शहरात माणसं कितीही मोठी झाली बक्कळ पैसा कमावला प्रसिद्धी मिळवली तरी आपल्या गावच्या मातीत आपलं स्वतःच छोटंसं का होईना पण आपलं हक्काचं असं कौलारू घर असावं घरापुढे छोटासा गोठा गोठ्यात गाय बैलांची जोडी आणि थोडीफार शेती असावी असं स्वप्न प्रत्येक जण नक्कीच पाहतो. असच छोटस स्वप्न बिगबॉस फेम विकास पाटील यांनी पाहिलं आणि ते सत्यात देखील उतरवलं. आपल्या घरात गृहप्रवेश करतेवेळी आनंद व्यक्त करत त्याने काही फोटो आणि व्हिडिओ सोशिअल मीडियावर शेअर केले आहेत.

नुकताच झालेला मराठी बिगबॉसच्या तिसऱ्या सिजनमध्ये अभिनेता विकास पाटील आणि विशाल निकमच्या मैत्रीची जोरदार चर्चा झाली. अंतिम फेरीत हे दोघे एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळतील असं अनेकांना वाटलं पण अंतिम क्षणापर्यंत दोघांची घट्ट मैत्री पाहायला मिळाली. आपला मित्र विशाल निकम शो चा विजेता झाला ह्याचा आनंद विकासाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. अगदी बिगबॉसमधून बाहेर पडल्यावर देखील दोघांनी एकत्रित देवदर्शन देखील केलं. बिगबॉस विकास पाटील याने कोणत्याही कार्यक्रमात भाग घेतलेला पाहायला मिळाला नाही याउलट त्याने आपल्या घरातील माणसांना वेळ दिल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपासून त्याच्या गावच्या घराचं काम देखील सुरु होत आपल्या परिवाराला वेळ देत त्याने आपल्या गावच्या मातीत सुंदर असं कौलारू घर बांधलं आहे. नुकतंच त्या घरात त्याने गृहप्रवेश देखील केला आहे. घरातील मंडळी नातेवाईक आणि गावकरी या सर्वानी ह्या वेळी हजेरी लावलेली पाहायला मिळतेय. छोटस घर घरापुढे तुळस आंगण बाजूला गुरांसाठी गोठा आणि शेती असा एक सुंदर व्हिडिओ त्याने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

आता तुम्हाला देखील उत्सुकता लागली असेल कि विकास पाटील ह्याच हे सुंदर गाव नक्की आहे तरी कोठे? विकास पाटील हा मूळचा कोल्हापूरचा. कोल्हापूर येथील गलगले हे त्याचं गाव. गावात त्याने आपल्या आई वडिलांसाठी आणि त्यांच्या नातवासाठी हे टुमदार घर बांधले आहे. हे घर मी बांधलं असलं तरी ह्यावर माझ्यापेक्षा आई वडील आणि मुलांचाच हक्क जास्त असल्याचं तो म्हणतो. ‘कुणालाही आवडत नाही घर सोडून राहायला, जबाबदारी भाग पाडते, गाव सोडायला परंतु गावाशी जोडलेले नाळ कायम टिकून राहण्यासाठी घर बांधले आणि त्याच्या वास्तू पूजे निमित्ताने माझं कोल्हापूर जिल्ह्यात गलगले गावात येणं झालं, छान वेळ देता आला. गाव आणि गावातील गोष्टींची बातच निराळी!’ असं हि तो म्हणतो. स्वछ सुंदर हवा निसर्ग आणि सोबतीला संपूर्ण कुटुंब ह्याहून वेगळा आनंद कोठेही शोधून सापडणार नाही हेही तितकंच खर.