Categories
actors

एकेकाळी दारोदार हिंडून विकायचा साड्या लोकं तोंडावर खाडकन दारं बंद करायचे, अपमान करायचे…आज आहे मराठी सृष्टीतील प्रसिद्ध चेहरा

आजकाल अभिनय क्षेत्रात किंवा कला क्षेत्रात येण्यासाठी फार मोठे कष्ट घ्यावे लागत नाहीत असे म्हटले जाते. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा (अन्य पर्यायी माध्यमं) युट्युबवर आपल्या कलेचा एखादा व्हिडीओ अपलोड करून ती प्रसिद्धी मिळवणे सहज शक्य झाले आहे. परंतु ही माध्यमं उपलब्ध होण्याअगोदर मात्र अशा कलाकारांना अपार मेहनतीशिवाय पर्याय नसायचा हेच खरे. अशाच मेहनतीच्या जोरावर आज कित्येक कलाकारांनी या क्षेत्रांमध्ये आपले नाव कमावले आहे. त्यातच मराठी सृष्टीतील एक देखणा अभिनेता आणि ऍक्शन हिरो म्हणून नावारूपास आलेल्या संतोष जुवेकरला देखील हे कष्ट चुकलेले नाहीत. त्याच्या आयुष्याबद्दल आज अधिक जाणून घेऊयात…

actor santosh juvekar
actor santosh juvekar

१२ डिसेंबर १९८४ रोजी जन्मलेल्या संतोष जुवेकरने आज मराठी चित्रपट तसेच नाट्य, सृष्टीसोबतच हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. परंतु इथपर्यंत येण्याचा त्याचा हा प्रवास मात्र खूपच खडतर होता असे तो एका मुलाखतीतून सांगतो. अभिनयाची भयंकर आवड असलेल्या संतोषने दहावीच्या शिक्षणानंतर कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. कॉलेज आटोपल्यावर दुपारी जेवण करून आईने खरेदी केलेल्या साड्या दारोदार हिंडून विकणे हा त्याचा नित्यक्रम असायचा. मग दुपारीच साड्या घेऊन बिल्डिंगमध्ये दारोदार हिंडावे लागत. यातून त्याला कित्येक अडचणींना सामोरे जावे लागत असे. दाराची बेल वाजवून ‘साडी घेता का?’ विचारल्यावर लोकं ‘नाही’ म्हणत खाडकन तोंडावर दार आपटायचे , अपमान करायचे. यांना आत का सोडलत? म्हणून ओरडायचे. हे सर्व बघून ‘ मी काय फालतू आहे काय? चोरी करायला आलोय काय?’ असा विचारही त्याच्या मनात येत असे. एकदिवस हे सर्व अनावर झाल्यावर घरी जाऊन तो रडू लागला. ‘मला हे असलं काम करायचं नाही, मी दारोदार जाऊन साड्या विकणार नाही.. चार लोकं अपमान करतात हाकलून देतात’ म्हणत त्याने आईला हे काम करण्यास नकार दिला होता. त्यावर आईने समजावून सांगितले की ,’ जा तू आपलं काम कर, एक दिवस हीच लोकं तुझा चेहरा बघून दरवाजा उघडतील’ … पुढे जाऊन आईचे हेच शब्द खरे होतील याची पुसटशी कल्पनाही त्यावेळी कोणी केली नसावी. पुढे कॉलेजमध्ये असताना संतोषने अनेक नाट्यस्पर्धा गाजवल्या. दरम्यानच्या काळात त्याने नोकरी देखील केली परंतु अभिनय हीच आपली आवड म्हणून हातच्या नोकरीला रामराम ठोकावा लागला. जेव्हा ही बातमी त्याच्या वडिलांना समजली तेव्हा त्यांनी पानाचा डब्बा फेकून मारला होता. वडील नेहमी रागवायचे परंतु आईने कायम प्रोत्साहन दिले त्याचेच हे यश असे तो म्हणतो. अभिनयाबाबतही त्याचे स्पष्ट मत आहे की, ऍक्टर होणं म्हणजे स्वतःला ऍनालाईज करणं की,’ मी हे करू शकतो का?’ कारण ऍक्टिंग ही एकच अशी गोष्ट आहे जी तुम्हाला शिकवून नाही होत…’

