बिग बॉसचा हिंदी रिऍलिटी शो असो वा मराठी त्याच्या प्रत्येक सिजनला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळालेली दिसते. सध्या कलर्स मराठी वाहिनीवर मराठी बिग बॉसचा ३ रा सिजन धुमाकूळ घालताना दिसत आहे तर लवकरच हिंदी बिग बॉसचा १५ वा सिजन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १५ व्या सिजनमध्ये कोणकोणते कलाकार झळकणार याची संभाव्य यादी सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. याच बिग बॉसच्या नव्या सिजनच्या आगमनाने आता एक सदस्य चर्चेत येत आहे.

बिग बॉसच्या ४ थ्या सिजनमधली कंटेस्टंट ‘साक्षी प्रधान’ ही प्रेग्नन्ट असल्याची बातमी त्यावेळी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. या सिजनमध्ये साक्षी प्रधान दाखल झाली तेव्हापासूनच बिग बॉसच्या घरात तिला गरज पडेल तेव्हा कन्सल्ट करण्यासाठी डॉक्टरांना बोलावले जात होते. तिच्यासोबत वीणा मलिक, सारा खान आणि श्वेता तिवारी या देखील कंटेस्टंट बनून बिग बॉसच्या घरात दाखल झाल्या होत्या तेव्हा साक्षीने आपली पाळी चुकली असल्याचा खुलासा या तिघींकडे केला होता. त्यावरून साक्षी प्रेग्नन्ट आहे अशी चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर तिने एक मुलाखत दिली त्या मुलाखतीत प्रेग्नन्ट असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत, ‘ मी आत्ताकुठे २१ वर्षांची आहे आणि या वयात मी फक्त माझ्या करिअरकडे लक्ष्य केंद्रित केले आहे मग मी प्रेग्नन्ट कशी असू शकते?’ असा सवाल उपस्थित केला होता. तिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा तिने दिलेल्या खुलास्याने आटोक्यात आल्या.

रागिनी एमएमएस रिटर्न्स मधून साक्षी प्रधानने हिंदी क्षेत्रात पदार्पण केले होते. ही पहिलीच गाजलेली वेबसिरीज तिने अभिनित केली होती त्यानंतर साक्षी स्प्लिट्सव्हीलाच्या दुसऱ्या सिजनची विनर ठरली होती. स्प्लिट्सव्हीला या रिऍलिटी शोमुळे तिला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. बॅडमॅन, तमन्ना, पॉइजन, सेक्सी साक्षी सिजन 3, नागीण अशा मालिका आणि वेबसिरीजच्या माध्यमातून ती प्रेक्षकांसमोर आली होती. साक्षीचा इंटिमेंट सिन असलेला एक एमएमएस सोशल मीडियावर लिक झाला होता. त्यावरून तिला प्रसिद्धी मिळाली आणि बिग बॉसच्या ४ थ्या सिजनमध्ये कंटेस्टंट बनण्याची संधी मिळाली. एवढेच नाही तर साक्षी नेहमीच आपल्या बोल्ड, टॉपलेस फोटोंमुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री आहे.