
बिग बॉस मराठीतील सहा स्पर्धकांमध्ये गेल्या आठवड्यात मोठे अटीतटीचे सामने पाहायला मिळाले. अशात रविवारी सोनाली पाटीलनं या घराचा निरोप घेतला. तर आता बिग बॉसच्या घरात मीरावर मोठी गाण्यांची फैरी करत तिची खिल्ली उडवण्यात आली आहे. मीरा बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्या दिवसापासून अतिशय वादग्रस्त स्पर्धक म्हणून ओळखली जाते. आता पर्यंत तिने घरातील सर्वच स्पर्धकांबरोबर भांडण केली आहेत. जय, मीरा आणि उत्कर्ष या तिघांची जोडी आणि त्यांचे खेळ आपण सर्वांनी पाहिलेच आहेत.

मिराने या दोघांबरोबर देखील भांडण केली आहेत. मात्र त्यांची भांडण कायम स्पर्धा खेळण्या पुरती मर्यादित असल्याचे दिसते. सध्या सोशल मीडियावर मीरा, जय आणि उत्कर्षाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं आहे. यामध्ये जय दुधाने हा गाणी गात मिराची खिल्ली उडवताना दिसत आहे. अशात सुरुवातीला तो मीरा कशा पद्धतीने तोंड वाकडं करुन बोलते हे करुन दाखवतो आणि तिच्यावर हासत म्हणतो की, “जे लोक सुरुवातीला आपल्यावर हसतात ना तेच नंतर असे टाळ्या वाजवत आपल्या समोर उभे राहतात.” पुढे उतकर्ष त्याच्यावर गाणं लिहिणार असं म्हणतो आणि, “मैं ऐसा क्यु हू” या गाण्याच्या गोळी गातो. आणि हेच गाणं पूर्ण करत तो म्हणतो की, “…. करता मुझसे मीरासे फरक…” यावर मीरा जयला उत्तर देत म्हणते की, “मी कायम तुझी तारीफ केली आहे. तू कसाही गायलास तरी.” मीराचे हे बोल जयसाठी कौतुक होते की टोमणे असा प्रश्न अनेांच्या मनात येत आहे. आज रात्री ९.३० वाजता पुन्हा एकदा मीरा जयवर चिढनार का? की ती त्याला माफ करणार हे समजणार आहे.

गेल्या आठवड्यात टास्क पूर्ण झाल्यानंतर सोनाली घरातून बाहेर पडली. त्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये आता फक्त ६ स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. अशात विशाल निकमने आधीच “तिकीट टू फिनाले” जिंकलेलं आहे. तर आता या आठवड्यात नेकमा कोणता स्पर्धक घराबाहेर पडनार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गेल्या आठवड्यात चावडीवर महेश मांजरेकर यांनी मीनलवर देखील खूप राग काढला. यावेळी मीनल ही पुरती रडकुंडीस आली होती. तर आता सोनाली नंतर घरामध्ये असलेल्या ५ सदस्यांमध्ये विकास पाटील, उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथ, मीनल शाह आणि जय दुधाणे हे स्पर्धक उरले आहेत. विशाल आधीच सेफ झाल्यामुळे आता कोणता स्पर्धक बाहेर पडणार?, कुणाला पहिला नंबर मिळणार?, याकडेच साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. अशात जयने मीराची खिल्ली उडवल्यामुळे पुढे काय होणार याचा देखील अनेक जण विचार करत आहेत.