मराठी बिग बॉसच्या घरातून ह्या आठवड्यात स्नेहा वाघने एक्झिट घेतली आहे. तिच्या जाण्याने घरातील सदस्यांनी खास करून जयने आणि दादूसने नाराजी दर्शवलेली पाहायला मिळाली. घरातून निघताना स्नेहाने सगळ्यांना मला रडून निरोप देऊ नका असे हसत म्हटले होते आणि माझी कोणाला आठवण आली तर फक्त हसा एवढं म्हटलं होतं. तीच घरातून बाहेर पडणे कोणाला आवडेल असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी विचारला तेव्हा तिने मीरा आणि गायत्रीचे नाव घेतले होते. दरम्यान बिग बॉसच्या घरात आता मासळी बाजार पाहायला मिळणार आहे.

ह्या टास्कमध्ये कोण बाजी मारणार हे लवकरच समजेल पण तूर्तास विकास आणि विशाल सोनालीबद्दल बोलत असतात. तेव्हा सोनालीच्या लग्नाचा विषय निघाला तेव्हा विशाल सोनालीला “तू खोटं का बोललीस की कोणीतरी होता ? आता कोणीच नाही माझ्यासाठी… नाव काय आहे त्याच?…असं म्हणताच सोनाली तिथून निघून जाते. सोनाली विकासला आपलं लग्न ठरलं असल्याचे सांगते. विकास हे नमूद करून सांगतो की सोनाली म्हटली होती की माझं लग्न ठरलंय…त्याच नाव ‘अक्षय’ आहे असं विकास विशालला सांगतो. त्यावर विशाल विकासला म्हणतो की, माझ्या इमोशन्सशी खेळतेय ही… आणि त्यानंतर विशाल गंभीर झालेला पाहायला मिळतो. विशाल आणि सोनाली यांच्यात काहीतरी शिजतंय अशी चर्चा सुरुवातीला बघायला मिळाली होती मात्र त्यानंतर विशाल आणि सोनाली मध्ये अनेकदा खटके उडालेले दिसले. तर कधी विशाल सोनालीची काळजी घेतानाही दिसला. अगदी तळ्यात मळ्यात असताना त्याने सोनालिला खाऊ घातले होते. यावरून त्यांची मैत्रीचं रूप प्रेक्षकाना पाहायला मिळालं होतं मात्र विशाल सोनालीच्या लग्न ठरण्यावरून नाराज आहे आणि ती खोटं बोलली म्हणून ती माझ्या भावनांशी खेळतीये असं विशालच म्हणणं आहे. असं चित्र सध्या बिग बॉसच्या घरात रंगलेलं पाहायला मिळालं.

मात्र त्यांच्यात प्रेम असेल असं शीतल शिवाय इतर कोणालाच वाटलेलं नाही परंतु विशालच्या या मतावरून तरी ह्यांच्यात खरच काही आहे का आणि सोनाली विशालला धोका देतोय का? हे लवकरच उलगडेल. एकदा किचनमध्ये सोनाली चपात्या बनवताना मला चपात्या खूप आवडतात म्हणत गालातल्या गालात हसून त्याने तिच्यावर असलेलं प्रेम दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मीनल तेथे होती तो हे कोणासाठी म्हणाला हे तिला समजलं होत. त्यामुळे ती सोनालीला चिडवत देखील होती. नंतर सोनाली हसून विशालशी बोलताना देखील दिसली. अनेक वेळेला ह्या दोघांना एकत्र पहिले गेले त्यामुळे ह्याच्यात प्रेम असल्याच्या अनेक चर्चा रंगू लागल्या. विशाल आणि सोनाली यांचे एकमेकांवर प्रेम असेल तर बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनमध्ये देखील प्रेक्षकांना आणखी एक कलाकार जोडी पाहायला मिळणार हे नक्की….