बिगबॉसच्या घरात गेल्याने कीर्तनकार शिवलीला पाटील चांगल्याच ट्रोल झालेल्या पाहायला मिळाल्या. आजारी असल्याचं दाखवून शेवटी त्यांनी तेथून काढता पाय घेतला. त्यांनतर मीडियाशी बोलताना त्या म्हणाल्या “जी चूक मी आज बिगबॉसच्या घरात जाऊन केली ती पुन्हा माझ्याकडून होणार नाही पण मी तिथं जाऊन काही वाईट केलं नाही असं म्हणत कीर्तनकार शिवलीला पाटील ह्यांनी आपलं मत मांडत शिवलीला काल मीडियाशी बोलल्या. आज शहरी भागातील लोकांना कीर्तन काय आहे हे माहित नाही फिल्म पाहणाऱ्या लोकांना कीर्तन हि परंपरा माहित व्हायला पाहिजे. तेथील अर्ध्याच लोकांना हि परंपरा माहित होती.

मी तेथे गेल्याने तेथील लोकांना कीर्तन काय आहे हे समजून सांगण्यासाठी हा माझा प्रामाणिक हेतू होता. मला कोणी त्याबद्दल काही सांगितलं नाही हा माझा स्वतःचा निर्णय होता. मला खूप दिवसापासून बिगबॉसच्या ऑफर येत होत्या जे मी कीर्तनाच्या व्यासपीठावर करायचे तिथे हि जाऊन मी तेच केलं. मला ट्रोल देखील केलं गेलं पण मला समाजाला, संप्रदायाला आणि जे लोक माझ्यावर नाराज आहेत त्या लोकांना सांगायचंय माझा निर्णय चुकलाय, तुम्हाला वाटत असेल माझी वाट चुकलीय पण माझ ध्येय आणि हेतू एकदम साफ होता, कि आपली कीर्तन हि परंपरा आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपली मराठी संस्कृती आणि हा शो बघणारा मराठी संप्रदाय नव्हता मला हे माहित होत कि हा शो आपली लोक पाहत नाहीत हा शो फिल्मी लोक पाहतात. त्यांना हा शो जास्त आवडतो मग फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना कीर्तनाची आवड लागावी म्हणून मला तिथं जाण योग्य वाटत. जर संप्रदायातील लोकांना हे योग्य वाटलं नसेल तर मी दिलगिरी व्यक्त करते , तुम्ही मोठे आहात मला तुमची माफी मागायला काही हरकत नाही. मी दोन्ही हाथ जोडून आणि मस्तक ठेऊन समाजाची ज्यांनी आजवर मला मोठं केलं त्या संप्रदायाची जेष्ठ मंडळींची माफी मागते.

परंतु माझा हेतू तुम्ही चांगल्या दृष्टिकोनातून पहिला तर तुम्हाला हि असे समजेल कि माझ्यामुळे मुंबई पुण्यासारख्या लोकांतले जे अमराठी लोक आहेत ज्यांना कीर्तन माहित नाही आपली परंपरा माहित नाही त्या लोकांना आपली कीर्तन हि परंपरा पोहचली असं देखील तुम्ही मान्य करावं असं मला वाटत. आपण आपल्या वयाच्या मोठ्या व्यक्तींशी बोलताना व्यवस्तीत बोलावं मी माझे शब्द व्यवस्थित मांडले. मग मी दिसले नाही दिसले तरी हरकत नाही. मी इंदुरीकर महाराज्यांच्या बाजूने होते आणि पुढे देखील राहील ते माझे आदर्श आहेत मी त्यांना गुरु मानते मी पाकिस्तानात जरी गेले तरी माझ्या मुखात विठुरायाचंच नाव असेल आणि छत्रपतींचेच विचार असतील असं शिवलीला पाटील म्हणाल्या. जी चूक लोकांनी इंदुरीकर महाराज्यांबाबतीत केली मला नाही वाटत कि समाज ती चूक माझ्या बाबतीत करतील असं म्हणत त्यांनी स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.