेदिता जोशी सराफ यांनी आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनात उमटवलेला पाहायला मिळतो. अग्गबाई सासूबाई या मराठी मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर देखील एन्ट्री घेतली. अभिनयाचा हा वारसा त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाला असे म्हणायला हरकत नाही. अगदी वयाच्या दहाव्या वर्षापासून निवेदिता जोशी यांनी रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. मग १९७७ सालच्या अपनापन या हिंदी चित्रपटातून ‘आदमी मुसाफिर है’ गाण्यात सुधीर दळवी यांच्यासोबत त्या एक बालकलाकार म्हणूनही झळकल्या.

nivedita joshi and sister
nivedita joshi and sister

त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही धुमधडाका, थरथराट, नवरी मिळे नवऱ्याला, देऊळबंद, अशी ही बनवाबनवी अशा एका मागून एक दमदार चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी नायिकेच्या भूमिका बजावल्या. अभिनयाचा हा वारसा त्यांना त्यांच्या वडीलांकडूनच मिळाला. आज निवेदिता जोशी यांच्या वडीलांबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेऊयात…निवेदिता जोशी यांचे वडील “गजेन जोशी” हे मराठी चित्रपट अभिनेते म्हणून ओळखले जातात हे बहुतेकांना परिचयाचे नसावे. साधारण ७० च्या दशकात त्यांनी काही मराठी चित्रपटातून प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. १९६९ सालच्या “आधार” या चित्रपटात अभिनेत्री अनुपमा कुलकर्णी यांच्यासोबत गजेन जोशी यांनी प्रमुख नायकाची भूमिका साकारली होती. ‘ माझ्या रे प्रीती फुला…’हे गाणं अनुपमा आणि गजेन जोशी यांच्यावर चित्रित झालं होतं. “सौभाग्य कांक्षिणी” (१९७४), “दैवाचा खेळ” ( १९६४), “दृष्ट जगाची आहे निराळी” (१९६२) अशा आणखी काही मराठी चित्रपटातून ते झळकले आहेत. डॉ मीनल परांजपे आणि अभिनेत्री निवेदिता सराफ ह्या त्यांच्या दोन मुली. त्यापैकी निवेदिता यांनी त्यांच्या वडिलांच्या अभिनयाचा वारसा असाच अविरत जपलेला पाहायला मिळतो. गजेन जोशी, मीनल परांजपे आणि निवेदिता सराफ या तिघा बाप लेकींच्या दिसण्यात तुम्हाला खूपच साम्य आढळून येईल.

gajen joshi pic
gajen joshi pic
Categories
actress

अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि मेहुल पै विवाहबद्ध…पहा लग्न सोहळ्याचे फोटो

मराठी सृष्टीतील अभिज्ञा भावे हिच्यासह मानसी नाईक आणि मिताली मयेकर नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लग्न बंधनात अडकणार आहेत. या तिघींपैकी अभिज्ञा भावेच्या घरी गेल्या काही दिवसांपासून लग्नाची लगबग सुरू देखील झाली होती. तर मानसी नाईक हिनेही बॅचलर पार्टी साजरी केलेली पाहायला मिळाली नुकतेच मानसी नाईक हिने प्रदीप खरेरा सोबत प्रिवेडिंग फोटोशूट केले आहे. त्यामुळे तिची ही लगीनघाई पाहायला मिळत आहे तर नुकतेच अभिनेत्री अभिज्ञा भावे हिच्या घरी हळद फोडण्यापासून मेहेंदी सेरेमनी आणि त्यानंतर हळदीचा सोहळा पार पडला.

abhindnyabhave wedding
abhindnyabhave wedding
actress abhindnya bhave wedding
actress abhindnya bhave wedding

