बिग बॉस मराठी सीजन ३ सुरवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात पाहायला मिळाला. ऐकून १७ स्पर्धकातील एक एक बाहेर पडत गेला आणि शेवटी ५ स्पर्धकात कोण विजेता घोषित होणार असा प्रेक्षकांना प्रश्न पडलेला. २६ डिसेबर या तारखेला महाअंतिम सोहळा पार पडला अख्या महाराष्ट्राला उत्सुकता होती कि नेमका कोण विजेता होणार. शेवटी पाच स्पर्धक फायनल मध्ये पाहायला मिळाले जय दुधाने ,मीनल शहा ,विशाल निकम ,उत्कर्ष शिंदे ,विकास पाटील हे टॉप पाच फायनॅलिस्ट पाहायला मिळाले यात मीनल ने सगळ्यात आधी तिकीट मिळवल्याने सगळ्यांना वाटायचं कि मीनल हीच विजेती होणार आणि शेवटी मीनल,विकास उत्कर्ष हे घरा बाहेर पडले मग जय दुधाने आणि विशाल निकम यांच्यात एक निवडण्यात आला तो होता अभिनेता विशाल निकम.

अभिनेता विशाल निकम आणि कीर्तनकार शिवलीला ताई पाटील दोघेही बिगबॉसच्या घरात एकत्र पाहायला मिळालेले. दोघांत चांगली मैत्री देखील झाली. विशाल देखील हरिभक्त पारायनाशी लहानपणापासूनच जोडला गेला आहे. कदाचित यामुळेच शिवलेला ताई आणि विशाल निकम यांचे विचार जुळले. शिवलीला आजारी असताना देखील विशाल निकम तिला सपोर्ट करताना पाहायला मिळाला. त्याचे अश्रू अनावर झाले सोशिअल मीडियावर विशालची खिल्ली देखील उडवली गेली पण म्हणतात ना सत्याचा नेहमीच विजय होतो आणि अगदी तसच घडलं देखील. अभिनेता विशाल निकम बिगबॉस मराठी सीजन ३ चा विजेता ठरला. ग्रँड फिनाले वेळी सर्वच स्पर्धकांनी बिगबॉसच्या घरात हजेरी लावली पण कीर्तनकार शिवलीला ताई पाटील मात्र ह्यावेळी उपस्थित नव्हत्या. त्याच कारण देखील तसेच होत. सोशल मिडियावरच नव्हे तर महाराष्ट्रातील संप्रदाय समजातील अनेकांनी त्यांना धारेवर धरले होते. इथून पुढे आम्ही त्यांचे कीर्तन ऐकणार नाही अशी भूमिकाच त्यांच्याविरुद्ध घेण्यात आली होती. त्यामुळे बिग बॉसच्या घरात येण्यामागचा आपला हेतू नेमका काय होता याचा खुलासा त्यांनी केला होता. आठ दिवसांच्या कालावधीत शिवलीला पाटील बिग बॉसच्या घरात राहिल्या मात्र ह्या घरात नेमकं कसं वागायचं हेच त्यांना समजत नव्हतं. मला हा खेळ समजलाच नाही असं स्पष्ट शब्दात त्यांनी मत मांडलं होतं. मी ह्या घरात कीर्तनकार म्हणून आले आपली परंपरा कानाकोपऱ्यात पोहोचावी याच उद्देशाने मी ह्या घरात आले होते अशी बाजू त्यांनी मांडली होती.

त्यावेळी त्यांनी समस्त वारकरी संप्रदायाची हात जोडून माफी मागितली होती. आपल्यावर टीका केली जात असल्याचे पाहून त्यांनी पुन्हा बिग बॉसच्या घरात जाणार नसल्याचा निर्णय घेतला होता. याच कारणास्तव शिवलीला पाटील महाअंतिम सोहळ्याला देखील उपस्थित राहू शकल्या नाहीत. बिगबॉसच्या घरात विशाल निकम म्हणाला होता कि ह्या घरातून जेंव्हा मी बाहेर पडेल तेंव्हा सर्वात आधी मी कीर्तनकार शिवलीला ताई पाटील ह्यांची नक्की भेट घेईल. आणि आता विजेता झाल्यावर त्यांनी जे बोललं ते करून दाखवलं. विशाल निकम एक पोस्ट शेअर करत म्हणतो ” बिग बॉसच्या घरामध्ये मी बोललो होतो, पहिलं जर कोणाला भेटीन तर शिवलीला ह्यांना आणि आज आमची भेट झाली ती सुद्धा मार्गशीर्ष महिन्यात….माऊलींच्या पंढरपुरात! ही भेट माऊलींनीच घडवून आणली असावी!” ह्या दोघांच्या जे बोललं ते करून दाखवल्याचा आंनद त्यांचे चाहते व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. आपण वारकरी संप्रदायातले असल्याने त्यांनी भेटण्यासाठी माऊलीच्या पंढरपुरातील जागा निवडली ह्याच देखील भरभरून कौतुक केलं जातंय.