‘खिलाडियो का खिलाडी’ म्हणजे अक्की अर्थात अक्षय कुमार.. काम कोणतंही असो खिलाडी अक्की त्यात अव्वल असतोच… अभिनय असो किंवा इतर कोणतंही काम त्यात अक्की कोणतीही कसर सोडत नाही. प्रत्येक कामात एव्हरेडी असणारा सळसळता उत्साह, जोष, जल्लोष आणि मेहनत हेच खिलाडी अक्षयच्या यशाचे खरं कारण आहे. त्यामुळेच आता भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महागडा अभिनेत्याच्या यादीत अक्षय कुमारचे नाव गणले जाते.

रोमान्स, ऍक्शन, कॉमेडी, देशभक्ती अशा वेगवेगळ्या विषयांवरील अनेक हिट चित्रपट देणारा अभिनेता अक्षय कुमार त्याच्या फिटनेससाठी जास्त प्रसिद्ध आहे. प्रचंड लोकप्रिय असलेला अक्षय कुमार मोठा सेलिब्रेटी झाला आहे. त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संकटात मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत दिल्यामुळे नव्याने चर्चेत आलेल्या अक्षयने नुकतेच केंद्र सरकारच्या एका जाहिरातीत देखील काम केले. पण बॉलिवुड चा हा खिलाडी मराठी चित्रपटांचा देखील खूप मोठा फॅन आहे. त्याला एका इंटरव्ह्यू मधे मराठी चित्रपटांबाबत विचारले असता अक्षय ने मला मराठी चित्रपट आवडतात आणि मी ते बघतो असे म्हणले आहे. अक्षय ला एका इंटरव्ह्यू घेणाऱ्या महिलेने एक प्रश्न केला होता. त्यांनी विचारल होत की मराठी चित्रपट आणि बॉलिवुड चित्रपट हे नेहमीच वादाचा विषय बनून राहिले आहेत मराठी चित्रपटांना सध्या स्क्रीन मिळत नाही ह्याबाबत तुझं काय मत आहे. ह्यावर उत्तर देताना अक्षय ने म्हंटले की पी व्ही आर आणि सिनेमे ह्यांतले वाद मिटले आहेत आणि आता पी व्ही आर मधे चित्रपटांना स्क्रीन उपलब्ध आहेत.

पण मराठी चित्रपटांबद्दल बोलताना अक्षय म्हणाला की मला स्वतःला अस वाटत की मराठी चित्रपट हे बॉलिवुड चित्रपटांपेक्षा चांगले आहेत. मराठी चित्रपटांचा स्क्रीन प्ले आणि स्क्रिप्ट हे बॉलिवुड च्या चित्रपटांपेक्षा नक्कीच चांगले आहेत. मी स्वतः मराठी सिनेमे बघतो , मला मराठीतील जुने चित्रपट पाहायला फारच आवडतात. मराठी कलाकार खूप मेहनती असतात मी स्वतः मराठी चित्रपटबनवले आहेत. अशा भाषेत अक्षय ने मराठी चित्रपटांचं कौतुक केले आहे. अक्षय ने अस सुद्धा म्हंटले आहे की देवाची कृपा आहे म्हणूनच मला पहिल्यापासूनच मराठी बोलता येते. मी मराठी बोलू शकतो. एवढच नाही तर मराठी सिनेमा बघताना त्यावर कोणतेही इंग्रजी सबटायटल नसतील तरीही मी पूर्ण सिनेमा कोणत्याही तक्रारी शिवाय बघू शकतो. मला सिनेमातील पूर्ण संभाषण समजत.यावरूनच आपल्याला कळून येते की बॉलिवुड चा हा खिलाडी कुमार मराठी चित्रपटांचा देखील तितकाच मोठा फॅन आहे.