या सोहळ्याचे फोटो अभिज्ञाने सोशल मीडियावर शेअर केलेले पाहायला मिळाले होते. मागील दोन दिवस पार पडलेल्या मेहेंदि आणि हळदीच्या या सोहळ्यात श्रेया बुगडेसह अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. आज बुधवार ६ जानेवारी रोजी अभिज्ञा ही मेहुल पै सोबत विवाहबद्ध झाली असून त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिज्ञाने गुलाबी रंगांची नक्षीदार साडी तर मेहुलने त्याच रंगाचा शेरवानी परिधान केला आहे. दोघांनी परिधान केलेल्या लग्न सोहळ्यातील या वेशात हे नवदाम्पत्य अधिकच खुलून दिसत आहे. आज दुपारी त्यांच्या लग्नाचा हा सोहळा मोठ्या थाटात पार पडला असून अनेक मित्रमंडळी तसेच नातेवाईक आमंत्रित करण्यात आले होते. यासोबतच त्यांच्या लग्नाच्या सोहळ्यात रेश्मा शिंदे, तेजस्विनी पंडित, श्रेया बुगडे यांच्यासह अनेक मराठी सेलिब्रिटिंनी हजेरी लावलेली पाहायला मिळते आहे. अभिज्ञा आणि मेहुलला त्यांच्या आयुष्याच्या या नव्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…

Categories
actress

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील अभिनेत्रीच्या सख्या बहिणीचा नुकताच झाला साखरपुडा

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून माया चे पात्र साकारले आहे अभिनेत्री “रुचिरा जाधव” हिने. रुचिराने याआधी अनेक टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. कलर्स मराठीवरील तुझ्यावाचून करमेना या मालिकेतून तिने नुपूरची भूमिका साकारली होती. शुद्ध देसी या युट्युब चॅनलवरील माझ्या मित्राची गर्लफ्रेंड या वेबसिरीज खेरीज प्रेम हे (झी युवा), बे दुणे दहा(स्टार प्रवाह), माझे पती सौभाग्यवती(झी मराठी) अशा आणखी काही मालिकेतून ती प्रेक्षकांसमोर आली.

rutuja jadhav
rutuja jadhav

परंतु यासर्वांमधून झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको मालिकेमधून तीने साकारलेल्या मायाला जास्त प्रसिद्धी मिळाली. रुचिराला एक सख्खी बहीणही आहे तिचे नाव “ऋतुजा”. रविवारी ३ जानेवारी रोजी ऋतुजा आणि अंकित ढगे यांचा साखरपुडा पार पडला. साखरपुड्यानिमित्त मराठी कलाकारांनी या दोघांनाही भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. अंकित ढगे एक सोशल वर्कर असून मुंबईतच तो स्थायिक आहे. तर ऋतुजा आपल्या बहिणीप्रमाणेच कला क्षेत्राशी निगडित आहे एक फॅशन मॉडेल म्हणून ती मॉडेलिंग क्षेत्रात आपला जम बसवताना दिसत आहे. फ्लेमिंगो ह्या प्रसिद्ध फिटनेस ब्रँड प्रॉडक्ट्ससाठी तिने काम केले आहे. ह्या ब्रँडचा ब्रँड अँब्यासिडर प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आहे. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना या दोघी बहिणींनी कला क्षेत्रात बसवलेला आपला जम खूपच कौतुकास्पद म्हणावा लागेल. तुर्तास ऋतुजा आणि अंकीतला साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा….

Categories
actress

निशिगंधा वाड यांनी सांगितलेल्या एका किस्याने तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

मराठी सृष्टीला लाभलेली एक सोज्वळ आणि तितकीच देखणी अभिनेत्री म्हणजे डॉ निशिगंधा वाड होय. नुकतीच अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांनी आपल्या युट्युब चॅनलवरून निशिगंधा वाड यांची मुलाखत घेतली. अगदी सुरुवातीपासूनच त्यांची ही मुलाखत केवळ ऐकत राहावी आणि ती शक्य तेवढी आत्मसात करावी अशीच होती. ही मुलाखत ऐकताना प्रत्येकवेळी केवळ शब्दांचेच नव्हे तर ज्ञानाचेही भांडार निशिगंधा वाड यांच्या आंतरमनात भरभरून पेरले आहे याची जाणीव क्षणाक्षणाला होत राहते. या मुलाखतीत त्यांनी आपल्या जीवनप्रवासाबद्दल खुप काही सांगितले आहे . मुलाखतीच्या शेवटी त्यांच्यासोबत घडलेल्या एका किस्स्याने अक्षरशः डोळ्यात पाणीच आणले.

