कलर्स मराठी वरील बिग बॉसच्या ३ ऱ्या सिजनने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले पाहायला मिळाले. ह्या सिजनचे आता काहीच दिवस शिल्लक राहिले असल्याने कोणता सदस्य विजेते पद पटकावले याची उत्सुकता निर्माण. बिग बॉसच्या घरात आता मीनल, विकास, विशाल, मीरा ,उत्कर्ष आणि जय हे सहा सदस्य राहिले आहेत मात्र या आठवड्याच्या अगोदरच घरातील एक सदस्य एलिमीनेट होणार आहे. विशालने पहिला फायनलिस्ट होण्याचा मान पटकावला असल्याने तो सेफ झोनमध्ये आहे मात्र विकास, मीरा, मीनल,उत्कर्ष आणि जय या पाच मधून एकाला आज घराबाहेर पडावे लागणार आहे.

दरम्यान बिग बॉसच्या घरात सध्या कुठलाही आरडाओरडा फारसा पाहायला मिळत नाही. बिग बॉसच्या घरात अवघे काही दिवसांचेच सोबती या नात्याने जय सध्या खेळीमेळीचे वातावरण निर्माण करताना दिसत आहे. त्यामुळे जयची ही दुसरी बाजू प्रेक्षकाना खळखळून हसवत आहे. आपल्या बेताल वक्तव्यामुळे आणि सततच्या ओरडण्याने जय प्रेक्षकांच्या निशाण्यावर होता. त्याला घरातून बाहेर काढा अशी मागणी सुरुवातीपासूनच जोर धरताना दिसली होती. मात्र या पलीकडे जाऊन आता जयच्या वागण्यात बदल झाले आहेत. मग मीरा सोबतची माजमस्ती असो वा विकासला उडी मारण्याचा दिलेला टास्क यातून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. त्यामुळे जय फायनलमध्ये जाणार का याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना आहे. कल बिग बॉसच्या घरातील सदस्यांना सन्मान देण्यात आला त्यावेळी आपला बिग बॉसच्या घरातील प्रवास पाहून सर्वच जण भारावून गेले होते. विशाल फायनलमध्ये पोहोचला असल्याने त्याचाही या घरातला प्रवास उल्लेखनीयच होता.

विकासला जेलमध्ये टाकले होते त्यावेळी त्याने नियम मोडले होते मात्र हा एक नियम वगळता एकंदरीत तो ह्या घरात खूप चांगला दिसला. तर उत्कर्षला अष्टपैलू खेळाडू म्हणून नावाजण्यात आले. मिनलच्या बाबतीत बिग बॉसने ‘एक नारी सबपे भारी’ या एका वाक्यात तिचे कौतुक केले त्यामुळे मीनल स्वतःबद्दल जाणून खूपच खुश झाली होती. येत्या रविवारी विशेष भागात बिग बॉसचा ग्रँड फिनाले पाहायला मिळणार आहे. लवकरच सहा मधील एक सदस्य एलिमीनेट होऊन पाच फायनलिस्ट घोषित केले जाणार आहेत आणि रविवारी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा विजेता घोषित करण्यात येईल. त्यानंतर कलर्स मराठी वाहिनीवर एक नवी मालिका दाखल होत आहे. २७ डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता ‘तुझ्या रूपाचं चांदनं’ ही मालिका प्रसारित होत आहे.