Categories
actors

अग्गबाई सासूबाई मालिकेतील जेष्ठ कलाकार रवी पटवर्धन यांचे दुःखद निधन

अग्गबाई सासूबाई मालिकेतील जेष्ठ कलाकार रवी पटवर्धन यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अग्गबाई सासूबाई मालिका करताना सेटवरही ते क्वचितच दिसायचे. पण त्यांनी मालिकेत केलेलं काम प्रेक्षक कधीही विसरणार नाहीत हेही तितकंच खरं. अग्गबाई सासूबाई मालिकेतील आजोबा म्हणजेच दत्तात्रय कुलकर्णी यांची भूमिका साकारली आहे ज्येष्ठ अभिनेते “रवी पटवर्धन” यांनी. आज रवी पटवर्धन वयाच्या ८४ व्या वर्षी देखील तितकेच उत्स्फूर्त असलेले पाहायला मिळाले होते. ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटाच्या जमान्यात त्यांनी अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. वयाच्या ८० व्या वर्षी भगवतगीतेचे ७०० श्लोक पाठ करून त्यांनी शृंगेरी मठाच्या परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला आहे. आपल्या कारकिर्दीत बहुतांशी पाटील, सावकार, वकील अशा विविध धाटणीच्या भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या. “आमची माती आमची माणसं” हा शेतकऱ्यांसाठी असलेला गप्पागोष्टीचा कार्यक्रम त्यांच्या “वस्ताद पाटील” भूमिकेमुळे चांगलाच गाजला होता.

ravi patwardhan marathi actor
ravi patwardhan marathi actor

त्यादम्यानही भल्या पहाटे उठून ते मॉर्निंग वॉकला आवर्जून जात. मधल्या काळात रिझर्व्ह बँकेत नोकरी केली त्यादरम्यान बँकेतील त्यांच्या सहकाऱ्यांनी नाटकात काम करता यावे म्हणून मोलाची साथ दिली. आता ते आपली पत्नी नीता सोबत ठाण्यात वास्तव्यास आहेत. अग्गबाई सासूबाई मालिकेचे शूटिंग देखील ठाण्यालाच असल्याने त्यांना मालिकेत काम करणे थोडे सोपे झाले होते. यासोबतच अवघ्या तेरा भागांची ‘तेरा पन्ने’ ही मालिका त्यांनी गाजवली होती यात हेमा मालिनी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाली होती. उंबरठा, बिन कामाचा नवरा, शेजारी शेजारी, अशा असाव्या सुना, तक्षक, तेजाब, नरसिंह, प्रतिघात, राजू बन गया जेंटलमेन, चमत्कार, युगपुरुष असे अनेक हिंदी मराठी चित्रपट त्यांनी साकारले. रवी पटवर्धन यांनी आई आपल्या वयाच्या नव्वदीपर्यंत अगदी ठणठणीत होत्या. नऊवारी नेसून बुलेटवर बसणे, घोडेस्वारी करणे हेच गुण हेरून रवी पटवर्धन आजही ठणठणीत राहण्यासाठी पहाटे चालण्याचा व्यायाम करत. अगदी अलीकडेच ” शिवपुत्र सह्याद्री ” या नाटकाच्या निमित्ताने मराठवाड्यात दौरे झाले ज्यात डॉ अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराज तर रवी पटवर्धन यांनी औरंगजेब साकारला होता.

Categories
actors

रामायण मालिकेतील ‘भरत’ची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा मुलगा आहे मराठी सृष्टीतील हा प्रसिद्ध अभिनेता

ramayan actor family
ramayan actor family

प्रेक्षकांच्या आग्रहाखातर दूरदर्शन वाहिनीवर रामायण मालिकेचे पुनःप्रक्षेपण केले गेले होते. या मालिकेत बाळ धुरी, जयश्री गडकर, ललिता पवार, संजय जोग यांसारखे बरेच मराठी कलाकार झळकले आहेत. त्यातीलच भरतची भूमिका अभिनेते “संजय जोग” यांनी साकारली आहे. संजय जोग हे मूळचे नागपूरचे. त्यांचे आजोबा ‘नाना जोग’ हे विदर्भ साहित्य संघाच्या संस्थापकांपैकी एक म्हणून ओळखले जात. एक उत्कृष्ट नाट्यकर्मी तसेच लेखक म्हणूनही कला क्षेत्राशी ते निगडित होते. आताच्या हॅम्लेट हे शेक्सपिअर वर आधारित नाटकाचे लेखन त्यांनीच केले होते. तर संजय जोग यांनी देखील आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत मराठी चित्रपट तसेच बॉलिवूड चित्रपटातूनही काम करण्यास सुरुवात केली.