sulekha talwalkar and nishigandha wad
sulekha talwalkar and nishigandha wad

मनाच्या कुपीत अत्तरासारखा राहिलेला हा किस्सा सांगताना त्या म्हणाल्या की एकदा शूटिंग आटोपल्यावर मी त्या कॅफेमध्ये लिहायला बसले तर बाहेरील बाजूस एक वृद्ध भिकारी खाण्याचा अभिनय करत होता. हे पाहून निशिगंधा वाड यांनी कॅफेतील एक बर्गर विकत घेतला आणि त्या वृद्ध व्यक्तीला ‘आवडेल तुम्हाला खायला?’ असे नम्रपणे विचारले. वृद्ध व्यक्ती ‘आवडेल’ असे म्हटल्यावर निशिगंधा वाड तिथून निघाल्या पण त्याक्षणी पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊन ‘माझ्या समोर बसून खाल?’ अशी विचारणा केली. त्यावर तो वृद्ध व्यक्ती म्हणाला की ‘मला आत नाही येऊन देणार… ‘ अशी व्यक्ती कॅफेत आल्यावर इतर लोकं येणार नाहीत शिवाय तिथे असलेली व्यक्ती मालक नसेल किंवा त्या कर्मचाऱ्यांवर बंधनांचा अंकुश असेल हा विचार करून ‘माझ्या टेबलवर भिंतीकडील एका कोपऱ्यात त्या व्यक्तीला बसु दे ,पण बसु दे ‘ अशी विनंती निशिगंधा वाड यांनी केली. परवानगी घेतल्यावर कॅफेच्या आत एका कोपऱ्यात त्या वृद्ध व्यक्तीला बसवून त्यांनी त्याला पोटभर जेवू घातले शिवाय काही पैसेही देऊ केले पण त्यांनी ते ‘एवढं पुरेस आहे’ म्हणत पैसे घेण्यास नकार दिला …. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता…

nishigandha wad actress
nishigandha wad actress

मला तो क्षण एकत्र साजरा करायचा होता असे म्हणून भावनिक झाल्या. कॅफेच्या बाहेर आल्यावर त्या व्यक्तीने बोलताबोलता आपला जीवनप्रवास सांगितला की, ‘कुठेच नोकरी मिळाली नाही.. घर सुटलं..नातेवाईक सुटले… रस्त्यावर आलो..रस्त्यावरच उरलो…’ असे म्हणत निशिगंधा वाड यांच्या हातावर त्यांनी एक टिश्यू पेपर ठवेला आणि ‘मी गेल्यावरच वाच’ असे सांगितले. निशिगंधा वाड ज्या टेबलवर लिहिण्यासाठी बसल्या होत्या तिथल्याच पेनने त्या व्यक्तीने टिश्यूवर काहीतरी लिहिले होते. ती व्यक्ती गेली तशा निशिगंधा वाड गाडीत बसल्या आणि तो टिश्यू उघडून पाहिला तर त्यात लिहिले होते, ‘ आज मी आ त्म’ ह ‘त्या करणार होतो पण आता करणार नाही…’ हे वाक्य जेव्हा त्या बोलल्या तेव्हा यांच्यासह सुलेखा तळवलकरही खूपच भावुक झाल्या आणि दोघींच्याही डोळ्यातून अश्रू ढळू लागले… अशा लोकांसाठी काहीतरी करायला हवे अशी प्रामाणिक प्रतिक्रिया व्यक्त करत ‘ज्यांना परमेश्वराने भरभरून दिलं आहे, ज्यांची ओंजळ भरलेली आहे, मला असं वाटतं हे कर्तव्य त्यांच्याकडे परमेश्वराने दिलं आहे की तुमचं पोट भरलंय ना ढेकर देऊ नका…घास वाढा कोणाच्यातरी पानात….’

