मनोरंजन विश्वातील झगमग आणि तिथली आलिशान दुनिया सर्वांनाच हवीहवीशी वाटते. मात्र मनाला भोवणाऱ्या या दुनियेची अनेक कटू रहस्य नेहमीच समोर येताना पाहायला मिळतात. अशात काही कडवट रहस्यांमधील एका रहस्याचा खुलासा स्वतः अक्षय कुमारने केला आहे. काही दिवसापूर्वी अक्षरकुमार याने ह्याचा खुलासा केला आहे. यामुळे बॉलीवूडची काळी बाजू चित्रपट प्रेमींच्या समोर आली आहे. अक्षय कुमार याचा अभिनेता अनुपम खेर याने घेतलेली हि मुलाखत खूपच व्हायरल झाली आहे. बॉलिवूडचा खिलाडी म्हणून अभिनेता अक्षय कुमार नेहमीच लाईम लाईटमध्ये असतो. अशात त्याचे ‘पॅडमॅन’, ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ असे सामाजिक संदेश देणारे अनेक चित्रपट तुम्ही पहिले असती.

अक्षयच्या स्टंटवर आख्खी तरुणाई फिदा आहे. इतकंच काय तर मराठी चित्रपटासाठी देखील त्याच योगदान आहे. मात्र आता पर्यंत त्याच्या वाट्याला १३ नामांकन मिळून देखील फक्त २ फिल्फमफेअर पुरस्कार त्याला मिळाले आहेत. तर या मागचं कारण सांगतानाचा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतं आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय हातात एक पुरस्कार घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. यावेळी तो म्हणातो आहे की, “माझा मुलगा मला नेहमी विचारतो की, हे काय आहे बाबा. नेहमी सगळे पुरस्कार शाहरुख खान आणि ऋतिक रोशन घेऊन जातात. तुम्हाला कधी मिळणार आहे पुरस्कार. तर आज मी मोठ्या अभमानाने माझ्या मुलाला सांगू शकतो की, आज मला पुरस्कार मिळाला आहे.” त्यानंतर तेथील एक अभिनेता पुढे येऊन म्हणतो की, “या पुरस्कारासाठी नामांकनामध्ये तुझं नाव दोन वेळा घेतलं होतं. आणि तुला वाटलं की, हा पुरस्कार तुला मिळाला आहे.” मित्रानो हा एक कॉमेडीचा भाग होता पण ह्यातून अक्षयला काय सांगायचं होत हे तेथे उपस्तित लोकांना चांगलंच समजलं होत.

एका मुलाखतीत अभिनेता अनुपम खेर अक्षयला विचारतो कि आपण दोघे काम केलेला “स्पेसिअल २६” हा चित्रपट आजही लोक आवडीने पाहतात. ह्या चित्रपटात पाहण्यासारखं खूप काही आहे. पण ह्या चित्रपटाला एकही पुरस्कार मिळाला नाही. खरतर मला वाटलं होत कि नॅशनल अवॉर्ड्स साठी ह्या चित्रपटाला पुरस्कार मिळेल पण तास काही झालं नाही. यामध्ये अनुपम खेर अक्षयला विचारतात की, तुला पुरस्कार का मिळत नाही. यावर अक्षयने दिलेलं उत्तर अनेकांच्या डोळ्यावरची झापड उडवणार ठरलं आहे. अक्षय उत्तर देत म्हणतो की, “ते लोक पुरस्कार देण्यासाठी आधी संगीतात की, तुम्हाला पैसे भरावे लागतील.” इतकच काय तर अक्षय स्वतः स्टंट करतो रोहित शेट्टी अनेकदा त्याबद्दल त्याची तारीफ करतो पण ह्या बद्दल कधीही कोठे कोणी बोलताना दिसत नाही. इतर अभिनेते डमी वापरून स्टंट करून घेतात पण त्यांचाच बोलबाला केला जातो. बॉलीवूडमध्ये आजवर अनेक खऱ्या कलाकारला डावलण्यात आलं आहे. याची अनेक उदाहरणे देखील आहेत. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अनेकांनी बोकायकॉट बॉलीवूडचा नारा दिला होता. मात्र अद्यापही बॉलिवूडमधील काही पैसे देऊन नावाजलेल्या लोकांची मनमानी कायम आहे. अक्षय कुमार बॉलीवूडचा सर्वात जास्त टॅक्स पेयर आहे त्याचे चित्रपट नेहमीच पाहण्यासारखे असतात बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई करतात मात्र त्याला कोणताही पुरस्कार मिळत नाही हेही तितकंच खर.