sanjay jog family
sanjay jog family

आम्ही दोघे राजा राणी, नवरी मिळे नवऱ्याला, जिगरवाला, बेटा हो तो ऐसा अशा अनेक चित्रपटातून भूमिका साकारल्या. रामायण मालिकेतील भरतची भूमिका त्यांनी तितकीच उठावदार निभावलेली पाहायला मिळाली. कला क्षेत्रातील प्रवास चालू असतानाच त्यांचे १९९५ साली किडनी विकाराने निधन झाले. संजय जोग यांच्या पत्नी नीता जोग या पेशाने वकील आहेत तर रणजित आणि नताशा ही दोन अपत्ये त्यांना आहेत. रणजित जोग हा मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता म्हणून सर्वांना परिचित आहे. आपले पणजोबा नाना जोग यांनी लेखन केलेल्या हॅम्लेट या नाटकात रणजीतने महत्वाची भूमिका बजावली आहे. एक होतं पाणी, आव्हान, ही पोरगी कोणाची, लपून छपून यासारखे चित्रपट तसेच नकळत सारे घडले, कलर्स मराठीवरील श्री लक्ष्मीनारायण मालिकेत समुद्रदेव , ईटीव्ही वरील विवाहबंधन अशा मालिकांमधून तो झळकला आहे. रणजीतने अभिनयासोबतच ‘निताशा फिल्म्स इंटरनॅशनल’ ही निर्मिती संस्था उभारली आहे. रामायण मालिकेमुळे संजय जोग यांची आठवण होणे साहजिकच नाही का…

sanjay and ranjeet jog
sanjay and ranjeet jog
Categories
actors

देवमाणूस मालिकेतील “विठ्ठल”ची भूमिका साकारणारा बालकलाकार आहे तरी कोण?

actor in dev manus
actor in dev manus

देवमाणूस या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. मग त्यात सरू आज्जीच्या म्हणी असोत किंवा टोण्या आणि डिंपल या दोन्ही बहीण भावंडामधील कॉमेडी, त्यात भरीस भर म्हणजे नाम्या आणि बज्याची जुळून आलेली केमिस्ट्री या सर्वांमुळे मालिका प्रेक्षकांना पाहायला आवडते. मालिकेचे कथानक जसजसे पुढे सरकत आहे तशी याची उत्कंठा वाढताना दिसते. मालिकेत सुरुवातीपासूनच “विठ्ठल” चे एक कधीही न बोलणारे पात्र दाखवले आहे. विशेष म्हणजे हे पात्र मालिकेत शुभ अशुभाचे संकेत दर्शवण्याचे कार्य करत असते.

vitthal in devmanus serial
vitthal in devmanus serial

आज विठ्ठलचे पात्र साकारणाऱ्या बाल्कलकाराबद्दल जाणून घेऊयात… या मालिकेतला विठ्ठल कधीही बोलत नसला तरी त्याचा निरागस चेहरा आणि त्यावरील हावभाव पाहून कुतूहल वाटते. ही भूमिका साकारली आहे “वंश शाह” या बालकलाकाराने. वंश शाह शालेय शिक्षणात हुशार तर आहेच शिवाय डान्सची देखील त्याला विशेष आवड आहे. आपल्या वडिलांनाच तो आपल्या आयुष्यातील खरा रोल मॉडेल मानतो . त्यांच्याच प्रेरणेने अभिनयाची आवड त्याच्यात निर्माण झाली. अगदी विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून कधी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तर कधी बाल लीलया करणारा कृष्णही त्याने साकारला आहे. नृत्य, अभिनय आणि मॉडेलिंग अशा विविध क्षेत्रात वंश सहज वावरताना दिसतो. देवमाणूस ही त्याची अभिनित केलेली पहिलीच मराठी मालिका असली तरी पुढे जाऊन तो या क्षेत्रात भरीव कामगिरी करेल अशी आशा आहे. वंशला त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…