Categories
actress

शनाया साकारणारी अभिनेत्री रसिक सुनील पडली या व्यक्तीच्या प्रेमात

माझ्या नवऱ्याची बायको मालिका फेम शनया अर्थात रसिका सुनील मालिकेतून एक्झिट घेणार आहे. मालिकेतील कुणाल सोबत ती लग्न करणार असून परदेशात जाणार असल्याचे दाखवून तिचे शनयाचे पात्र कायमची एक्झिट घेणार आहे. रसिका मालिकेत दिसणार नाही म्हटल्यावर तिचे चाहते जरासे नाराज होणार हे निश्चितच परंतु लवकरच ती काहीतरी खास गोष्टी घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे. नव्या वर्षाची सुरुवातही तीने अशाच हटके अंदाजात केलेली लहायला मिळत आहे. नुकतेच रसिकाने नव्या वर्षाचे स्वागत करत एका खास व्यक्ती सोबतचा फोटो शेअर केला आहे. रसिका नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लॉस एंजेलीस येथे गेली असून या खास व्यक्तीसोबत ती डेट करत असल्याची चर्चा आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोवर मराठी कलाक्षेत्रातील अनेकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

actress rasika sunil
actress rasika sunil

रसिका ज्या व्यक्तीला डेट करत आहे त्या व्यक्तीचे नाव आहे “आदित्य बिलागी”. आदित्य हा एक उत्तम डान्सर असून कोरीओग्राफर, मार्शल आर्टस्, ड्रॉईंग याचीही त्याला विशेष आवड आहे. यासोबतच सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणूनही तो कार्यरत आहे. बॉलिवूड, हिपऑप अशा डान्सफॉर्ममधील त्याने केलेले नृत्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. २०१७ सालापासून लॉस एंजेलीसच्या #bfunk डान्स क्लासमध्ये तो सहभागी झाला गेल्या वर्षी #bfunk मधील त्याने सादर केलेल्या नृत्याला देशभरातून नावाजले गेले या एका व्हिडिओमुळे आदित्य खूपच लोकप्रिय झाला त्या एकाच व्हिडिओमुळे त्याची दखल जगभरातील अनेक मान्यवर व्यक्तींनी घेतलेली पाहायला मिळाली होती. आदित्य आणि रसिका हे दोघेही लॉस एंजेलीसलाच भेटले तिथेच त्यांची खास मैत्रीही झाली. आता हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा कलाक्षेत्रात रंगल्या आहेत. आदित्यच्या प्रेमात पडण्याअगोदर रसिका मराठी चित्रपट, मालिका अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ह्याला डेट करत होती. परंतु काही वर्षातच त्यांचे ब्रेकअप देखील झाले त्यानंतर सिध्दार्थने २०१९ साली मिताली मयेकर सोबत साखरपुडा केला आणि आता लवकरच ते लग्नही करत आहेत. सिद्धार्थ बरोबरच्या ब्रेकअप नंतर रसिकाने मालिका, चित्रपट, म्युजिक व्हिडीओ क्षेत्रात आपला जम बसवला. मधल्या काळात ती शिक्षणासाठी परदेशातही गेली होती या प्रवासातच तिला तिचा आयुष्याचा जोडीदार मिळाला असे म्हणायला हरकत नाही. आता रसिका आणि आदित्य लग्न कधी करणार याकडे साऱ्या चाहत्यांचे लक्ष लागून राहणार हे मात्र नक्की…

Categories
actress

मराठी सृष्टीतील या ३ प्रसिद्ध अभिनेत्रींची लगीनघाई…या अभिनेत्रीने नुकतीच साजरी केली बॅचलर पार्टी

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मराठी सृष्टीतील तब्बल ३ प्रसिद्ध अभिनेत्री लग्नबांधनात अडकणार आहेत. २०२० या सरत्या वर्षात या अभिनेत्रींची लगीनघाई देखील पाहायला मिळत आहे. या तीनही अभिनेत्री नेमक्या कोण आहेत ते पाहुयात… गेल्याच महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर २०२० मध्ये अभिनेत्री मानसी नाईक हिने प्रदीप खरेरा सोबत एंगेजमेंट केली होती. त्यानंतर नव्या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही दोघे लग्न करणार आहोत असे तिने सोशल मिडियावरून सांगितले होते. नुकतीच मानसीने आपल्या खास मैत्रिणींसोबत बॅचलर पार्टी साजरी केली आहे. या पार्टीत अभिनेत्री दीपाली भोसले- सय्यद हिनेही हजेरी लावलेली पाहायला मिळाली.

marathi actress wedding
marathi actress wedding

#manukishadi #parukidulhan हे हॅशटॅग वापरून मानसी आपल्या लगीनघाईची लगबग चाहत्यांसोबत शेअर करत आहे. मानसी नाईक हिच्याप्रमाणे मराठी सृष्टीतील आणखी दोन अभिनेत्री लवकरच बोहल्यावर चढणार आहेत. त्यापैकी अभिनेत्री अभिज्ञा भावे हिच्या घरी नुकतीच हळद फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यामुळे अभिज्ञा आणि मेहुल पै लवकरच लग्नबांधनात अडकणार आहेत. शिवाय त्या दोघांनाही मराठी सृष्टीतील काही कलाकारांनी केळवणाला देखील आमंत्रित केले होते. मुख्य म्हणजे मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी देखील अभिज्ञा आणि मेहुलचे केळवण केलेले पाहायला मिळाले. यात आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्याही घरी लग्नाची लगबग सुरू आहे. २०१९ साली जानेवारी महिन्यातच सिद्धार्थ आणि मिताली यांनी एंगेजमेंट केली होती त्यानंतर हे दोघे लग्न कधी करणार याचीही चर्चा बऱ्याचदा पाहायला मिळाली. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी हे दोघेही २०२१ या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लग्न करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मिताली आणि सिद्धार्थ यांचेही केळवण वेगवेगळ्या सिब्रिटींच्या घरी झालेले पाहायला मिळाले होते. त्यामुळे यासर्वांच्या लगीनघाईची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

Categories
actress

“स्वामी समर्थ” मालिकेमुळे चर्चेत आलेली ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण? खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश

कलर्स मराठी वाहिनीवर २८ डिसेंबरपासून रात्री ९.३० वाजता “जय जय स्वामी समर्थ” ही मालिका सुरू झाली आहे. मालिकेच्या पहिल्याच भागाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरून पाहायला मिळत आहेत. स्वामी समर्थांचा जीवनप्रवास नेमका कसा होता हे या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. स्वामी समर्थांची भूमिका अक्षय मुडावदकर साकारत असून याअगोदर “गांधी हत्या आणि मी”, “द लास्ट व्हॉईसरॉय” सारखे नाटक तसेच “स्वराज्यजननी जिजामाता” मालिकांमधून त्याने काम केले आहे. तर मालिकेत “विजया बाबर” ही नवखी अभिनेत्री स्वामी समर्थांची भक्त साकारत आहे. विजया बाबर हिच्याबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

