हिंदी चित्रपट सृष्टीतील देखणी नायिका म्हणून मधुबाला हिला केवळ भारतातच नव्हे तर सर्वदूर ओळखले जात होते. मात्र अवघ्या ३६ व्या वर्षीच या नायिकेने जगाचा निरोप घेतला होता. मधुबाला यांची हिंदी चित्रपट सृष्टीतील कारकीर्द देखील खूपच कमी ठरली मात्र या कालावधीतही त्यांनी आपल्या सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. मधुबाला यांचे कुटुंब खूप मोठे होते अकरा बहीणभावंडांमध्ये त्या पाचव्या होत्या. मधुबाला यांची मोठी बहीण ‘कनिज बलसारा’ या सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत येऊ लागल्या आहेत.

त्यांच्या सुनेने कनिज यांना घरातून हाकलून दिले आणि बिना पैशाच्या त्या भारतात आपल्या लेकीकडे पोहोचल्याने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. मधुबालाची भाची म्हणजेच कनिज बलसारा यांची लेक परवेझ या मुंबईत वास्तव्यास आहेत याबाबत सविस्तर माहिती त्यांनी मीडियाला दिली आहे याबत अधिक माहिती अशी की, मधुबाला यांची ९६ वर्षांची बहीण कनिज बलसारा या गेल्या १७ ते १८ वर्षांपासून न्यूजीलंडला फारुक या त्यांच्या मुलाकडे राहायला गेल्या होत्या. आई आणि मुलाचे नाते अगदी जीवापाड होते त्यामुळे फारुकने आपल्या आई आणि वडिलांना परदेशात सोबत नेले होते. मात्र फारूकची पत्नी सबिना सासू सासऱ्यांचा खूप छळ करत होती. त्यांना घरात खायला देखील देत नव्हती हे पाहून फारूक शेजारच्या रेस्टोरंट मधून आई वडिलांसाठी जेवण मागवत होता. परवेझ यांचे म्हणणे होते की माझ्या आईला सबिनाने खूप त्रास दिला आहे.

सबिनाची मुलगी देखील चांगली सेटल झाली आहे मात्र ती देखील माझ्या आईला खूप त्रास देत होती. गेल्या महिन्यात ८ जानेवारी रोजी माझ्या भावाचे निधन झाले त्यानंतर सबिनाने आईला खूप त्रास द्यायला सुरुवात केली . माझा भाऊ हयातीत असताना तिने आईला एवढा त्रास दिला होता त्याच्या निधनानंतर तिने आईला किती त्रास दिला असेल याची कल्पनाच करवत नाही. काही दिवसांपूर्वीच कनिज बलसारा ऑकलंडहुन मुंबईला कुठल्याही आधाराशिवाय आणि पैशाशिवाय आल्या आहेत. समिनाने कनिज यांना विमानात बसवून दिले होते त्यानंतर २९ जानेवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्या मुंबईत दाखल झाल्या.मुंबईतील वांद्रे परिसरात त्यांची मुलगी परवेझ राहत होत्या. परवेझला आईबद्दलची ही माहिती तिच्या चुलत भावाकडून मिळाली होती. या महितीबाबत मधुबाला यांची धाकटी बहीण मधुर भूषण यांना देखील मोठा धक्का बसला आहे.