काही दिवसांपूर्वी शिवलीला पाटील हिने आजारी असल्याचे कारण सांगून बिग बॉसच्या घरातून काढता पाय घेतला. तर दोन दिवसांपूर्वीच अभिनेता अक्षय वाघमारे हा बिग बॉसच्या घरातील सदस्य देखील बाहेर निघाला. या दोन्ही सदस्यांच्या अचानक एक्झिटमुळे प्रेक्षकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे मात्र या एक्झिटनंतर बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड द्वारे एन्ट्री घेऊन आलेला सदस्य अभिनेता आदीश वैद्य धुमाकूळ घालताना दिसत आहे. कालच्याच भागात तो जय दुधानेला चांगलाच खडसावताना दिसला.

आदीश जयला खडसावून म्हणतो की, “मला फालतू ऍटीट्युड द्यायचा नाही.. तुझी बॉडी बिडी काय असलं ते दुसऱ्याला दाखवायचं.. हा वाद सुरू असताना जय त्याच्याकडे धावून जातो त्यावर आदीश जयला सुनावतो की, इतक्या जवळ यायचं नाही, मला चालणार नाही”. त्यानंतर बिग बॉसला सूचित करतो की ” हा जर माझ्या जवळ आला ना तर मी जबाबदार नाही.. रुल्स गेले उडत..” आदिशच्या या डॅशिंग एंट्रीवर केवळ त्याच्या चाहत्यांनीच नव्हे तर जय, गायत्री, मीरा आणि स्नेहाच्या विरोधात असणाऱ्या तमाम प्रेक्षकांनी आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे आता आवाज चढवणाऱ्या जय, मीरा, गायत्री आणि स्नेहाची चांगलीच जिरणार असेच मत व्यक्त होताना दिसत आहे. वाईल्ड कार्डद्वारे बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणारा “आदिश वैद्य” नक्की आहे तरी कोण याबाबत अधिक जाणून घेऊयात….आदिश मराठी मालिका अभिनेता आहे. कुंकू टिकली आणि टॅट्टू ही त्याने अभिनित केलेली पहिली टीव्ही मालिका. पंचवीशीतला तरुण आणि देखणा चेहरा म्हणून आदीश मराठी मालिकेतून लोकप्रिय झाला होता. रात्रीस खेळ चाले या लोकप्रिय मालिकेतून तो महत्वाच्या भूमिकेत दिसला होता.

जिंदगी नॉट आउट, बॅरिस्टर बाबू, कुंकू टिकली आणि टॅट्टू, गुम है किसीं के प्यार में, नागीण या हिंदी तसेच मराठी मालिका त्याने अभिनित केल्या आहेत. गुम है किसीं के प्यार में या मालिकेतून त्याने मोहितचे पात्र साकारले होते त्याची ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. बिग बॉसच्या घरात येण्यासाठी काही दिवसांपूर्वीच त्याने या मालिकेतून एक्झिट घेतली होती. आदिश गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री “रेवती लेले” हिला डेट करत आहे. रेवती उत्कृष्ट नृत्यांगना असून या दोघांनी रात्रीस खेळ चाले, नागीण, जिंदगी नॉट आउट सारख्या मालिकेतून एकत्रित काम केले आहे. स्वामिनी या लोकप्रिय मराठी मालिकेत तिने रमाबाईंची भूमिका निभावली होती. या भूमिकेमुळे रेवतीला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. वर्तुळ,आपकी नजरों ने समझा अशा आणखी हिंदी मराठी मालिकेत तिने महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. रात्रीस खेळ चाले या मालिकेतून दोघांच्यात मैत्रीचे सूर जुळून आले होते त्यानंतर हे दोघेही एकमेकांना पसंत करू लागले. आदीश आणि रेवती दोघांचे एकत्रित असलेल्या व्हिडीओला त्यांच्या चाहत्यांकडून पसंती मिळताना दिसते. आदिशच्या एंट्रीने बिग बॉसच्या घरात आणखी काय काय धमाल घडून येणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.