vijaya babar actress
vijaya babar actress

विजया बाबर ही थेटर आर्टिस्ट असून “ड्रीम थेटर मुंबईशी” ती निगडित आहे. ड्रीम थेटर्सच्या अनेक नाटकांतून तिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. ड्रीम थेटर्सने “सिंड्रेला”, “शिकस्त ए इश्क” अशा प्रायोगिक नाटकांची निर्मिती केली यात विजया महत्वाच्या भूमिकेत झळकली आहे. तीने अभिनित केलेल्या ‘शिकस्त ए इश्क’ या प्रायोगिक नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून २०१८ साली झी नाट्य गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याशिवाय “जिंदगी”, “तू कहा” या म्युजिक व्हिडिओत देखील विजयाने प्रमुख भूमिका बजावली आहे. केवळ अभिनयाच नाही तर मॉडेलिंग क्षेत्र आणि विविध सौंदर्य स्पर्धांमध्ये तिने सहभाग दर्शवला यातून २०१८ सालच्या “बेस्ट स्माईल क्वीन महाराष्ट्र” तसेच ब्लिस झेस्ट आयोजित नवी मुंबईच्या “मिस ग्लॅमरस अँड स्टायलिश” हे दोन किताबही तीने पटकावले आहेत. एखाद्या कलाकाराच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळतो तो छोट्या पडद्यावरील मालिकांमधून. विजया पहिल्यांदाच जय जय स्वामी समर्थ या मालिकेतून छोट्या पडद्यावर झळकत आहे त्यामुळे ती प्रकाशझोतात आलेली पाहायला मिळते. विजया बाबर हीला या पहिल्या वहिल्या मालिकनिमित्त खूप खुप शुभेच्छा… पहिल्याच भागात मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद तर मिळतोच आहे यापुढेही तो असाच मिळत राहील अशी खात्री आहे.

Categories
actress

आई कुठे काय करते मालिकेतील “रजनी”नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या

स्टारप्रवाह ही वाहिनी टीआरपीच्या बाबतीत अग्रस्थानी असलेली पाहायला मिळत आहे वाहिनीच्या तब्बल पाच मालिकांना प्रेक्षकांनी पुरेपूर पसंती दर्शवली असून यात आई कुठे काय करते या मालिकेचाही समावेश आहे. आई कुठे काय करते ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका आता खूपच रंजक होताना दिसत आहे. एकीकडे अभिला नोकरी लागल्याने अरुंधतीसह सर्वच कुटुंबाने आनंद व्यक्त केला आहे तर रजनी कारखाणीसची या मालिकेत नव्याने एन्ट्री झाल्याने मालिका अधिकच उत्कंठावर्धक झाली आहे.

actress sushma murudkar
actress sushma murudkar

गौरीची आई रजनी कंपनीची मालकीण असल्याने अनिरुद्धला आपली नोकरी टिकवण्यासाठी रजनीला कसे पटवणार ते येत्या काही भागातच पाहायला मिळेल. तूर्तास रजनी कारखानीसची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात… ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री “सुषमा मुरुडकर” यांनी. सुषमा मुरुडकर यांनी या मालिकेअगोदर हिंदी मालिकेतून काम केले आहे. तर काही व्यावसायिक जाहिरातींमधूनही त्या झळकल्या आहेत. “इश्क में मरजावा २”,” कुंडली भाग्य ” या हिंदी मालिका तसेच ‘जागो ग्राहक जागो’ च्या जाहिरातीत देखील झळकल्या आहेत. याअगोदर एक टिकटॉक क्वीन म्हणून तिच्या व्हिडीओजना चांगलीच पसंती मिळाली होती. आई कुठे काय करते या मालिकेतून पहिल्यांदाच मराठी मालिकेत झळकण्याची संधी मिळाली असल्याने सुषमा मुरुडकर प्रकाशझोतात आल्या. रजन कारखानीसची दमदार भूमिका वाट्याला आल्याने त्या खूप खुश देखील आहेत.

