बॉलीवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी आहे मराठी अभिनेत्री “सोन्याची पावलं” मालिकेत साकारतीय महत्वाची भूमिका

हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांत अनेक वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलेला अभिनेता म्हणून “शक्ती आनंद” याला ओळखलं जात. अग्निपंख, देखा जायेगा, आय लव्ह देसी, अरशो अश्या अनेक चित्रपटांत त्याने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ , ‘संसार’, शु… कोई है’ , ‘कुसुम’, ‘डोली सजाके’, ‘आहट’, ‘संभव असंभव’, ‘ एक लाडकी अंजानी’ अश्या २५ पेक्षा जास्त मालिकांत त्याने हिरो ची प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटांपेक्षा छोट्या पडद्यावर त्याला खूपच प्रसिद्धी मिळाली. क्राईम पेट्रोल आणि झी अवॉर्ड्स सारख्या कार्यक्रमांत त्याने अँकरिंग देखील केली आहे.

शक्ती आनंद हा पंजाबी असला तरी त्याचा जन्म दिल्ली मध्ये झाला. २००५ साली त्याने मराठी अभिनेत्री “सई देवधर” हिच्याशी लग्नगाठ बांधली. एका मालिकेच्या शूटिंग दरम्यान दोघांची ओळख झाली होती. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि काही दिवसांतच दोघांनी लग्न केलं. अभिनेत्री सई देवधर हि देखील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. सईचे वडील डेबू देवधर हे सिनेमॅटोग्राफर होते तर आई श्रावणी देवधर या मराठी चित्रपट दिग्दर्शिका आहेत. अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. मराठी चित्रपट लपंडाव ह्या चित्रपटाची दूर देखील त्यांनीच सांभाळली होती. ह्याच लपंडाव चित्रपटात बालकलाकार म्हणून सई देवधर हिने देखील सुनील बर्वे यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. सारा आकाश , बात हमारी पक्की है, उडाण , द शोले गर्ल, एक लडकी अनजानी सी अशा हिंदी मालिकेत तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. सारा आकाश ह्या हिंदी मालिकेत तिने प्रमुख भूमिका साकारली होती याच मालिकेत तिचा पती शक्ती आनंद देखील प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाला.

बऱ्याच दिवसानंतर तिने मोगरा फुलला ह्या चित्रपटात स्वप्नील जोशी सोबत प्रमुख भूमिका साकारली होती. सायलेंट टाय, ब्लड रिलेशन, बढाई हो, संस्कारी अशा चित्रपट, शॉर्टफिल्मच्या दिग्दर्शनाची धुरा तिने सांभाळली होती.साटं लोटं पण सगळं खोटं, संस्कारी, आणि आता सध्या कलर्स मराठी वाहिनीची ‘सोन्याची पावलं’ मालिकेची निर्मिती तिने केली आहे. ‘सोन्याची पावलं’ याच मालिकेत ती अभिनय करताना देखील पाहायला मिळतेय. या मालिकेत ती देवी आईची भूमिका साकारतेय तिचा अभिनय सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसतो. अभिनेता शक्ती आनंद आणि अभिनेत्री सई देवधर ह्यांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव नक्षत्रा आनंद असे आहे. नक्षत्रा आनंद देखील दिसायला खूपच सुंदर आहे. अभिनेता शक्ती आनंद आणि अभिनेत्री सई देवधर ह्यांना त्यांच्या आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…