आज रविवारी २६ डिसेंबर रोजी कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा फिनाले टेलिकास्ट होत आहे. या सिजनमध्ये विशाल निकम फायनलमध्ये पोहोचलेला पहिला स्पर्धक ठरला होता त्यानंतर जय, विकास, उत्कर्ष आणि मीनल शाह फायनलमध्ये पोहोचले. बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात पाच टॉपच्या स्पर्धकांचा प्रवास दाखवण्यात आला तेव्हा सर्वच स्पर्धक बिग बॉसच्या घरातील हा प्रवास पाहून खूपच भावुक झाले होते. बिग बॉसच्या घरात काल अगोदर बाद झालेल्या सर्वच स्पर्धकांनी पुन्हा एकदा हजेरी लावली.

हे टॉपचे पाचही स्पर्धक बाहेर कसे दिसतात याबाबत त्यांनी खुलासा केला होता. आज बिग बॉसच्या फायनलमध्ये कुटुंबियांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. पाचही जणांबाबत त्यांच्या घरच्यांची दिलेल्या प्रतिक्रिया पाहून सगळेच भारावून गेले आहेत. आज बिग बॉसने स्पर्धकांना ५ लाखांची ऑफर दिली आहे. पाच लाख रुपये इतकी रक्कम असलेली बॅग घेऊन शिव ठाकरे बिग बॉसच्या घरात येणार आहे. ही बॅग उचलायची आणि शो सोडायचा अशी ही ऑफर कोणता स्पर्धक निवडणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान उत्कर्ष शिंदे ही ऑफर स्वीकारणार का याबाबत सविस्तर माहिती काही वेळातच समजेल कारण ही ऑफर दिल्यानंतर उत्कर्षणे हात वर केला होता. त्यामुळे हा ट्विस्ट प्रेक्षकांना संभ्रमात पाडणारा आहे. तो ही बॅग घेऊन घराबाहेर जाणार का हे काही वेळातच स्पष्ट होईल. मात्र बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा विजेता कोण ठरणार आहे ही बातमी आता सोशल मीडियावर लिक करण्यात आली आहे असं अनेकांचं मत आहे.

बिग बॉसचा विजेता कोण ठरेल याबाबत वेगवेगळी मतं मांडण्यात आली होती बहुतेकांनी विशाल निकम विजेता होईल अशी खात्रीदायक माहिती सांगितली आहे. मात्र आता ही बातमी काही वेळापूर्वीच लिक झाली असून विशाल निकमच या तिसऱ्या सिजनचा विजेता ठरला असल्याचे सांगितले आहे. तर जय दुधाने हा दुसऱ्या नंबरवर समाधान मानणार आहे असे सांगण्यात येत आहे. विशाल निकम हा शो जिंकणार अशी चर्चा बिग बॉसचा शो सुरू झाल्या पासूनच पाहायला मिळत होती. वेगवेगळे टास्क खेळून विशालने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी त्याला आपली मतं दिली आहेत. अंतिम टप्प्यात देखील वोटिंग लाईन्स सुरू होत्या यातूनच विजेता स्पर्धक निवडला जाणार असे बोलले जात होते. त्यामुळे विशाल निकम विजेता ठरला ही बातमी खरी की खोटी हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.