बिग बॉसच्या घरात विजेता चित्रपटाच्या कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यावेळी पूजा सावंत आणि सुबोध भावे यांनी घरातील सदस्यांना वेगवेगळे टास्क देण्यात आले होते त्यानंतर सुशांत शेलार आणि माधव देवचक्के यांनी देखील बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली. त्यावेळी खेळीमेळीच्या वातावरणात दिलेले टास्क खेळण्यात आले होते. आज बिग बॉसच्या चावडीमध्ये कोणत्या सदस्याला बोलणी बसणार आणि कोणाची पाठ थोपटली जाणार हे लवकरच समजेल मात्र बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

या व्हिडीओ वरून उत्कर्ष आणि मीरा ट्रोल होताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या ह्या व्हिडिओत मीरा आणि उत्कर्ष एकाच बेडवर असलेले पाहायला मिळत आहेत. त्यात उत्कर्ष मिराचा हात हातात घेऊन गप्पा मारताना दिसत आहे. त्यांची ही हालचाल काही प्रेक्षकांना मात्र संशयास्पद वाटू लागली आहे. त्यामुळे मीरा आणि उत्कर्षचे वागणे मुळीच आवडले नसल्याची प्रतिक्रिया मिळताना दिसत आहे. ह्या व्हिडिओच्या सत्यतेबाबत अधिक माहिती अशी की, मीराला एका टास्क दरम्यान हाताला दुखापत झाली होती एरवी छोट्या छोट्या गोष्टींना आवाज चढवऱ्या मीराने यावेळी हात दुखतोय याचा कुठेही गाजावाजा केला नाही मात्र रात्री झोपताना तिचा हात खूप दुखू लागला होता. हे तिने उत्कर्षला सांगितले होते. उत्कर्ष आणि मीरा हे सुरुवातीपासूनच खूप चांगले मित्र बनले आहेत. टास्क खेळताना देखील हे सर्व सदस्य एकमेकांना धरून आपल्या टीमसाठी खेळलेले आहेत. तसेच उत्कर्ष डॉक्टर आहे आणि त्या हेतूने मिराने तिचा हात दुखत असल्याचे उत्कर्षला सांगितले होते. त्यानंतर उत्कर्षणे मिराचा हात दाबून दिला होता.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये देखील उत्कर्ष मिराचा हात दाबताना स्पष्ट दिसत आहे. मात्र ह्या गोष्टीवरून मीरा आणि उत्कर्ष यांच्यामध्ये काहीतरी असावे असा समज काही प्रेक्षकांनी करून घेतला आहे आणि त्याचमुळे मीरा आणि उत्कर्षवर टीका देखील करण्यात येत आहेत. याअगोदर बिग बॉसच्या घरात स्नेहा आणि जयच्या वागण्यावरून प्रेक्षकांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र स्नेहा वाघ जशी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली तसा जय प्रत्येक टास्कदरम्यान आरडाओरडा करण्यावर अधिक भर देताना दिसत आहे. दरम्यान उत्कर्षणे ह्या आठवड्यात दिलेले टास्क खूप चांगले खेळले होते त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी त्याचं कौतुक देखील केलं आहे. तो एक डॉक्टर आहे आणि तिने मिराच्या हाताला दाबून दिले एवढ्याच गोष्टीचा प्रेक्षकांनी वेगळा अर्थ काढू नये असे मत मीरा आणि उत्कर्षच्या चाहत्यांनी व्यक्त केलं आहे.