बिग बॉसच्या घरात काल कॅप्टनसीचा टास्क खेळण्यात आला होता. त्यात मीनल शाहने ह्या सिजनचा शेवटचा कॅप्टन होण्याचा मान मिळवला. बिग बॉसच्या घरात आता काहीच सदस्य शिल्लक असल्याने ह्या आणि पुढच्या आठवड्यात दोन सदस्य नॉमीनेट होणार आहेत त्यानंतर घरातील अखेरचे पाच सदस्य फायनलिस्ट होणार आहेत. त्यात मीनल शाहने कॅप्टन बनल्याने पहिला फायनलिस्ट होण्याचा मान पटकावला आहे. उद्या रविवारी कुठला सदस्य घराबाहेर पडणार याची उत्सुकता आहे. मात्र त्याअगोदर मीरा जगन्नाथ सध्या प्रेक्षकांच्या प्रश्नाला उत्तर देता देता त्रस्त झाली आहे.

मीराचा एक जुना फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ह्या फोटोत मीराचे केस मुलांसारखे बारीक आहेत आणि त्यात तिने पॅन्ट शर्ट परिधान केला आहे. मीराचा हा फोटो खूप जुना आहे आणि सोशल मीडियावर तिने हा फोटो साधारण दोन वर्षांपूर्वी शेअर केला होता. त्या फोटोवरून मिराला नको ते प्रश्न विचारले जात आहेत. फोटोतली मीरा अगदी मुलाप्रमाणे दिसत असल्याने तू ट्रान्सजेंडर आहेस का? असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. ह्या प्रश्नाला नुकतेच तिने उत्तर दिले आहे. मीरा म्हणते की मी लोकांच्या प्रश्नाला उत्तर देऊन थकली आहे. असे नको प्रश्न विचारल्याने मी त्या कमेंट्स डिलीट करत आहे. मुळात मी ट्रान्सजेंडर नाही. आमच्या घरात मी लहानपणापासूनच मुलाप्रमाणे कपडे घालत होते. माझ्या जन्माच्या वेळी मुलगाच होणार असे आज्जीला वाटत होते. पण मुलगी झाली असली तरी त्यांज मिराला कायम मुलासारखंच ठेवलं होतं. अनेकजण मिराला मुलगाच समजायचे पण जेव्हा तो मूलगा नसून मुलगी असल्याचे कळायचे तेव्हा मिराचं खूप कौतुक करायचे. लहानपणीची मीरा आणि आताची मीरा यात खूप फरक आहे पण लोकांनी या गोष्टीचा खूप चुकीचा अर्थ घेतला आहे.

मला ट्रान्सजेंडर लोकांबद्दल खूप आदर आहे पण मी खरंच ट्रान्सजेंडर नाहीये. मला याबाबत कित्येक जणांच्या प्रतिक्रिया मिळाल्या. काहींना माझं म्हणणं पटलं पण काहींनी मला खूप वाईट कमेंट्स केल्या आहेत. त्यातल्या बऱ्याचशा अशा कमेंट्स मी डिलीट केल्या आहेत. मला पर्सनल मेसेजेस देखील पाठवण्यात आले ‘काय गरज होती असं करायला.? नाहीतरी तू मुलगाच असशील? ..तुझ्या आयुष्यात कोणी नाहीये?…ये ऑपरेशन का कमाल है…’अशा अनेक वाईट वाईट प्रतिक्रिया मला लोकांकडून मिळू लागल्या. याबाबत मी खूप विचार केला की मी लोकांना कसं समजावून सांगू, लोकांना जे समजायचंय ते समजू दे , मला नाही एक्सप्लेन करायचं. पण कुठे जाऊन पुन्हा असं वाटतं की जी रिऍलिटी आहे ती कळायला हवी तुम्हाला. कारण एखादी गोष्ट कोणापर्यंत पोहोचते तो ती दहा लोकांपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे मला ह्या गोष्टी आता नकोयेत म्हणूनच मी ही गोष्ट क्लिअर करते पहिल्यांदा की मी ट्रान्सजेंडर नाहीये….