बिग बॉसच्या चावडीवर मीरा आणि गायत्रीची जंगी भांडण गायत्रीच्या बोचऱ्या शब्दांनी मीरा झाली भावुक

बिग बॉसच्या घरामध्ये महेश मांजरेकर दर शनिवारी घरातील सदस्यांना चावडीवर भेटतात. इथे आल्या नंतर ते प्रत्येक सदस्याला त्याने टास्क खेळताना केलेल्या चुका सांगतात. तसेच चांगले खेळलेल्या स्पर्धकांचे कौतुक करतात. महेश मांजरेकर यांचा ओरडा नेमका कुणाला भेटणार हे पाहण्याची उत्सुकता सर्वच प्रेक्षकांना असते. अशात आता इथे मीरा आणि गायत्रीमध्ये चांगलीच भांडणे झाली आहेत. नुकतेच कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

यामध्ये पहिल्या दिवसापासून एकमेकांच्या सख्या मैत्रिणी असलेल्या मीरा आणि गायत्री आता पक्क्या वैरी झालेल्या दिसल्या. मीराचं असं म्हणणं आहे की, गायत्री ही कृतघ्न मुलगी आहे. त्यामुळे ती गायत्रीला म्हणते की, “मी तुला सपोर्ट केला होता. तू देखील मला सपोर्ट केला होता. तर या गोष्टीची थोडी जाणीव ठेवायची होतीस.” यावर पुढे गायत्री मीराला राग येईल अशा पद्धतीने “हो ग थँक यू”, असं म्हणते. यावर पुढे मीरा चिढते आणि तिला म्हणते की, “हे बंद कर आधी” मग काय गायत्रीचा पारा आणखीनच वाढतो, आणि ती मीरावर खूप मोठ्या आवाजात, रागात ओरडते. ओरडताना ती म्हणते की, “तू नाही सांगायचं मला मी काय करायचं ते.” हा सर्व प्रकार महेश मांजरेकर यांच्या समोर होतो. मीरा या भांडणामुळे खूप भावुक होते आणि रडू लागते. आपली एवढी चांगली मैत्रीण आपल्या बद्दल असं काही बोलत आहे हे तिला सहन होतं नाही. बिग बॉसच्या घरामध्ये मीरा आणि गायत्री या दोघींची जोडी त्यांच्या मैत्रीमुळे नेहमी चर्चेत असायची. आता देखील या दोघी चर्चेत असतात मात्र आता त्यांच्या चर्चेत असण्याचे कारण मैत्री नसून भांडण आहे.

गेल्या काही दिवसंपासून या दोघींमध्ये वाद होऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांचे चाहते देखील चिंतेत आहेत. आता तुम्हाला देखील या दोघींच्या भांडणात पुढे काय होणार आहे हे पाहायचं असेल तर, जंगी भांडणाचा हा एपिसोड आज रात्री ९.३० वाजता कलर्स मराठीवर दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच मीराचा आणि उत्कर्ष यांच्या एक व्हिडिओमुळे मोठा गैरसमज पसरला होता. त्या व्हिडिओच्या सत्यतेबाबत अधिक माहिती अशी की, मीराला एका टास्क दरम्यान हाताला दुखापत झाली होती एरवी छोट्या छोट्या गोष्टींना आवाज चढवऱ्या मीराने यावेळी हात दुखतोय याचा कुठेही गाजावाजा केला नाही मात्र रात्री झोपताना तिचा हात खूप दुखू लागला होता. हे तिने उत्कर्षला सांगितले होते. उत्कर्ष आणि मीरा हे सुरुवातीपासूनच खूप चांगले मित्र बनले आहेत. टास्क खेळताना देखील हे सर्व सदस्य एकमेकांना धरून आपल्या टीमसाठी खेळलेले आहेत. तसेच उत्कर्ष डॉक्टर आहे आणि त्या हेतूने मिराने तिचा हात दुखत असल्याचे उत्कर्षला सांगितले होते. त्यानंतर उत्कर्षणे मिराचा हात दाबून दिला होता.