महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सिनेविश्वातील झगमगीत कायमच चमकत असतात. सध्या त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतायत. ज्यामुळे नेहमी प्रमाणे काही जण त्यांचं कौतुक करत आहेत तर, काही जण त्यांना ट्रोल करत आहेत. व्हायरल होत असलेले फोटो नेमके कुठले आहेत? आणि काय आहे त्या फोटोंमध्ये हेच जाणून घेऊ. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टीवलमध्ये आज बॉलिवूडमधील अनेक मंडळी पाहायला मिळाली. अशात या सर्वांमध्ये रेड कार्पेटवर अमृता फडणवीस यांनी देखील मोठ्या रुबाबात एन्ट्री मारली. यावेळी त्यांनी काळपट राखाडी रंगाचा एक वनपीस परिधान केला होता.

या लूकमध्ये अमृता अतिशय सुंदर दिसत होत्या. त्यांनी कान्स फिल्म फेस्टीवलमध्ये हजेरी लावल्यानंतर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तेथील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. तसेच हे फोटो शेअर करत त्यांनी असे लिहिले आहे की, ” “कान्स चित्रपट महोत्सव २०२२ मध्ये रेड कार्पेटवर हजेरी लावली. अन्न, आरोग्य आणि शाश्वत (विकास) या विषयांसंदर्भातील जगृकतेसाठी हा कार्यक्रम होता. आयव्हरी कोस्टच्या फर्स्ट लेडी डॉमिनिक ओउटारा, राजकुमारी गिदा तलाल, अभिनेत्री शेरॉन स्टोन, किरा चॅम्पलिन यांच्यासोबत रेड कार्पेटवर हजेरी लावली. हा कार्यक्रम बेटर वर्ल्ड फाउण्डेशनने आयोजित केला होता. ” अमृता या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याने अनेकांनी त्यांचे कौतुक केले. तसेच अन्न, आरोग्य आणि विकास या मुद्द्यांवर हा कार्यक्रम असल्याने अमृता फक्त त्या कार्यक्रमासाठी नाही तर, त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून देखील तेथे आल्या होत्या असे समजते. त्यांना आधीपासून कलेची फार आवड आहे.

अशात कलेसह त्यांचं सामाजिक कार्यातील कर्तुत्व देखील फार मोठं आहे. अमृता यांनी काही दिवसांपूर्वी कान्स फिल्म फे्टिव्हलमध्ये पोहोचल्याचा एक फोटो पोस्ट केला होता. त्यावेळी अनेकांना त्या या कार्यक्रमात का गेल्या आहेत? असा प्रश्न पडला होता. याचं प्रश्नाचं उत्तर देत त्यांनी नंतर रेड कार्पेटवरील हे फोटो पोस्ट केले आणि सर्व प्रश्नांची उत्तरे देणारे एक कॅपशन लिहिले. अमृता सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. मग यामध्ये कोणता राजकीय विषय असो अथवा मनोरंजनातील विषय असो. त्या आपलं मत नेहमीच परखडपणे मांडतात. अशात अनेकदा त्यांना सोशल मीडियावर ट्रोलींगचा देखील सामना करावा लागतो.