
बिग बॉस मराठी चा नवीन सीजन लवकरच सुरु होणार असल्याची चर्चा होते ना होते तोवर आणखीन एक प्रकरण उघडकीस आलं आहे. नाशिक मधील इगतपुरी येथे शनिवारी रात्री २ वाजता रेव्ह पार्टी सुरु होती. महाराष्ट्र पोलिसांनी रात्री २ च्या सुमारास घटनास्तळी छापा टाकून तब्बल २२ जणांना अटक केली आहे. रेव्ह पार्टी सुरु असताना तेथे अनेक प्रसिद्ध कलाकार ह्या पार्टी मध्ये सहभागी झाले असल्याची माहिते मिळतेय. त्यात बिग बॉस मराठी मधील एका अभिनेत्रीचाही सहभाग होता. तिलाही त्यावेळी अटक करण्यात आली आहे.

बिग बॉस मराठी मधील ह्या मराठमोळ्या अभिनेत्रीच नाव आहे “हीना पांचाळ”. हिना हिने ह्या पूर्वी बिग बॉस मराठी मध्ये सहभाग घेतला होता. अगदी हुबेहूब मलाईका अरोरा सारखी दिसणारी अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जाते. हिना सोबत त्यावेळी काही परदेशी महिला तसेच बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्रीशी निगडित असलेल्या आणखीन २ महिलांना देखील दारूच्या नशेत असताना अटक करण्यात आली आहे. “काय झालं कळंना”, “धुमस”, “तू तिथे असावे”, “वंटास” अश्या अनेक चित्रपटांत ती झळकली आहे. त्यानंतर बिग बॉस मराठीच्या माध्यमातून तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. सुशांत सिंग केस नंतर हि दुसरी रेव्ह पार्टी आहे ज्यामध्ये बॉलीवूड अभिनेत्रींना रंगेहात पकडण्यात आले आहे. ह्या प्रकरणामुळे बिग बॉस मराठीच्या सीजन ३ च्या सुरवातीलाच गालबोट लागले हे निश्चित. .
