ह्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीचं झालं नुकतच निधन पती देखील होते डायरेक्टर आणि प्रोड्युसर

बॉलीवूड चित्रपट आणि हिंदी मालिका एकेकाळी गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी हिच्या पतीचं म्हणजेच राज कौशल ह्यांचं आज बुधवारी सकाळी ११. १० मिनिटांच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. राज कौशल हे ४९ वर्षांचे होते त्यांनी अनेक प्रसिद्ध चित्रपट तसेच मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. मंदिरा बेदीआणि राज कौशल ह्यांना दोन मुले आहेत तर मागील वर्षीच त्यांनी एका मुलीला दत्तक देखील घेतले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

राज कौशल यांनी मंदिरा बेदी हिला नेहमीच अकटिंग साठी प्रेरित केलं होत. राज कौशल ह्यांनी अभिनेता म्हणून आपल्या करिअर ची सुरवात केली होती. “प्यार में कभी कभी”, “शादी का लड्डू” आणि “अँथनी कोण हे” ह्या ३ चित्रपटांचं निर्देशन केलं आहे. मंदिरा बेदी आणि राज कौशल ह्यांची ओळख मुकुल आनंद ह्यांच्या घरी झाली होती. मंदिरा त्यावेळी ऑडिशन देण्यासाठी आली होती आणि राज हे आनंद ह्यांचे असिस्टंट म्हणून काम पाहत होते. पुढे दोघांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. पुढे ३ वर्षांनी १४ फेब्रुवारी १९९९ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. पुढे मंदिराने इंडियन प्रीमिअर लीग मध्ये देखील अँकरिंगच काम केलं होत त्या कामाचं अनेकांनी कौतुक देखील केलं होत. अभिनयासोबत त्यांना खेळाबद्दल असलेली माहिती आणि अनुभव पाहून त्यावेळी सर्वच अचंबित झाले होते.