मराठी बिग बॉसच्या घरातून काल दादूस यांनी एक्झिट घेतलेली पाहायला मिळाली. त्यामुळे आता जय, उत्कर्ष, मीरा, गायत्री, विशाल, विकास आणि सोनाली हे आठ स्पर्धक मराठी बिग बॉसचे टॉपचे स्पर्धक ठरले आहेत. गेल्या आठवड्यात विकास ट्विटरच्या माध्यमातून खूपच लोकप्रियता मिळवताना दिसला होता. ट्विटरच्या माध्यमातून प्रेक्षकांनी विकासला पाठिंबा दर्शवला होता त्यामुळे सोशल मीडियावर तो पूर्णपणे ट्रेंडमध्ये आलेला व्यक्ती ठरला होता. मात्र एकीकडे विकास चर्चेत येत असताना प्रेक्षकांनी विशालला ट्रोल केले आहे.

विशाल सोनालीच्या वागण्यावर रिऍक्ट झाला तेव्हा तो तिच्यामुळे व्हिलन ठरतोय असा समज त्याने केला होता. महेश मांजरेकर यांच्या सोबत बोलताना देखील तो सोनालीवर नाराज असलेला दिसला. सोनालीने मला तीच लग्न ठरल्याचे सांगितले नाही, शिवाय ती स्मोक करते हे माझ्यापासून लपवून ठेवलं. जेव्हा ती डिप्रेशनमध्ये होती तेव्हा तिने अशा पद्धतीने स्मोक करत होती की तिला खूप दिवसांचा अनुभव असावा असं विशाल सोनालिबाबत तक्रार करताना म्हणाला होता. सोनालीला नेलपेंट लावताना देखील तिने मला वेगळ्या पद्धतीने स्पर्श केला असल्याचे विशालचे म्हणणे होते. तिचं माझ्यावर प्रेम आहे का हे मी तिला विचारले होते मात्र सोनालीने याबाबत काही सांगण्यास नकार दिला होता. काही गोष्टी कॅमेऱ्यासमोर नाही बोलता येत असे सोनाली म्हणताच महेश मांजरेकर यांनी तिला घरी जाण्याचा सल्ला दिला.सोनालीच्या म्हणण्यानुसार मीनल आणि विकास माझे मित्र आहेत, माझ्या काही पर्सनल गोष्टी त्यांना देखील माहीत नाहीत पण तरी देखील त्यांचा माझ्यावर राग नाही मग तुला माझ्यावर का राग येतोय असे स्पष्टीकरण दिले होते.

सोनाली आपले स्पष्टीकरण देण्याचा पूर्ण पणे प्रयत्न करत होती मात्र महेश मांजरेकर यांनी तिला बोलूच दिले नाही, तिचे मत मांडण्याचा तिला वेळच दिला नाही असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडल्या तेव्हा महेश मांजरेकर यांनी शेवटच्या क्षणी तुला काय बोलायचंय ते आता बोल असं म्हटल्यावर मात्र यावर नेमकं काय बोलावं आणि कशावर उत्तर द्यावं हेच सोनाली विसरून गेली. तेव्हा विकासने सोनालीला समजावण्याचा थोडा प्रयत्न केला. विशालने मात्र सोनाली बाबत ज्या गोष्टी उघड केल्या त्या अत्यंत चुकीच्या पद्धतीने सांगितल्या आहेत. आज एका मुलीबाबत बोलताना विशालने विचार करून बोलायला हवे होते. सोनालीच्या विरोधात बोलून तो आता आमच्या मनातून उतरला आहे असे मत आता प्रेक्षकांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे विशाल आता प्रेक्षकांच्या टीकेला सामोरा जात आहे. विशाल आता सोनालीच्या वादावरून व्हिलन ठरल्याचेच चित्र प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहे. प्रेक्षकांची नाराजी दूर करण्यासाठी विशाल आता काय प्रयत्न करणार हे पाहावे लागेल.