Breaking News
Home / जरा हटके / सिध्दार्थ कियारा यांनी केलं ब्रेकअप ? ब्रेकअप झाल्याच्या चर्चेला खुद्द सिद्धार्थने असं केलं खंडन

सिध्दार्थ कियारा यांनी केलं ब्रेकअप ? ब्रेकअप झाल्याच्या चर्चेला खुद्द सिद्धार्थने असं केलं खंडन

बॉलिवूडमध्ये सध्या लगीनघाई सुरू आसिध्दार्थ कियारा हे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी दोनाचे चार केल्यानंतर आता पुढची लग्नघटिका कुणाची या चर्चेत सगळ्यात आघाडीवर असलेलं नाव म्हणजे सिध्दार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी. या दोघांच्या लग्नाच्या तारखेकडे लक्ष लावून बसलेल्या चाहत्यांवर त्यांच्या ब्रेकअपची बातमी ऐकण्याची वेळ आली आहे. गेल्याच आठवड्यात सिध्दार्थची एक्स गर्लफ्रेंड अलिया भट्टने रणबीरच्या गळ्यात माळ घातल्यानंतर तर सिध्दार्थ आणि कियारानेही आता दोनाचे चार करावेत असा सल्ला चाहते देतच होते. पण अचानक सिध्दार्थ आणि कियारा या लव्हबर्डसचे मार्ग वेगळे झाल्याची बातमी धडकली. सुरूवातीला ही अफवा असेल असेल असे चाहत्यांना वाटले.

siddharth and kiyara
siddharth and kiyara

पण नुकतीच सिध्दार्थ आणि कियारा यांनी त्यांच्या सोशलमीडियावर अशी काही गूढ पोस्ट टाकली आहे की ती वाचून त्यांचं खरच ब्रेकअप झाल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. सिध्दार्थने त्याच्या इन्स्टापेजवर प्रसन्न सकाळचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोपेक्षाही त्याने लिहिलेल्या ओळी खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत. त्याने असं म्हटलं आहे की, सूर्यप्रकाश नसलेला दिवस म्ह्णजे अंधारमय दिवस असतो. तुलाही हे माहित आहे. माझे आयुष्य आता सूर्यप्रकाश नसलेल्या दिवसासारखे आहे. यावरून कियारा त्याच्या आयुष्यातून वजा झाल्याची हिंटच सिध्दार्थने दिली आहे. कियारानेही अशाच प्रकारची गूढ पोस्ट करून सिध्दार्थसोबतच्या नात्याला पूर्णविराम दिल्याचे सांगितले आहे. कियाराने तिच्या इन्स्टापेजवर बागेतील बहरलेल्या फुलांसोबतचा हसरा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोसोबत कियारा म्हणतेय की, हसत रहा. हसवत रहा. जर बाग बहरत ठेवायची असेल तर कापणी करणंही गरजेचं असतं, तसच आयुष्य बहरत ठेवायचं असेल तर कधी कधी प्रेमाची कापणीही करावी लागते. कियाराची ही कॅप्शन तिने सिध्दार्थसोबतच्या प्रेमाला कट केल्याची हिंट देत आहे..

kiyara advani and siddharth malhotra
kiyara advani and siddharth malhotra

शेरशाह या सिनेमात सिध्दार्थ आणि कियारा यांची केमिस्ट्री जशी पडद्यावर बहरली तशी प्रत्यक्ष आयुष्यातही हे दोघे रिलेशनशीपमध्ये आले. गेल्या दोन वर्षापासून या दोघांची लव्हस्टोरी बॉलिवूडमध्ये गाजत होती. अनेक कार्यक्रमात या दोघांचं एकत्र येणं हे त्यांच्या खास नात्याचं प्रतीक होतं. सिध्दार्थ आणि कियारा यांनी त्यांच्यातील रिलेशनशीप कधी जाहीर केली नसली तरी अनेक शोमध्ये सिध्दार्थचं नाव घेतल्यावर कियारा लाजायची. मात्र आता त्यांच्यात ब्रेकअप झाल्याचे दोघांच्याही पोस्टमधून दिसत आहे. पण हि सगळी अफवा असल्याचं नुकतंच उघड झालंय कियाराच्या भूल भुलय्या २ च्या चित्रपट प्रमोशन दरम्यानच्या एका पोस्टमध्ये सिद्धार्थने ह्याच खंडन करत तिला शुभेच्या देत जोडी सलामत असल्याचं उघड केलंय. असो सिध्दार्थ कियारा यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *