बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सुरू आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी इथे आपली हजेरी लावली. मात्र जो प्रामाणिक आणि साच्चे पणाने खेळला तोच प्रत्येक पर्वात विजयी होताना दिसला. सध्या बिग बॉसच्या घरामध्ये उरलेल्या स्पर्धकांचे घरातील प्रवास पाहायला मिळत आहेत. अशात सध्या बिग बॉसच्या घरातील सर्वात जास्त इमोशनल सदस्य म्हणून ओळखला जाणार विशाल निकम सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. आणि त्याच्या चर्चेचं कारण हे त्याचं लग्न आहे. आता ही चर्चा नेमकी कशी सुरू झाली हे जाणून घेऊ.

तर त्याच झालं असं बिग बॉसच्या घरामध्ये नुकतीच एक पत्रकार परिषद पार पडली. यावेळी अनेक पत्रकार बिग बॉसच्या घरामध्ये आले होते. त्यांनी प्रत्येक स्पर्धकावर गोड प्रश्नांच्या फैरी केल्या. प्रश्न उत्तरांच्या या पत्रकार परिषदेत अनेक गोष्टी समोर आल्या. यामध्येच विशालला सौंदर्या विषयी प्रश्न विचारला होता. तो प्रश्न होता सौंदर्या नक्की आहे का? तर यावर विशालने उत्तर देत सांगितलं होतं की, “हो माझ्या खऱ्या आयुष्यात सौंदर्या आहे. ती आहे म्हणूनच मी इतके दिवस इथे राहू शकलो.” आता विशालचं हे उत्तर ऐकून चाहत्यांना सौंदर्या विषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. पत्रकारांनी पुढे त्याला असं विचारलं की, “बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर तिचं खरं नाव समजेल का?” त्यावर विशाल उत्तर देत म्हणाला की, “हो! बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर मी नक्कीच सर्वांना तिचं खरं नाव सांगेल आणि तिची ओळखही करुन देईल. सध्या ती माझ्या जवळ नसली तरी, देखील मला तिच्याकडून खूप शक्ती मिळते.” विशाल निकम सुरुवातीपासून चाणाक्ष बुद्धीने बिग बॉसच्या घरामध्ये खेळत आला आहे. मात्र त्याचा हळवा स्वभाव असल्याने बऱ्याच प्रसंगी त्याला रडू आवरत नाही.

सुरुवातीपासून तो रोज सौंदर्या बरोबर बोलत आला आहे. आता सौंदर्याचं हे गुपित लवरच रसिक प्रेक्षकांच्या समोर उलगडणार असं म्हणायला हरकत नाही. विशालच्या अभिनयातील कारकिर्दी विषयी बोलायचे झाल्यास त्याने २०१८ पासून आपल्या करिअरची सुरुवात अभिनय क्षेत्रात केली. मिथून या चित्रपटात तो पहिल्यांदा झळकला. त्यानंतर २०१९ साली आलेल्या धुमास या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत झळकला. चित्रपटांसह त्याने अनेक मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. त्याची ती सौंदर्या म्हणजे अभिनेत्री सोनाली पाटील तर नाही ना असा सवाल अनेक जण विचारताना पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या घरात ह्या दोघांची चांगलीच मंत्री पाहायला मिळाली होती. दोघे एकमेकांत रमलेले देखील पाहायला मिळाले. सोनालीने बाहेर पडताना देखील त्याला सपोर्ट करत तोच विजेता होईल असं वक्तव्य देखील केलं. त्याची सौंदर्या सोनाली आहे आणि कि आणखीन कोणी हे येत्या काही दिवसात उघड होईलच मात्र विशालचे चाहते त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.