Categories
actors

आधी लोक हिडीसफिडीस करायचे पण तेच लोक आज…कारभारी लयभारी मालिकेतील जयदीपची भावनिक पोस्ट

karbhari lai bhari mahesh jadhav
karbhari lai bhari mahesh jadhav

पुराणात वामन अवतार हा विष्णूच्या दहा अवतारांपैकी पाचवा अवतार मानला जातो. विष्णूच्या बाटु अवतारातील वामन अवताराने अनेक कार्य सिद्धीस घडवून आणले होते, हा झाला पौराणिक कथेचा एक भाग परंतु आजच्या घडीला शारीरिक खुजेपणा हा समाजात चेष्टेचा विषय बनलेला पाहायला मिळतो. अशा व्यक्ती केवळ मनोरंजन करण्याच्या कामाचे असतात अशी भावना कुठेतरी रुजवलेली पाहायला मिळते. याच गोष्टीला छेद देण्याचे काम केले आहे मराठमोळा कलाकार “महेश जाधवने”.

actor mahesh jadhav
actor mahesh jadhav

खलनायकी ढंगाचा बाज असलेल्या लागींर झालं जी मधला ‘टॅलेंट’ असो किंवा कारभारी लयभारी मधील्या ‘जगदीशराव पाटील’ची भूमिका असो या भूमिकांमुळे महेश जाधव प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करून गेला. या भूमिकांमुळे कुठेतरी तो प्रेक्षकांना आपल्याप्रति राग निर्माण करण्यास पात्र ठरतो हीच त्याच्या अभिनयाची खरी पावती म्हणावी लागेल. अर्थात या यशाचे सर्व श्रेय तो नेहमीच तेजपाल वाघ यांनाच देतो, त्यांच्याचमुळे मला या भूमिका जगण्याची नामी संधी मिळाली असे तो सांगतो. यात झी मराठी वाहिनीचाही वाटा तितकाच मोठा आहे असे म्हणायला हरकत नाही. परंतु मागे वळून पाहताना महेश कुठेतरी भावुक झालेला पाहायला मिळतो. लहानपणी आपली उंची इतर मुलांसारखी वाढत नाही यामुळे तो पुरता खचून जायचा, स्वतःचा रागही यायचा. आपण इतर मुलांसारखे नाही हीच भावना त्याच्या मनात घर करून गेली होती. लोकं हसायचे, चिडवायचे, हिडीसफिडीस करायचे या गोष्टींमुळे त्याला फार त्रास व्हायचा. आज एवढे यश मिळाल्यानंतर हेच लोक मला ‘माझ्या गावचा आहे, नातेवाईक आहे म्हणून आता ओळख दाखवतात’. एका भावनिक पोस्टद्वारे तो म्हणतो की…

mahesh jadhav best actor
mahesh jadhav best actor

” नमस्कार मी महेश जाधव, आज लिहायचा विषय की माझ्या किंवा माझ्यासारख्या लोकांकडे जन्मापासून बघण्याचा दृष्टिकोन कायम विनोदी पद्धतीनेच बघितला जातो आणि हे लोक जास्तीत जास्त काय तर विनोदी भूमिका तसेच सर्कशीमध्ये जोकरच काम करतात पण त्याच जोकरच महत्व पत्त्याच्या पानात इतकं असत की ज्याच्याकडे तो असेल तो कुठल्याही पानाला लावून तो विजयी होतो. माझ्या आयुष्यात केव्हा वाटलं नव्हतं की मला अशी एक वेगळी भूमिका करायला मिळेल. याआधी तुम्ही पाहिलेला टॅलेंट आणि आताचा जगदीश हे फक्त झी मराठी आणि तेजपाल वाघ यांच्या लेखणीच्या प्रेमामुळे तुम्हाला पाहायला मिळाला आणि तुम्ही रसिक मायबाप जे प्रेम देत आहात असेच प्रेम करत राहा तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद…” महेशने लिहिलेल्या या पोस्टला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद देखील मिळाला. महेशने त्याच्या आजवरच्या जवळपास ३ वर्षाच्या कारकिर्दीत प्लॅंचेट सारखे विनोदी नाटक असो वा लागींर झालं जी, टोटल हुबलाक, चला हवा येऊ द्या, कारभारी लयभारी अशा विविध मालिकांमधून वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. यशाच्या अशा अनेक पायऱ्या तो एक एक करत यशस्वीपणे चढत राहो हीच एक सदिच्छा…