Categories
actress

धक्कादायक!! मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ह्या कारणामुळे आज आहेत अंथरुणाला खिळून

मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री “मधू कांबिकर” यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेऊयात… आज ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर आपल्या आजारपणामुळे चित्रपट सृष्टीपासून काहीशा दुरावलेल्या असल्या तरी त्यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिका आपल्याला त्यांच्या सजग अभिनयाची जाण करून देतात. मधू कांबीकर यांचा जन्म २८ जुलै १९५३ रोजी कांबी या गावी झाला. त्यांचे वडील हे नाटकातील जाणते कलाकार त्यामुळे मधू लहान असल्यापासूनच ते त्यांना आपल्या सोबतच घेऊन जात असत. तेव्हापासूनच त्यांच्या अभिनयाची जडणघडण होत गेली आणि त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. कलाक्षेत्रात अपार मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी अनपेक्षित यश संपादन केले.

actress madhu kambikar
actress madhu kambikar

एवढेच नाही तर लावणीच्या चाहत्यांना लावणीचा इतिहास उमजावा यासाठी त्यांनी लावणी संदर्भातील जेवढे लिखित साहित्य आहे ते जमवून तमाशाचा इतिहास गुंफण्याचे कार्य घडवून आणले. यात त्यांच्या फडातील ११ कलाकारांनी मोठी मदत केली. यावर आधारित ” सखी माझी लावणी ” हा कार्यक्रम त्यांनी सादर केला. पुण्यातील बाळासाहेब भोसले यांच्याकडून त्यांनी कथ्थकचे प्रशिक्षण घेतले. पुण्यातच त्यांची कला फुलली आणि रुजली. अस्सल लावणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा हा प्रयत्न निश्चितच फळाला आला. १९८२ सालच्या “शापित” चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला रसिकांनी भरभरून दाद दिली. इथूनच त्यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू, यशवंत, बिनकामाचा नवरा, येऊ का घरात, मला घेऊन चला, माझा छकुला अशा अनेक चित्रपटातून त्यांनी साकारलेली नायिका, सह नायिका, तर कधी आई ही प्रेक्षकांच्या विशेष संस्मरणीय ठरली. आज मधू कांबीकर कला क्षेत्रापासून दूर का आहेत त्याचे एक कारण आहे. पुण्याची मराठी रंगभूमी आणि गोपीनाथ सावरकर प्रतिष्ठान यांनी २७ नोव्हेंबर २०१६ रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरमध्ये आयोजित केलेल्या ‘लावण्य संगीत’ या कार्यक्रमात नृत्य सादर करत असताना मधू कांबीकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते तरीही त्यांनी त्या कार्यक्रमात भैरवीचे सादरीकरण केले. त्यानंतर मेकअप रूममध्ये गेल्यानंतर त्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आला त्यात त्यांचा उजवा हात बधीर झाला.

famous marathi actress
famous marathi actress

त्यामुळे त्यांना रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले होते. या कार्यक्रमात त्या तब्बल १२ वर्षांनंतर नृत्य सादर करणार होत्या १२ वर्षांपूर्वी अशाच प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी नृत्य न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यानंतरही त्यांनी आपली ही कला मंचावर सादर केली होती. याच आजारपणामुळे आज त्या अंथरुणाला खिळून आहेत. २०१८ साली झी चित्र गौरव पुरस्कारावेळी मधू कांबीकर यांना मराठी सृष्टीतील भरीव योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यावेळी मधू कांबीकर यांची सून शीतल जाधव यांनी त्यांच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला होता. त्यावेळी शीतल जाधव यांनी आपल्याला अशी सासू मिळाली हे माझे भाग्य असल्याचे सांगितले होते. मधू कांबीकर आजारापणामुळे मुलगा प्रीतम आणि सून शीतल यांच्या बोलण्याला कुठलिही प्रतिक्रिया किंवा हालचाल करत नाहीत परंतु त्यांचे एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू यासारखे चित्रपट जेव्हा घरात टीव्हीवर लावले जातात त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कधी हसू तर कधी डोळ्यातून अश्रू वाहू लागतात…आपले संपूर्ण आयुष्य कला क्षेत्राला वाहिलेल्या या कलावंतिणीची अस्वस्थता सुनेच्या तोंडून ऐकल्यावर आपणही निःशब्द होऊन जातो…