हिंदी बिग बॉसच्या १५ व्या सिजनचा फिनाले रविवारी ३० जानेवारी रोजी पार पडला. तेजस्वी प्रकाश बिग बॉसच्या १५ व्या सिजनची विजेती ठरली. तेजस्वी प्रकाश ला बिग बॉसच्या ट्रॉफीसोबतच ४० लाख रुपयांची रक्कम मिळाली आहे. विजयाची ही ट्रॉफी जिंकताच तेजस्वीने आपल्या आई वडिलांची भेट घेऊन ती ट्रॉफी त्यांच्याकडे सुपूर्त केली आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचले असे म्हणत आभार मानले. तेजस्वी प्रकाशला तगडी टक्कर देणारा प्रतीक सेहजपाल हा फर्स्ट रनर अप ठरला.

बिग बॉसच्या टॉप ५ मध्ये तेजस्वी प्रकाश , करण कुन्द्रा, प्रतीक सेहजपाल , शमिता शेट्टी आणि निशांत भट्ट यांनी स्थान मिळवले होते. टॉप पाचच्या स्पर्धकांना एक ब्रिफकेस ऑफर करण्यात आली त्यात १० लाख रुपये असल्याचे सांगितले. ही ब्रिफकेस घेऊन निशांत भट्टने शो सोडण्याचा निर्णय घेतला आणि १० लाखांवर समाधान मानले. त्यानंतर शमिता शेट्टी टॉप ४ मधून बाद झाली. तेजस्वीचा बॉयफ्रेंड करण कुन्द्रा याने टॉप ३ मध्ये प्रवेश मिळवला मात्र पुढच्या क्षणी त्याला कमी ओट्स मिळाल्याने शोमधून बाहेर पडावे लागले. शोचा अंतिम सामना तेजस्वी प्रकाश आणि प्रतीक सेहजपाल यांच्यात रंगला. तेजस्वी विनर होताच प्रतिकला आपले अश्रू अनावर झाले त्यावेळी सलमानने प्रतिकला जवळ घेत त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. तेजस्वी प्रकाश बिग बॉसच्या १५ व्या सिजनची विजेती बनताच एकता कपूर यांच्याकडून मोठी संधी मिळणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ४० लाखांच्या बक्षिसासह तेजस्वीकडे एक मोठा प्रोजेक्ट देखील आला आहे. तेजस्वी प्रकाश ही मराठी कुटुंबात जन्मलेली मुलगी. तिचे पूर्ण नाव आहे तेजस्वी प्रकाश वायनगणकर.

तेजस्वीच्या आई वडिलांचे लग्न झाले त्यानंतर तिचे वडील परदेशात नोकरीसाठी गेले होते. बरेच महिने लोटले तरी तिचे वडील घरी परतले नाही म्हणून वडिलांनी आईला फसवले अशी चर्चा नातेवाईकांमध्ये झाली होती. परंतु कालांतराने तिचे वडील पुन्हा घरी परतल्यावर ह्या चर्चा थांबल्या. ही बाब तेजस्विने स्वतः बिग बॉसच्या घरात सांगितली होती. करण कुन्द्रा सोबतच्या नात्याची चर्चा बिग बॉसच्या घरातूनच सुरू झाली. या दोघांच्याही घरच्यांनी त्यांच्या प्रेमाला संमती दर्शवली होती. करण कुन्द्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची लव्हस्टोरी प्रेक्षकाना देखील खूप भावली. त्यामुळे ह्या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घ्यावा अशी त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर या दोघांचे नाते कसे राहील याबाबत प्रश्नचिन्ह असले तरी त्यांनी लवकरात लवकर लग्नाचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.