Categories
actors

अभिनेता आरोह वेलणकरच्या टीकेला दिग्दर्शक महेश टिळेकरांचे उत्तर

aaroh welankar and mahesh tilak
aaroh welankar and mahesh tilak

काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपट दिग्दर्शक तसेच मराठी तारका फेम महेश टिळेकर यांनी अमृता फडणवीस यांनी गायलेल्या गाण्यावर टीका केली होती. या टीकेला प्रतिउत्तर देत अभिनेता आरोह वेलणकर याने देखील महेश टिळेकर यांच्यावर टीका करत, “महेश टिळेकर तुमची टीका वाचून लाज वाटली. मराठी तारका नावाचा कार्यक्रम करता, स्त्री शक्ती, सम्मानाच्या गोष्टी करता, आणि ही कसली भाषा तुमची? नसेल आवडत तर नका एैकू, टीका करायची तर तमा बाळगून करा! कोण समजता तुम्ही स्वत:ला!?ह्या आधी व्हाया व्हाया माझ्यावरही आणि काही नटांवर तुम्ही अशीच टीका केली होती, तेव्हा दुर्लक्ष केलं. तुम्ही तुमच्या पोस्ट काय विचार करून, ओढून, पीऊन, समजून करता हे कळणं कठीण आहे! फुटेजसाठी करत असाल तर अधिकच हीन आहे तुमचं सगळं! सुधरा…राहीला प्रश्ण मराठी तारकांचा, तर ह्या पुढे ह्या तुमच्या स्टंटमुळे तुमच्या कार्यक्रमात कोण काम करतय बघू!” आरोह वेलणकरच्या या टिकेवर महेश टिळेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणतात की..

aaroh welankar and mahesh tilak
aaroh welankar and mahesh tilak

“Aroh Velankar बेसूर ,गाणारी स्वयंघोषित गायिका, जिच्यावर मी पोस्ट लिहिल्यामुळे तुझा थयथयाट होऊन तू मला धमकी वजा संदेश देतोय,तुझ्या बापाची मालकी आहे की राज्य आहे इथ, कोण माझ्याकडे कार्यक्रम करणार म्हणून तू धमकी देऊन मला सांगतोय.कलाकार तुझ्या दावणीला बांधले आहेत की त्यांचं पालकत्व घेतलं आहेस म्हणून तुझ्या सांगण्यावरून कलाकार ऐकणार.. आधी स्वतः चे करिअर बघ. आणि फुटेज पब्लिसिटी मिळवण्यासाठी तूच बिग बॉस मध्ये गेला होतास ना?का तिथे समाजसेवा करायला गेला होतास?ज्या कलाकारांच्या वर टीका केली तेंव्हा का तू बिळात जाऊन बसला होतास?ते तुझे समविचारी दिसतायेत म्हणून तुला मिरच्या झोंबल्या का? जेव्हा मराठी कलाकारांची लायकी ट्रेन नी फिरण्याची आणि गाय छाप तंबाखू खाण्याची आहे असं विधान तू ज्यांचा भक्त आहेस त्या राजकीय पक्षाच्या व्यक्तीने केले होते तेंव्हा तुझे रक्त उसळले नाही का?तेंव्हा कलाकारां ची बाजू घेऊन बोलायला पुढं का आला नाहीस रे?कुठं पिऊन पडला होतास की शेपूट घालून बसला होतास? तुझं वय जितकं आहे ना तितकी माझी कारकीर्द आहे. आता तुझा जळफळाट होतोय तेंव्हा कुठं गेला होतास रे तु,जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराज, मराठी भाषा , महापुरुषांचा, महाराष्ट्राचा, मुंबई पोलिसांचा अपमान इतर कलाकार करत होते तेंव्हा तू आईच्या पदराआड लपला होतास की मूग गिळून गप्प बसला होतास? स्त्री सन्मान आणि कला सन्मान यातला आधी फरक ओळखायला शिक.जे बेसूर आहे त्याला अमृतवाणी समजून डोक्यावर घेनाऱ्यातला मी नाही.आणि आठवत नसेल तर नीट आठव पुण्यात हनुमंत गायकवाड यांच्या ऑफिस मध्ये भेटून तू माझ्या कडे काम मागत होतास,ते विसरलास का?जिथं बोलायचं तिथं बोलतो मी ,आणि तुझ्यात खरीच हिम्मत असेल तर समोर येऊन धमकी दे म्हणजे माझी पोस्ट वाचून जी आग आणि धूर बाहेर येत आहे तो तुझ्या शरीरातील नेमका कोणत्या अवयवा मधून बाहेर येत आहे ते पाहून तुझं बिन टाक्याचे ऑपरेशन करायचे की टाके घालून ते मला ठरवता येईल…. महेश टिळेकर

