महेश मांजरेकरांनी आविष्काराला बिगबॉसच्या घरातून बाहेर पडताना अनेक चांगल्या वाईट गोष्टीचा आढावा सांगितला. त्याने बिगबॉसच्या घरात केलेल्या गमती जमती ह्यावेळी पाहायला मिळाल्या तर स्नेहा वाघ सोबत वावरताना त्याची हळवी बाजू देखील पाहायला मिळाली. तो एक उत्तम खेळाडू नसेलही कदाचित पण तो माणूस म्ह्णून उत्तम आहे हे त्याच्या राहणीतून आणि त्याच्या विचारातून पाहायला मिळालं. जुईली या चित्रपटाच्या माध्यमातून अविष्कार दारव्हेकर याने मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले होते. ह्या गोजिरवण्या घरात, आभाळमाया, दामिनी, कुटुंब, देवाशपथ खोटं सांगेन खरं सांगणार नाही, ती आणी इतर, किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी अशा चित्रपट आणि मालिका तसेच नाटकांचा तो एक महत्वाचा भाग बनला होता. भूतनाथ या बालनाट्याची त्याने सिरीज काढून प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन केले.

आविष्काराला अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती त्याचे आजोबा देखील मोठे अभिनेते होते. कट्यार काळजात घुसली हे नाटक त्यांनी लिहून रंगभूमीवर आणलं होतं. याच नाटकावर आधारित कट्यार काळजात घुसली हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्यात आला होता. दिग्दर्शक आणि गीतकार म्हणूनही त्यांची ख्याती आहे. ‘रंजन कला मंदिर’ या नावाने त्यांनी स्वतःची नाट्यसंस्था उभारली होती. उपाशी राक्षस, मोरूचा मामा, पत्र्यांचा महल, आब्रा की डाब्रा , स्वर्गातील काळा बाजार, कट्यार काळजात घुसली या नाटकांची मेजवानी त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणली. तर अविष्कारचे वडील डॉ रंजन दारव्हेकर हे देखील नाट्यकर्मी म्हणून ओळखले जातात. हाअभिनयाचा वारसा त्यानेही जपला पण त्याच्या आयुष्यात वेगळंच काही घडत राहील मग अभिनयापासून तो हळूहळू दूर होत गेला. आविष्कार एक चांगला माणूस असल्याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे मुंबईत तो गरिबांसाठी पोटभर अन्न स्वतः बनवून देतो तो स्वतः मुंबईत एक हॉटेल चालवतो तेथे येणाऱ्या व्यक्तीकडे कमी पैसे असले तरी पोटभर खा पैश्याची काळीज करू नका मला पैश्यापेक्षा तुम्ही पोटभर जेवला ह्यात जास्त समाधान आहे असं तो बोलताना पाहायला मिळतो.

स्नेहा वाघ बद्दलच्या नात्याबद्दल बोलताना त्याने तिचा कधीही अपमान केलेला पाहायला मिळाला नाही उलट मुलींबद्दल आपल्या आईने नेहमी चांगलंच बोललं पाहिजे असे देखील म्हणताना पाहायला मिळाला. स्नेहा एक उत्तम अभिनेत्री आहे आणि माझं किंवा माझ्या घरच्यांनच नाव न लावता ती खूप यशस्वी झाली असल्याचंही तो बोलतो. समोरचा आक्रमक असला तरी आपण नम्रपणे वागत राहायच असं त्याच मत आहे आणि तो आपल्यामातेवर ठाम असल्याचंही त्याच्या वागण्यातून नेहमी पाहायला मिळालं. मराठी अभिनेता अविष्कार दारव्हेकरने बिगबॉसच्या घरात येऊन चांगला खेळ खेळला नाही तो येथे फक्त हिरो बनायला आलाय असं म्हणणाऱ्या प्रेक्षकांना काही दिवसांपूर्वी सोशिअल मीडियावर एक पोस्ट नुकतीच व्हायरल झाली होती त्यात आविष्काराच्या फोटोवर “मी बिगबॉसच्या घरात हिरो बनायला आलो नाही तर हिरो आहे म्हणून आलोय” असं लिहलेलं होत. आणि हे वाक्य तंतोतंत खर करून दाखवणारा तो सच्या माणूस असल्याचं देखील दिसून आलं.