बिगबॉसच्या घरात रोज काहीतरी नवंनवं घडताना पाहायला मिळत पण आता जुनेच स्पर्धक पुन्हा घरात आल्याने एक वेगळंच वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये नुकतेच इलिमिनेट झालेले तीन सदस्य पुन्हा आले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनात आणखीन भर पडली आहे. अशात घरामध्ये आलेल्या तीन सदस्यांपैकी स्नेहा जय दुधानेवर खूप नाराज आहे. तिने आल्या बरोबर त्याला खूप काही सुनावले. त्यावर आता जय पुढे काय करणार याचीच उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पसरली आहे.

अशात स्नेहाने घरात एंट्री केल्या बरोबर तिचा कधीही न पाहिलेला आणि हटके अंदाज सर्वांना दाखवला. तिने आल्यावर घरातील सर्वच सदस्यांची चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर तिने लुजरचे लॉकेट जयच्या गळ्यात घातले. तिचं हे वागणं जयला सहन झालं नाही. त्यामुळे तो खूप रडू लागला. त्याने रागात स्वतःच्या हाताला देखील दुखापत करुन घेतली. मात्र तो नाटक करत आहे असं स्नेहा म्हणत होती. एकेवेळी दोघेही एकमेकांच्यात गुंतलेले पाहायला मिळायचे दोघांत चांगलीच गट्टी जमली होती. कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर जय आणि स्नेहामधील पुढील संभाषणाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतं आहे. यामध्ये जय स्नेहा जवळ जाऊन तिला सांगतो की, “मी जे काही केलं ते खरंच मनापासून केलं. माझा तुला हर्ट करायचा काही हेतू नव्हता किंवा तुला खाली दाखवायचही नव्हतं आणि तुला बाहेर काढण्याचा देखील विचार नव्हता. खरंच तुला जे वाटतं आहे ना जे काही तू बोललीस तर, खरचं सॉरी.”

यावर स्नेहा पुन्हा एकदा जयवर अविश्वास दाखवत म्हणते की, “जर तुम्हाला वाटत नाही की, तुमचं चुकलं, तर कशाला माफी मागता.” यावर जय पुन्हा एकदा तिला सॉरी बोलत म्हणतो की, “हे बंद खोलितल नाही तर नॅशनल टेलिव्हिजनवर सांगतो.” जय आणि स्नेहामधील या संवादामुळे आता पुढे काय होणार. स्नेहा त्याच्याशी आधी सारखी मैत्री करणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. तसेच सुरुवातीला बिग बॉसच्या घरात तृप्ती देसाई आल्या. त्यांनी आल्याबरोबर घरातील सर्व सदस्यांना मिठी मारली. त्यांनी प्रतेकाशी गोड शब्दात संवाद साधला. स्नेहाचं मात्र तसं झालं नाही. ती घरात आल्याबरोबर तिने प्रत्येक सदस्यांवर असलेला राग व्यक्त केला. तिच्या तावडीतून गायत्री मात्र सुटली. स्नेहाने पुढे सगळ्यांना खडेबोल सूनवून झाल्यावर असेही सांगितले की, “आता पर्यंत तुम्ही स्नेहा वाघ मधलं फक्त स्नेह पाहिलं. आता मी तुम्हाला वाघ काय आहे हे पण दाखवणार.”