Categories
actors

चाहत्यांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादानंतर अभिनेते “राजन पाटील” यांची आणखी एक पोस्ट

rajan patil marathi famous actor
rajan patil marathi famous actor

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक वेळ येते ज्या वेळी मृत्यूला ओढवण्याखेरीज दुसरा पर्याय आपल्याला सुचत नाही. कालच ज्येष्ठ अभिनेते राजन पाटील यांनी भावनेच्या भरात आपल्याला मृत्यू यावा अशी याचना एका पोस्टद्वारे केली होती. त्यावर अनके चाहत्यांनी मित्रमंडळींनी त्यांचे बळ वाढवत आयुष्य कसे सुखकर जगता येईल याबाबत कानउघडणी करणारे सल्ले दिले. चाहत्यांकडून मिळालेल्या भरभरून प्रतिसाद आणि प्रेमानंतर त्यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे त्यात ते म्हणतात…

rajan patil sir
rajan patil sir

नमस्कार मंडळी, माणसाच्या आयुष्यात कधी कधी असा एखादा क्षण येतो की तो माणूस राहत नाही. माणसाचा ऑथेल्लो किंवा हॅम्लेट का होतो याला तर्कशुद्ध उत्तर नाही. तो तसा होतो याला कारण त्याच्या आयुष्यातला ‘ तो ‘ क्षण. माझ्या आयुष्यात तो क्षण आला. सर्वकाही असह्य झालं. पराभव समोर उभा राहिला. आणि त्या क्षणाने घात केला.fb वर पोस्ट सोडली. कच खाल्ली. पण तुम्ही सगळे त्यावर इतक्या त्वेषानं व्यक्त झालात की माझ्यावरच्या त्या क्षणाची पकड क्षणात सुटली. सावध झालो. लज्जित झालो. खाडकन मुस्काटात बसल्यानंतर जाग यावी तसा भानावर आलो. स्वतःला खडसावले, ‘ साल्या, लोक तुला बघून, तुला आदर्श मानून आयुष्यात लढा सोडत नाहीत. हरणारी लढाई सुद्द्धा लढतात आणि प्रसंगी जिंकतात ही. आणि तू ? तुला लढायला हवं. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना तू फसवणार ? लाज वाटत नाही? नेता बनायची हौस आहे ना, मग नेत्यासारखे वाग. आता माघार नाही. शेंडी तुटो वा पारंबी, पण लढाई सोडायची नाही ‘ मंडळी, तुम्ही जो आवाज माझ्या कानाखाली काढलात त्याचे पडसाद आता माझ्या मृत्युबरोबरच्या लढाईत उमटणार हे निश्चित. मी पुन्हा हत्यार उपसले आहे. आता फक्त एल्गार ! हर हर महादेव ! …राजन पाटील.
राजन सर तुम्ही अनेकांचे प्रेरणास्थान आहात खचून न जाता आयुष्य सुखकर कसे होईल याचा पाठपुरावा सतत करत राहा आयुष्य एकदाच मिळते आणि ते खूप सुंदर आहे याच विचाराने पुढे चालत राहा…तुम्हाला पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा..

