मराठी बिग बॉसच्या घरात रोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत नुकतेच आजच्या भागात कॅप्टनपदाच्या उमेदवाराला समर्थन देण्यासाठी उत्कर्षला एक गोष्ट गमवावी लागणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. बहुतेक करून असे म्हटले जात आहे की जयला कॅप्टन पदाचा दावेदार ठरवण्यासाठी उत्कर्षला एक गोष्ट गमवावी लागणार असल्याचे बिग बॉसने सांगितल्यावर त्यावर उत्कर्ष कुठला निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान तळ्यात असताना विशाल आणि विकास मैत्रीच्या नात्याने शिट्टी वाजवून सोनालीची मजा घेताना दिसले.

तर दुसरीकडे सोनाली आणि मीरामध्ये वाद झालेला पाहायला मिळाला त्यात मीरा आपला राग व्यक्त करताना दिसली. मीरा अशी का वागतीये असेही प्रेक्षकांनी तिच्याबाबत म्हटले आहे. बिग बॉसच्या घरात स्नेहा वाघ आणि जयची जवळीक प्रेक्षकांना नेहमी खटकते यावरून अनेकदा स्नेहा ट्रोल देखील झालेली पाहायला मिळाली. तर अनेकदा ह्यांच्यात काहीतरी शिजतय अशीही वक्तव्य पाहायला मिळाली. स्नेहा नेहमीच जय सोबत वेळ घालवत असते अगदी जेवताना देखील ती त्याच्याच सोबत असते असे म्हटले जाते. बिग बॉसच्या घरात स्नेहा नुकतीच या गिष्टी बाबत खुलासा करताना दिसली की ती जय सोबत नेहमी का जेवायला बसते?… स्नेहा ह्या गोष्टी सांगत होती त्यावेळी निथा आणि मीनल तिथे बसलेल्या असतात त्यांच्याजवळ जयबाबत बोलत असताना तिनं सांगितलं की, “मी जय बरोबर का बसते जेवायला माहितीये.. कारण मला एकटं जेवायला बसता येत नाही, हे रूल आमच्या पप्पांनी आम्हाला टाकून दिले आहेत “. स्नेहा असे स्पष्टीकरण देते त्यावेळी तिचे म्हणने मीनल आणि निथाला देखील पटलेले दिसले.

आजच्या भागात विशाल आणि जय यांच्यातील एकजण कॅप्टन बनणार असल्याचे दिसून येते हा दावेदार कोण ठरेल आणि नॉमिनेशन प्रक्रियेपासून कोण वाचेल हे पाहणे रंजक ठरणार आहे कारण यादरम्यान उत्कर्षला त्याची एक गोष्ट गमवावी लागणार आहे ही गोष्ट काय असेल? हा प्रश्न प्रेक्षकांसमोर उभा आहे. मात्र उत्कर्ष जी गोष्ट गमवणार आहे त्या गोष्टीमुळे जयला आपले अश्रू अनावर झालेले पाहायला मिळत आहेत. जयला सपोर्ट केल्यानंतर उत्कर्ष डायरेक्ट एलिमीनेट होणार का अशी चर्चा जोर धरताना दिसत आहे आणि त्याचमुळे जयला देखील रडू कोसळले असल्याचे म्हटले जात आहे याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी आजचा भाग पहावा लागेल. खेळातली आणि पुढील भागातली उत्कंठा टिकून राहण्यासाठी दरवेळी बिग बॉस मराठी सीजन ३ मध्ये नवनवे कटकारस्थान किंवा एकमेकांबद्दल चिडून ओरडून ह्यात रंग भरलेला पाहायला मिळतो. असो मराठी बिग बॉस ३च्या पुढील खेळासाठी जय दुधाने आणि अभिनेत्री स्नेहा वाघ हिला खूपखूप शुभेच्छा..