जिच्या केवळ हसण्यावरून महाराष्ट्रातला प्रेक्षक तिला ओळखतो ती म्हणजे गायत्री दातार. एलिमीनेट झाल्यानंतर काल बिग बॉसच्या घरातून गायत्री दातारला बाहेर पडावे लागले होते. बिग बॉसच्या घरातील प्रवास तिच्यासाठी खूपच सुखद होता असे ती म्हणते. ८४ दिवसाच्या प्रवासात मी जो काही अनुभव घेतला आहे तो मी आयुष्यात कधीही विसणार नाही. सुरुवातीला मी मिराच्या मागे राहून खेळते अशी प्रतीक्रिया तिला मिळाली होती मात्र मी स्वतः दिलेले टास्क माझ्या हिमतीवर खेळले होते. महेश मांजरेकर यांनी देखील माझ्यासाठी ‘गुबुगुबु’ हा शब्द वापरला होता मात्र कालांतराने त्यांनी तो शब्द मागे घेतला.

असे असले तरी घरातील इतर सदस्य देखील मला त्याच शब्दाची सतत आठवण करून द्यायचे. संचालक असताना मीरा आणि माझ्यात जो वाद झाला त्यानंतर आमच्यातली मैत्री आणखीनच दूर होत गेली. ती ज्या प्रकारे माझ्याकडे ओरडत आणि आणि ज्या टोनमध्ये माझ्याशी ती बोलत होती त्यावरून ती जर मला तिची मैत्रीण मानत असेल तर त्यावेळी तिने मला एकदा तरी सॉरी म्हणणं अपेक्षित होतं. पण शेवटपर्यंत ती मला सॉरी बोललेली नाही म्हणून मग मी अशा माणसांसोबत कुठेतरी रिलेशन नाही ठेवायचं असा मी निर्णय घेतला. त्यानंतर मी ए टीम सोडून बी टीममध्ये गेले. मात्र मी बी टीममधील सदस्यांसोबत फक्त मैत्री केली होती आणि जेव्हा टास्क खेळण्याची वेळ होती त्यावेळी मी वैयक्तिक पातळीवर खेळत होते. आमच्यात जे वाद होते ते केवळ खेळापूरते होते असं गायत्री आवर्जून सांगताना दिसते. घरातून बाहेर पडताना शेवटच्या क्षणी देखील मीरा आणि गायत्री यांच्यात वाद झाले होते. पण गायत्री जेव्हा महेश मांजरेकर यांच्यासोबत मंचावर बसली होती त्यावेळी तिने मिराला खूप छान खेळ असं म्हटलं होतं. ‘मी आता घराच्या बाहेर पडली आहे.

त्यामुळे आपली मैत्री आता पहिल्यासारखी तशीच आहे आणि तू खूप छान खेळ, जय तू सुद्धा खूप छान खेळ’…गायत्रीने आपली मैत्री तशीच टिकवून ठेवली असल्याचे पाहून मीरा आणि जय देखील खूपच खुश झाले होते. या ८४ दिवसाच्या प्रवासात घरातील कोणते सदस्य खूप चांगले खेळले किंवा रिअल वाटले याबद्दल बोलताना गायत्री म्हणते की एवढे दिवस कोणीच कॅमेऱ्यासाठी खेळणार नाहीत दिवसातले २४ तास ते कॅमेऱ्यासमोर असतात त्यामुळे तिथे कोणीच ठरवून ऍक्टिंग करू शकत नाही. ह्या घरात विशाल आणि मीनल खूप छान खेळले होते त्यांचा एवढ्या दिवसांचा ग्राफ देखील चढतच गेलेला पाहायला मिळतो आणि आजपर्यंत ते खूप फेअर खेळले आहेत. विशाल खूप चांगला माणूस आहे आणि मीनल एकदम बिनधास्त आणि स्पोर्टी आहे. या दोघांनी शेवटचा टास्क देखील खूप छान खेळला होता त्यामुळे हे दोघे फायनल २ होतील असंही मत गायत्रीने व्यक्त केलं आहे.