बिग बॉसच्या घरात गेल्यापासून कीर्तनकार शिवलीला पाटील प्रेक्षकांच्या टीकेला सामोरी गेली. सुरुवातीचे काही दिवस ती बिग बॉसच्या घरात राहिली मात्र दुसऱ्याच आठवड्यात प्रकृती खालावल्याने तिने बिग बॉसचे घर सोडण्याचा निर्णय घेतला. बिग बॉसने देखील तिच्या या निर्णयावर आपले मत दर्शवत तिला घरातून उपचार घेण्यासाठी बाहेर निघण्याची परवानगी दिली. उपचार घेतल्यानंतर शिवलीला पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात येईल असे वर्तवले जात होते मात्र काल तिने या घरात पुन्हा येणार नसल्याचे कळवले.

त्या संदर्भातील कीर्तनकार शिवलीला पाटील हिचा एक व्हिडिओ बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाला. त्यात तिची प्रकृती अधिकच खालावली असल्याचे सांगते. अजूनही आजारातून बरे वाटत नसल्याने मी बिग बॉसचा शो सोडत आहे असा ठोस निर्णय तिने घेतला होता. शिवलीलाच्या या निर्णयाचे प्रेक्षकांनी स्वागतच केले आहे मात्र आजारी असलेली आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेली शिवलीला आता चक्क कीर्तन कशी काय करू शकते? असा सवाल अनेकांना पडला आहे. ह्या संदर्भातला एक फोटो सद्य तुफान व्हायरल होताना पाहायला मिळतोय. है फोटोमध्ये कै. लता राऊत यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ५ ऑक्टोबर २०२१ रोजी म्हणजेच उद्या मंगळवारी समाजप्रबोधनकार ह. भ. प. शिवलीला ताई पाटील आता चक्क कीर्तन करणार आहे. एकीकडे आजारी असल्याचे कारण सांगून शिवलीला पाटील यांनी बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली मात्र दुसऱ्याच क्षणी ती कीर्तन करण्यास सज्ज कशी? असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा पुरावा खरा आहे की खोटा हे मात्र अजूनही स्पष्ट झाले नसले तरी तिच्या विरोधात कोणी डाव तर नाही ना टाकत हे येत्या काही दिवसातच अधिक स्पष्ट होईल. यावर शिवलीला पाटील यांची अजून कुठलीच प्रतिक्रिया देखील मिळाली नाही त्यामुळे या सत्यतेबाबत थोडी शंका वाटते. असो उद्या ह्या गोष्टीचा उलडगडा होईलच..बिग बॉसच्या घरात गेल्यामुळे शिवलीला पाटील यांच्यावर अनेक टीका करण्यात आल्या होत्या. अनेकांनी त्यांना आता कीर्तन न करण्याचा सल्ला देखील दिला होता. प्रेक्षकांची नाराजी विचारात घेऊन आणि आजारपणाचे निमित्त सांगून तिने बिग बॉसच्या घरातून काढता पाय तर घेतला नाही ना? अशी चर्चा आता जोर धरताना दिसत आहे. अर्थात तिने घेतलेला हा निर्णय तिच्यासाठी योग्यच आहे असे मत आता तिच्या चाहत्यांनी व्यक्त केले आहे.