Categories
actors

माझी जीवनाशी चाललेली लढाई मी थांबवत आहे… मुरुत्युने मला घेऊन जावे असे म्हणत मराठी कलाकाराने केली प्रार्थना

आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करत त्याच्याशी दोन हात करत जेव्हा आपला संघर्ष कुठेतरी कमी पडतो त्यावेळी नको ते विचार आपल्या डोक्यात घर करून बसतात. याच भावनेने मराठी नाट्य तसेच सिने सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार “राजन पाटील” यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. मुळात राजन पाटील हे व्यक्तीमत्त्वच त्यांच्या चाहते आणि आसपासच्या मित्रमंडळी या सर्वांनाच आपल्या लेखणीतून नेहमी प्रोत्साहन आणि ऊर्जा देण्याचे काम करत असते. त्यामुळे माझी मृत्यूशी चाललेली लढाई मी थांबवत आहे असे त्यांचे म्हणणे कुठेतरी जिव्हारी लागते. नुकतेच सोशल मीडियावरन त्यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की…

actor rajan patil
actor rajan patil

“नमस्कार मंडळी, माझी मृत्यूशी चाललेली लढाई मी थांबवत आहे. मी शस्त्र टाकली आहेत. मानसिक दृष्ट्या मी हरलोय. माझं जगणं आता जगणं उरलं नाही. केवळ जिवंत राहणं एवढंच राहिलेय. मला त्यात स्वारस्य नाही. तुम्ही माझ्यासाठी एक करा, मृत्यूने मला लवकर घेऊन जावे, अशी प्रार्थना करा. नमस्कार… …राजन पाटील.”… राजन पाटील यांनी असे का म्हटले आहे ते ठाऊक नाही पण त्यांच्या या पोस्टवर अनेक सह कलाकारांनी त्यांना बळ देण्याचे काम केले आहे. आजारावर उपचार नक्कीच असतात खचून न जाता परिस्थिशी खंबीरपणे सामोरे जा असेच अनेकांनी त्यांना सुचवले आहे. राजन पाटील हे स्वतः लेखक आहेत. “रंग माझा”, “माझी माणसं” या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे. शिवाय तरुण तुर्क म्हातारे अर्क, रायगडाला जेव्हा जाग येते, मित्र, शर्यत, बरड, मुंबई आमचीच, तोची एक समर्थ या आणि अशा अनेक नाटक, चित्रपट तसेच दूरदर्शनवरील अनेक टीव्ही मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तूर्तास ज्येष्ठ अभिनेते राजन पाटील या आजारातून लवकरात लवकर बरे व्हावेत हीच सदिच्छा….

Categories
actors

केस कापणारा व्यक्ती कसा बनला करोडपती? पहा नक्की काय केलं ह्याने ज्यामुळे आज आहे खूपच श्रीमंत

वडिलांच्या निधनानंतर वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षीच संसाराचा गाडा चलवणारा हा व्यक्ती आहे एक सर्वसामान्य न्हावी. पण मग तुम्ही म्हणाल १०० ते १५० रुपये मिळकतीच्या जोरावर कोणी करोडपती होऊ शकतो का? तर त्याचे उत्तरही तुम्हाला हो असेच मिळेल. कारण या व्यक्तीने अशी काही युक्ती केली की ज्यामुळे आज या व्यक्तीकडे जवळपास ३७८ हुन अधिक चारचाकी गाड्या आहेत यात साधारण १२० लक्झरी गाड्यांचाही समावेश आहे. या व्यक्तीचे नाव आहे “रमेश बाबू” त्यांच्या बद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात..

ramesh babu pic
ramesh babu pic

कर्नाटकातील बंगलोर येथे रमेश बाबूंचे केस कापण्याचे दुकान आहे. १९७९ साली वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी रमेश बाबूवर येऊन पडली. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षीच घरोघरी दूध आणि वर्तमानपत्र जाऊन देण्याचे काम त्यांनी केले. त्यानंतर वयाच्या १८ व्या वर्षी स्वतःचे सलून चालवण्यास त्यांनी सुरुवात केली. हा व्यवसाय इतका वाढीस लागला की सकाळी ६ ते रात्री २ वाजेपर्यंत गिऱ्हाईकांची गर्दी जमू लागली. कधीकधी तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्यांना हे काम करावे लागे. व्यवसायात भरभराट होत असल्याचे पाहून एक चारचाकी वाहन घेण्याचे त्यांनी ठरवले. १९९३ साली मारुती ओम्नी ही पहिली चारचाकी गाडी त्यांनी हप्त्याने घेतली. काही दिवस सुरळीत सुरू असतानाच पुढे हप्ते भरण्यास अडचण येऊ लागली. आर्थिक चणचण वाढू लागली तेव्हा त्यांच्या काकूंनी ती गाडी भाडेतत्त्वावर देण्याचा सल्ला दिला. आपल्याला वेगळं काहीतरी करून दाखवायचं म्हणून त्यांनी काकूंच्या सल्ल्याचा विचार केला.

