
गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांशी वाद करणारे बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वातील सदस्य आता हळू हळू घरच्यांच्या आठवणीने व्याकुळ होऊ लागले आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये नॉक आऊट हे कार्य पार पडल्या नंतर कुटुंबीयांना भेटण्याची संधी सुरू झाली. अशात आता कोणते सदस्य त्यांच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीला भेटले आहेत हे माहीत करून घेऊ. बिग बॉसच्या घरामध्ये ‘साम दाम दंड भेद’ वापरत नॉक आऊट हे कार्य पार पडले. त्यानंतर साऱ्यांचे डोळे त्यांच्या कुटुंबीयांकडे लागले. यामध्ये प्रत्येकाला आपल्या जवळील व्यक्तीला भेटण्यासाठी जास्तीचा वेळ हवा होता.

त्यामुळे विकासला १९ मिनिटं, मीनल १७, गायत्री १६, विशाल १८, जय १४, सोनाली १३, मीराला ११ आणि उत्कर्षला १२मिनिटांचा वेळ मिळाला. आता पर्यंत मीरा, सोनाली आणि विकासला कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळाली आहे. सर्वात पहिले कुटुंबीयांना भेटण्याची संधी विशालला मिळाली. त्याचा मुलगा आजरी असल्याने त्याने जास्तीचा वेळ मागितला होता. त्याची पत्नी स्वाती पाटील त्याला भेटायला यावेळी आली होती. एकूण १८ मिनटे तो त्याच्या पत्नी बरोबर बोलत होता. यावेळी त्याच्या तोंडून सतत त्याच्या मुलाची काळजी व्यक्त होत होती. अशात बाकीचे सदस्य देखील स्वातीला भेटले. मात्र सोनालीला विशालच्या पत्नीला भेटता आले नाही. कारण ती स्वाती आली तेव्हा सोनालीला फ्रिज करण्यात आलं होतं. यानंतर मीरा तिच्या भावाला भेटताना दिसली. मीरा आणि तिच्या कुटुंबीयांचे फार पटत नाही. तिचे वडील तिच्याशी बोलत नाहीत आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी मिरचं तोंड देखील पाहिलेलं नाही. त्यामुळे निदान बिग बॉसच्या घरात माझे कुटुंबीय मला भेटू इच्छित असतील मला थोडा अधिकचा वेळ मिळावा अशी इच्छा तिने व्यक्त केली होती.

तिच्या म्हणण्यानुसार तिला ११ मिनट देण्यात आली होती. अशात मिराचा भाऊ सागर तिला भेटायला बिग बॉसच्या घरामध्ये आला होता. मीराने देखील तिच्या भावाबरोबर संवाद साधला. यावेळी तिचेही डोळे पाणावले होते. त्यानंतर सोनालीची आई देखील तिला भेटली. आईला पाहून सुरुवातीला फ्रिज असताना अनेकांना आपलीच आई आली आहे की काय असं वाटलं. आई आलेली पाहून सर्वच सदस्यांना अश्रू अनावर झाले होते. अशात सोनालीच्या आईने तिला मोलाचा सल्ला देखील दिला. त्या म्हणाल्या की, “संपूर्ण महाराष्ट्र तुला बघत आहे. चांगली खेळ, सर जे काही बोलतात त्याचं वाईट वाटून घेऊ नको. तुझ्या कडे असलेली ताकत तू खेळामध्ये वापर.” अशात आता मीनल, गायत्री, जय आणि उत्कर्ष हे सदस्य अजून त्यांच्या कुटुंबीयांना भेटलेले नाही. त्यामुळे त्यांना देखील नात्यांचं महत्त्व आणि जवळच्या व्यक्तींना पाहण्याची त्यांच्याशी गप्पा मारण्याची ओढ लागलेली आहे. पुढील भागात आता हे सदस्य त्यांच्या घरच्यांना भेटताना दिसतील.