कलर्स मराठी वाहिनीवर येत्या १९ सप्टेंबर २०२१ पासून बहुप्रतिक्षित बिग बॉसचा ३ रा सिजन प्रसारित केला जाणार आहे. मराठी बिग बॉसचा प्रेक्षकवर्ग देखील मोठा असल्याने हा शो नेहमीच हिट ठरलेला पाहायला मिळातो. मराठी बिग बॉसचा ३रा सिजन गोरेगाव फिल्मसीटीत केला जाणार आहे. या घराचे काम देखील नुकतेच पूर्ण झाले असून त्याचे फोटो तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. बिग बॉसचे घर यावेळी कोणत्या थिमवर आधारित आहे हे फोटोंवरूनच लक्ष्यात येते. तिसऱ्या सिजनसाठी बिग बॉसच्या घराला वाड्यासारखा लूक देण्यात आला आहे.

शिवाय आतील बाजूस भिंतींवर विविध चित्र काढण्यात आली आहेत. त्यामुळे बिग बॉसचे हे घर एखाद्या राजवाड्याप्रमाणे भासत आहे. बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी स्पर्धकांना एक नवी नियमावली दिली आहे. बिग बॉसच्या घरात जाण्याअगोदर हे सर्व स्पर्धक काही काळ कोर’ न्टाइन केले जाणार आहेत त्यामुळे या सर्व स्पर्धकांना काही दिवस तरी आपल्या घरापासून विलगीकरणात राहावे लागणार आहे. बिग बॉसचे घर देखील दरवेळी सॅनि ‘टाईझ केले जाणार असून सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना दोन्ही लसी घेणे अनिवार्य असल्याचे नमूद केले आहे. ही सर्व नियमावली स्पर्धकांना अगोदरच जाहीर केल्याने त्याबाबतची खबरदारी त्यांनी घेतलेली आहे. शिवाय घरात जाण्याअगोदर या स्पर्धकांचे शारीरिक स्वास्थ्य देखील तपासले जाणार आहे. या शोमध्ये एकूण १६ स्पर्धक सहभागी होणार असून त्यात ८ पुरुष आणि ७ महिला स्पर्धकांचा समावेश करण्यात येणार आहे. अशा १५ प्लस आणखी वाईल्ड कार्ड एन्ट्री असणाऱ्यांचा या १६ स्पर्धकांमध्ये समावेश होणार आहे. या वाईल्ड कार्ड एन्ट्री करणाऱ्या स्पर्धकांना देखील दिलेली नियमावली पाळावी लागणार आहे.

तिसऱ्या सिजनमध्ये सहभागी होत असलेल्या स्पर्धकांची नावे गुलदस्त्यात ठेवली असली तरी अनेक कलाकारांवर शिक्कामोर्तब केलेला पाहायला मिळतो आहे. नकुल घाणेकर हा अभिनेता या शोचा पहिला स्पर्धक निश्चित झाला असून खुशबू तावडे, संग्राम समेळ, नेहा जोशी, ऋषी सक्सेना, नेहा खान, पल्लवी सुभाष, रुपल नंद, अंशुमन विचारे यांचीही नावे स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याचे सोशल मीडियावर सांगितले जाते. हे सर्व तर्क जरी वाटत असले तरी याबाबत सत्य काय आहे हे मात्र १९ सप्टेंबर रोजीच समोर येणार आहे. त्यामुळे स्पर्धक जाणून घेण्याची ही उत्सुकता अजूनही संपलेली नसलेली पाहायला मिळते. कलर्स मराठी वाहिनीवर येत्या १९ सप्टेंबर २०२१ पासून सुरु होणाऱ्या बिग बॉसच्या ह्या नव्या पर्वाला खूप खूप शुभेच्छा..