Breaking News
Home / जरा हटके / मी सगळ्यांना सांगितलं तुझं मन खूप चांगलं आहे लंबी रेस का घोडा… तृप्ती देसाई कोणाबद्दल बोलल्या

मी सगळ्यांना सांगितलं तुझं मन खूप चांगलं आहे लंबी रेस का घोडा… तृप्ती देसाई कोणाबद्दल बोलल्या

बिग बॉसच्या घरात आज बाहेर पडलेल्या सदस्यांपैकी स्नेहा वाघ, आदिश वैद्य आणि तृप्ती देसाई घरात पुन्हा एकदा प्रवेश करणार आहेत. स्नेहा वाघने घरात प्रवेश करताच जयवर निशाणा साधलेला पाहायला मिळतो आहे. आपल्या मागून आपली इज्जत काढली जात असल्याने स्नेहा जयला खडेबोल सुनावताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्य मात्र ह्यावेळी स्टॅच्युच्या स्थितीत असलेले पाहायला मिळत आहे. जय आणि स्नेहा यांच्यात सुरुवातीपासूनच खूप चांगली मैत्री होती पण जयचे सत्य समोर आल्यावर स्नेहाने जयच्या मैत्रीवर शंका उपस्थित केली आहे.

trupti desai in big boss
trupti desai in big boss

स्नेहाने हे आरोप लावताच जय खूपच दुखावलेला पाहायला मिळतो आणि बॅगवर हात मारून तो आपल्या भावना व्यक्त करतो. तर तिकडे तृप्ती ताई मात्र एका सदस्याला खूप चांगलं म्हणताना दिसत आहेत. विशालजवळ जाऊन त्या त्याच्या चेऱ्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात की, विशाल, एकदम मस्त मागच्या आठवड्यात जो ट्रॅक चेंज केलाय ना तो वन मन आर्मी मस्त. मी जे सांगत होते ना की कुठे तरी हे चेंज झालं पाहिजे, आणि तुला सांगितलं होतं की सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं, लंबी रेस का घोडा है, मस्त एकदम, आणि मी सांगितलं सगळ्यांना की सगळ्यात छान मन आमच्या विशालच आहे…की ज्याच्या मनामध्ये काहीच चुकीचं नाही…’ असं तृप्ती ताई म्हणताच विशाल खूपच भावुक झालेला पाहायला मिळाला. त्यानंतर तृप्ती देसाई यांनी मीनलकडे जाऊन सांगितलं की, मीनल तू खूप छान खेळतेस मी मिराला सांगितलं की मीरा फटाक्यांमध्ये लक्ष्मी बॉम्ब आहे तर मीनल तू खेळामध्ये सुतळी बॉम्ब आहे. मुलींमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग प्लेअर तुम्ही आहात असं तृप्ती ताई मिनलच्या बाबतीत म्हणाल्या.

actor vishal and vikas
actor vishal and vikas

दरम्यान बिग बॉसच्या घरात विशालने सोनालीच्या जेवण बनवण्याच्या पद्धतीच खूप कौतुक केलं आहे विकाससोबत बोलताना विशाल म्हणतो की, सोनालीच्या हातची चव म्हणजे खूपच छान ती जेवण खूपच सुन्दर बनवते तिच्यासारखं जेवण बनवायला अजून तरी ह्या घरात कोणाला जमलं नाही तिच्या जेवणाची चव एकदम टच करते. तृप्ती ताई सुद्धा खूप छान जेवण बनवायच्या असं म्हणत विकास त्याला आठवण करून देतो पण त्यांच्या कंम्पेअर सोनाली एक नंबर ठरते असं विशाल म्हणतो. विशाल आणि सोनाली यांच्यातील गैरसमज आता हळूहळू दूर होताना दिसत आहेत. ज्या गोष्टींमुळे आपल्यात वाद झाले माझ्याबाजूने मी ते सगळं विसरून जायला तयार आहे असं आश्वासन विशालने दिलेलं आहे त्यामुळे सोनालीच्या अनुपस्थितीत तो तिचं जेवणाच्या बाबतीत कौतुक करताना दिसत आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *