
बिग बॉस मराठी ३ हे पर्व चांगलंच गाजलेलं पाहायला मिळालंकीर्तनकार शिवलीलापाटील यांनी आजारपणाच नाटक सांगून या खेळातून काढता पाय घेतला. त्या बाहेर पडल्याच्या नंतर त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या वारकरी संप्रदायांनी त्यांना माफी मागायला सांगितली होती. त्या वेळेस बिग बॉस ३ चांगलंच चर्चेत आलं होत नंतर विशाल निकम आणि सोनाली पाटील यांच्या प्रेमाची देखील चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. स्नेहा वाघ आणि जय दुधाने यांची देखील अशीच चर्चा रंगली होती. अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिला बाहेर जाता जाता एक गोड आठवण मिळाली तिचा आणि तिच्या आई वडिलांमधील दुरावा निघून गेला.

तर काही चांगलं काही वाईट घडत गेलं यालाच तर खेळ म्हणतात असं म्हणत प्रेषक बिगबॉस आवडीने बघायला लागले. ऐकून १७ स्पर्धकातील एक एक बाहेर पडत गेला आणि शेवटी ५ स्पर्धकात कोण विजेता घोषित होणार असा प्रेक्षकांना प्रश्न पडलेला. २६ डिसेबर या तारखेला महाअंतिम सोहळा पार पडला अख्या महाराष्ट्राला उत्सुकता होती कि नेमका कोण विजेता होणार. शेवटी पाच स्पर्धक फायनल मध्ये पाहायला मिळाले जय दुधाने ,मीनल शहा ,विशाल निकम ,उत्कर्ष शिंदे ,विकास पाटील हे टॉप पाच फायनॅलिस्ट पाहायला मिळाले यात मीनल ने सगळ्यात आधी तिकीट मिळवल्याने सगळ्यांना वाटायचं कि मीनल हीच विजेती होणार आणि शेवटी मीनल,विकास उत्कर्ष हे घरा बाहेर पडले मग जय दुधाने आणि विशाल निकम यांच्यात एक निवडण्यात आला तो होता विशाल निकम तर जय दुधाने हा दुसरा विजेता ठरला. प्रथम विजेत्याला २० लाख रुपये आणि ट्रॉफी हे बक्षीस देण्यात आलं. बिगबॉसच्या घरातून बाहेर आल्या नंतर विशाल निकम सांगतो घरात १०० दिवस काढले तेंव्हा आई वडिलांना मी भेटायला बोलावलं होत. माझे वडील शिकलेले नाहीत त्यात आम्ही गरीब घराण्यातील गावाकडील वारकरी संप्रदायातील आहोत.

त्यामुळे मी जिंकलो ह्याचा त्यांना खूप आनंद झाला. मी जिंकण्यामागे त्यांचाच आशीर्वाद आणि देवाचे आभार मानेन असं म्हणत त्याने सौंदर्याचा देखील विषय काढला. आई वडील भेटायला आले होते तेव्हा सौंदर्या हे नाव घेतलं होतं पण तिचं नाव वेगळं आहे ते मी योग्य वेळ आल्यावर नक्की सांगेन. मी ज्या मुलीवर प्रेम करतो त्या मुलीचं वेगळ्या पद्धतीने नामकरण केलं. सोनालीच आणि माझं नाव जोडलं गेलं होत आमच्यात फक्त मैत्री होती. माझं बिगबॉसच्या घरात येण्याआधीच माझं सौंदर्यावर प्रेम होत आणि वेळ आल्यावर नक्कीच मी तीच नाव सांगेल. सध्या आमच्यात काही गैरसमज निर्माण झाले आहेत ते मिटले कि मी तिचं नाव नक्की सांगेण. तिचं प्रेम नसलं तरी माझं तिच्यावर मनापासून प्रेम आहे, होत आणि कायम राहीण असं तो म्हणाला. मी जिंकलो हे समजल्यावर तिने मला फोन करून माझं अभिनंदन देखील केलं शिवाय काँग्रॅड्युलेशन असा मॅसेज देखील केला होता. त्यावेळी मी खूपच खुश झालो. आम्ही दोघे एकमेकांना भेटल्यावर आमच्यातील ज्या बिघडलेल्या गोष्टी आणि गैरसमज आहेत ते दूर झाल्यावर हि सौंदर्या नक्की कोण ह्याचा खुलासा मी सर्वांसमोर करणार आहे.