बिग बॉसच्या घरात अभिनेत्री सोनाली पाटील आपल्या परखड बोलण्यामुळे चर्चेत राहिली आहे. आणि त्याचमुळे हळूहळू ती प्रेक्षकांच्या मनात देखील उतरताना दिसत आहे. सोनाली पाटील हिचे मराठी मालिकेत पदार्पण झाले ते ओघानेच कारण राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेली सोनाली पुढे याच कॉलेजमध्ये प्राध्यापिकेची नोकरी करत असे. तिच्या यशाच्या प्रवासाबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. सोनाली पाटील ही मूळची कोल्हापूरची. एका शेतकरी कुटुंबात तिचा जन्म झाला. शाहूवाडी तालुक्यातील गोंडोळी या छोट्याशा गावात ती लहानाची मोठी झाली.

सोनालीने सातवीपर्यंतचे शिक्षण गावच्या शाळेतूनच घेतले पुढे उषाराजे हायस्कुलमधून दहावी पर्यंत आणि त्यानंतर राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले. शाळेत असल्यापासूनच सोनाली सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभागी व्हायची. कॉलेजमध्ये गेल्यावर नाटक, एकांकिका मधून काम करण्याची संधी मिळाली. मधल्या काळात ज्या कॉलेजमधून तिने शिक्षण घेतले त्याच राजाराम कॉलेजमध्ये प्राध्यापिकेची नोकरी केली. ही नोकरी करून पुन्हा एकदा ती रात्रीच्या कॉलेजमध्ये देखील मुलांना शिकवायला जायची. मधल्या काळात टिकटॉक स्टार म्हणूनही ती ओळखली जाऊ लागली. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना एकदा सहज म्हणून कोल्हापूरला सोबो प्रॉडक्शनच्या ऑडिशनसाठी गेली असता तिचे सिलेक्शन करण्यात आले. घाडगे अँड सून या मालिकेत तिला अभिनयाची संधी मिळाली. एका महिन्यासाठी प्रियाचे पात्र तिने या मालिकेत साकारले होते. याच मालिकेत काम करत असताना तिला आपली महालक्ष्मी मधून कोल्हापूरची लक्ष्मी सकरण्यास मिळाली. केवळ महालक्ष्मी साकारता यावी म्हणून या भूमिकेसाठी तीने कुठलेही मानधन न विचारता लगेचच आपला होकार कळवला.

तेव्हा संजय जाधव यांनी तिला वैजू नं 1 मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्याची संधी दिली. मालिकांमधून लोकप्रियता मिळवलेली सोनाली पुढे देवमाणूस मालिकेत छोट्याशा पण तितक्याच प्रभावी झळकली. कोल्हापुरातील मनाचं पान अशी ओळख हळूहळू तिला मिळू लागली आणि हीच प्रसिद्धी तिला बिग बॉसच्या घरात दाखल होण्यास कामी आली. सध्या बिग बॉसच्या घरात राहून सोनाली प्रेक्षकांची मने जिंकून घेताना दिसत आहे. बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनची ती विजेती ठरेल अशी आशा तिच्या चाहत्यांना आहे कारण नुकतेच जय दुधाने याने सोनाली एक तगडी कंटेस्टंट आहे आणि म्हणून मी तुला घाबरतो अशी प्रतिक्रिया तिच्या बाबत दिली होती. बिग बॉस सीजन ३ मध्ये ती उत्तम खेळात असल्याचं दिसून येत. अभिनेत्री सोनाली पाटील हिला बिग बॉस सीजन ३ साठी खूप खूप शुभेच्छा..