बिग बॉसच्या रविवारच्या भागात सिद्धार्थ जाधवने हजेरी लावली आहे. घरात एक टास्क खेळला जाणार आहे ज्यात सदस्यांवर कोर्टात उभं राहून त्यांच्यावर आरोप लावण्यात येणार आहेत. मीरा घरातील पुरुष सदस्यांवर आरोप लावताना दिसत आहे. विशाल, विकास, जय आणि उत्कर्ष हे चारही घरातील सदस्य एकत्र उभे असतात त्यावेळी मीरा त्यांना आठवण करून देते की ह्या घरात फक्त तुम्हीच नाही आहात तुम्ही एकमेकांसोबत लढायला नाही आलात इथे मुलीसुद्धा आहेत.

त्यावेळी जय तिला निर्लज्ज असल्याचे सांगतो. निर्लज्ज, खोटारडी हे असे वाईट शब्द मी नाही वापरत असे मीरा म्हणताच गायत्री महेश मांजरेकर यांना आठवण करून देते की ‘मीरा फक्त निर्लज्ज हा शब्द नाही वापरत ती डायरेक्ट शिव्या देते…’ गायत्रीच्या ह्या बोलण्यावर मीरा मात्र रडकुंडीला येते यावर आता मला काहीच बोलायचं नाही असे म्हणून ती गप्प राहणे पसंत करते गायत्री आणि मीरा यांच्यात अनेकदा वाद झाले आहेत त्यामुळे ह्या दोघी पुन्हा पहिल्यासारख्या एकत्रित पाहायला मिळत नाहीत. जय, उत्कर्ष आणि मीरा यांचे विचार आपल्याला पटत नाहीत त्यामुळे ए टीमला सोडून गायत्रीने बी टीम सोबत राहणे पसंत केले आहे. अनेकदा गायत्रीने मिराला कानपिचक्या देत तिला अडवलं देखील आहे त्यामुळे ह्या दोघींमधली मैत्रीची दरी अधिकच रुंदावत चालली आहे. दरम्यान विशालला एका प्रेक्षकाकडून चुगली येते की मीनल सोनालीला बोलते की विशाल कोणत्याही गोष्टीवर एक्सट्रा रिऍक्शन देतो आणि ते कुठेतरी कॅमेऱ्यासाठी असतं….यावर विशाल मिनलला स्पष्टीकरण देतो की ‘उलट हे सगळं तूच कॅमेऱ्यासाठी करत असशील कारण तू रिऍलिटी शो करून आलीयेस . आपलं तसं काहीच नसत जे मनात असतं तेच तोंडात असतं माझ्याबद्दल हा तुझा खुप मोठा गैरसमज आहे…’

मिनलच्या वागण्यावरून विशाल आणि मीनलमध्ये नुकतेच वाद झाले आहेत त्यावेळी महेश मांजरेकर यांनी मिनलचं बोलणं थांबवून तिच्यावर राग व्यक्त केला होता. आजच्या भागात घरातील कोणता सदस्य एलिमीनेट होईल याची उत्सुकता तमाम प्रेक्षकांना लागून राहिली आहे. गेल्या आठवड्यात मीरा घराबाहेर जाणार होती पण तिला सेफ करण्यात आलं होतं त्यावरून प्रेक्षकांनी मात्र नाराजी व्यक्त केली होती. मिराला सगळ्या सदस्यांपेक्षा खूप कमी मतं मिळाली होती तरी देखील तिला सेफ करून बिग बॉसने चूक केली अस अनेकांचं म्हणणं आहे. ह्या आठवड्यात मात्र मीरा घराबाहेर जायला हवी अशीही मागणी प्रेक्षकांनी केली आहे. मीरा, उत्कर्ष, जय हे ए टीम चे सदस्य कायम आरडाओरडा करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळेच त्यांना नेहमीच सेफ केलं जातं असे आरोप प्रेक्षकांनी लावले आहेत.