ramesh babus inspiring story
ramesh babus inspiring story

एक गाडी भाडेतत्त्वावर दिल्यानंतर आणखी एक गाडी खरेदी करण्याचे त्यांनी ठरवले. असे करता करता आज त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीच्या जवळपास ३७८ हुन अधिक चारचाकी गाड्या आहेत. ज्यात १२० मर्सिडीज, रोल्स रॉयल्स, जगुआर, ऑडी सारख्या लक्झरी गाड्यांचा समावेश आहे. आज रमेशबाबू एवढ्या गाड्यांचे मालक तसेच सर्वपरिचित कार रेंटल बीजनेसमन असूनही स्वतःचा सलूनचा व्यवसाय ते सांभाळत आहेत. स्वतः हातात कात्री घेऊन येणाऱ्या गिऱ्हाइकांचे ते आजही केस कापताना दिसतात. आपला मूळ व्यवसाय असाच टिकवून ठेवायचा असा त्यांचा मानस आहे. श्रीमंत झालो म्हणून आपला मूळ व्यवसाय सोडायचा हे त्यांना मुळीच पसंत नाही. या केस कापण्याचे त्यांना एका गिऱ्हाईकाकडून १५० रुपये मिळत असले तरी आपले पाय जमिनीवरच असावेत असे त्यांचे मत आहे. व्यवसाय कुठलाही असो त्याला युक्तीची जोड दिली की माणूस कुठल्याकुठे जाऊन पोहोचतो हे रमेश बाबूंकडे पाहिल्यावर समजते. प्रयत्न करा यश नक्कीच तुमचे असेल अशीच प्रचिती या उदाहरणावरून तरी देता येईल….

Categories
actors

“पंढरीची वारी” चित्रपटातील ही अभिनेत्री आजही दिसतात खूपच सुंदर

पंढरीची वारी चित्रपटातील “धरिला पंढरीचा चोर…” हे गाणं चित्रित झालं होतं अभिनेत्री नंदिनी जोग आणि बकुल कवठेकर या कलाकारांवर. आमच्या कालच्या पोस्टमध्ये “बकुल कवठेकर” हा कलाकार आज आपल्यात नाही हे वाचून अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या पाहायला मिळाल्या. खरं तर या कलाकाराला जाऊन अठरा वर्षे उलटली परंतु त्याने साकारलेला चित्रपटातील विठोबा साऱ्यांच्याच कायम स्मरणात राहणार एवढे मात्र खरे आणि तशाच स्वरूपाच्या प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्या. आजच्या लेखात आपण चित्रपटातील ‘नंदिनी जोग’ या अभिनेत्रीबद्दल अधिक जाणून घेणार आहोत…

pandharichi wari film actress
pandharichi wari film actress

त्यांनी या चित्रपटातून जयश्री गडकर आणि बाळ धुरी यांच्या मुलीची म्हणजेच ‘मुक्ताची’ भूमिका साकारली होती. अभिनेत्री नंदिनी जोग या मराठी चित्रपट सृष्टीतील सहाय्यक अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. पंढरीची वारी या चित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी कळत नकळत, वाजवू का, थांब थांब जाऊ नको लांब, दे धडक बेधकडक अशा चित्रपटातून सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत. अशोक सराफ, विजय कदम अशा मातब्बर कलाकारांसोबत त्यांना झळकण्याची संधी मिळाली. नंदिनी जोग या मूळच्या अकोल्याच्या परंतु लग्न करून पुण्यातच त्या स्थायिक झाल्या आहेत. जाहिरात क्षेत्रात कार्यरत असलेल्या अभिजित जोग यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. अभिजित जोग यांनी पुण्यात ‘प्रतिसाद ऍडव्हरटायझिंग’ नावाने एजन्सी उभारली आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते ऍडव्हरटायझिंग तसेच ब्रँडिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. याच क्षेत्राशी निगडित असलेले “ब्रँडनामा” या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे. तर त्यांचा मुलगा ‘अनिश जोग’ हाही मराठी चित्रपट क्षेत्राशी निगडित असलेला पाहायला मिळतो.