रामायण मालिकेच्या लोकप्रियतेनंतर त्यावर चित्रपट बनवला जावा अशी चर्चा जोर धरताना दिसत होती. सुरुवातीला सीतामातेची भूमिका अभिनेत्री करीना कपूर साकारणार असे बोलले जात होते मात्र प्रेक्षकांनी तिच्या सीतामातेच्या भूमिका निभावण्याला विरोध दर्शवला होता. त्यानंतर ही भूमिका अभिनेत्री कंगना राणावत साकारेल असे सांगितले जात होते मात्र तिचेही नाव आता मागे पडलेले पाहायला मिळत आहे कारण रामायण चित्रपटात दीपिका पदुकोण सीता मातेची भूमिका साकारणार असा शिक्कामोर्तब आता केला आहे. तर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत रणबीर कपूर झळकणार असल्याचे सांगितले जात आहे. रामायण चित्रपटात रावणाचे स्थान देखील तितकेच महत्वाचे आहे ही भूमिका अभिनेता हृतिक रोशन साकारणार आहे.

रावणाच्या तगड्या भूमिकेसाठी हृतिक खूप मेहनत घेताना दिसत आहे. बॉलिवूडचा बिग बजेट असलेला हा चित्रपट बनवण्यासाठी तब्बल ७५० कोटींहून अधिक खर्च करण्यात येत असल्याचे सांगितले जाते. रामायण हा थ्रीडी चित्रपट आहे आणि त्याचमुळे ह्यावर अवाढव्य खर्च केला जाणार आहे. तर चित्रपटातील मुख्य भूमिका निभावणारे रणबीर कपूर आणि हृतिक रोशन तगडे मानधन घेत असल्याची खात्री मीडियाने दिली आहे. हे दोन्ही कलाकार या चित्रपटात काम करण्यासाठी प्रत्येकी ७५ कोटींचे मानधन घेत आहेत त्यामुळे हे मानधन पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मधू मंटेना या चित्रपटाची निर्मिती करणार असून नितेश तिवारी दिग्दर्शनाची धुरा संभाळणार असल्याचे सांगितले जाते. रामायण हा एक बिग बजेट चिञपट असल्याने त्याचा सेट देखील भव्य असणार हे निश्चित आहे त्यात हा चित्रपट थ्रीडी असल्याने चित्रपट बनवण्यासाठी खूप मोठा खर्च होणार आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी ७५० कोटी हुन अधिक खर्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रामायण चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायला प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत त्यामुळे याबाबत अपडेट काय मिळतात याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागून आहे.