मराठी बिग बॉसच्या शोने विशाल निकमला अमाप प्रसिद्धी मिळवून दिली आहे. शोनंतर विशाल निकम, विकास पाटील, मीनल शाह, आणि सोनाली पाटील हे चौघेजण अनेकदा एकत्रित आलेले पाहायला मिळाले. बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा विजेता झाल्यानंतर विशाल निकम कलर्स मराठीवरील आई मायेचं कवच या मालिकेत सक्रिय झाला आहे. मालिकेत तो मानसिंगची भूमिका साकारत आहे. मात्र आता विशालने एका खास कारणासाठी मालिकेतून ब्रेक घेतलेला पाहायला मिळतो आहे. आपल्या लाडक्या भावाच्या लग्नासाठी विशालने सुट्टी घेतली आहे भावाच्या लग्नासाठी विशाल नुकताच सांगली येथील आपल्या घरी पोहोचला आहे.

सुरज निकम हे विशालच्या भावाचे नाव आहे. लवकरच सुरज विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतीच त्याच्या लग्नाची धामधूम सुरू झाली असून हळदीचा सोहळा पार पडला आहे. हळद लागली, हळद लागली, आमच्या भावला हळद लागली असे कॅप्शन देऊन विशालने अक्षयला हळद लावतानाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याच्या या फोटोंवर अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे तर त्याच्या काही चाहत्यांनी ‘तुला कधी हळद लागणार’ असेही म्हटले आहे. बिग बॉसच्या घरात असताना विशाल निकम आणि सोनाली पाटील यांचे सूर जुळून आले होते. मात्र विशालने सोनालीचे गुपित जाहीरपणे उघड केल्याने दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. अशातच विशालने सौंदर्याच्या नावाचा खुलासा केल्याने त्याला तिच्याबद्दल वारंवार विचारण्यात येऊ लागले. बिग बॉसच्या शोमधून बाहेर पडल्यानंतर देखील विशालला सौंदर्या कोण आहे हे विचारले जाऊ लागले. मी लवकरच संदर्याला तुमच्यासमोर आणणार आहे आणि आमच्या लग्नाला देखील बोलावणार आहे असे विशालने म्हटले होते. मात्र बरेच दिवस उलटूनही विशालची सौंदर्या मिडियासमोर न आल्याने तिच्याबद्दल खूपदा विचारण्यात आले.

शेवटी सौंदर्याचे आणि माझे ब्रेकअप झाले आहे त्यामुळे मला इथून पुढे तिच्याबद्दल विचारू नये असे स्पष्टीकरणच त्याने दिले. त्याच्या या खुलास्या नंतर विशाल आता सिंगल आहे हे त्याने मिडियासमोर जाहीर केले. विशाल निकमचे मालिका सृष्टीत पदार्पण झाले ते ओघानेच. विशाल फिटनेस ट्रेनर म्हणून गोल्ड जिममध्ये कार्यरत होता. इथेच त्याला मॉडेलिंगचे वेध लागले. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना विशालला साता जल्माच्या गाठी मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारण्याची संधी मिळाली. दख्खनचा राजा ज्योतिबा, आई मायेचं कवच अशा मोजक्या मालिकेतून तो प्रेक्षकांसमोर आला. बिग बॉसच्या शोमधला त्याचा एकंदर वावर प्रेक्षकांना खूपच भावला त्यामुळे विशालच या शोचा विजेता ठरणार हे प्रेक्षकांनी अगोदरच गृहित धरले होते.