बिग बॉसच्या घरात गेल्यावर चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या केल्या जातात. मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा विजेता ठरलेला विशाल निकम देखील याच कारणामुळे चर्चेत आला होता. बिग बॉसच्या घरात असताना विशाल निकमने त्याची गर्लफ्रेंड सौंदर्याचे नाव घेतले होते.बिग बॉसच्या घरात मीडियाला आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी देखील मीडियाच्या माध्यमातून काही रिपोर्टर्सनि त्याला सौंदर्या बद्दल विचारले होते. त्यावेळी योग्य वेळी मी तिला तुमच्यासमोर आणेल आणि तुम्हाला लग्नाला देखील बोलवू असे विशालने म्हटले होते. मात्र बिग बॉसचा शो संपल्यावरही त्याला सौंदर्याबद्दल नेहमीच विचारण्यात आले.

सौंदर्याचे नाव मी लवकरच जाहीर करेन आणि तिला तुमच्यासमोर आणेल परंतु आमच्यात काही दिवसांपूर्वी थोडा दुरावा निर्माण झाला आहे. आमच्यात काही मतभेद झाल्याने तिची मी अगोदर भेट घेणार आहे. मी विजेता झालो हे तिला कळताच तिने मला अभिनंदनाचा मेसेज केला होता. मी अजून तिला प्रत्यक्षात भेटलो नाही. तिची भेट घेऊन मी नक्कीच तिची समजूत काढणार आहे आणि योग्य वेळी तुमच्यासमोर आणणार आहे असे त्याने मीडियाला स्पष्टीकरण दिले होते. परंतु असे असले तरी विशालची सौंदर्या कधीच कोणासमोर आली नाही त्यामुळे विशालने ही काल्पनिक कथा रंगवून चर्चेत राहण्याचा प्रयत्न केल्याचे अनेकांचे म्हणणे होते. नुकतेच विशालला पुन्हा सौंदर्या बाबत विचारण्यात आले मात्र यावेळी त्याने सौंदर्यासोबत ब्रेकअप झाल्याचे जाहीर केले आहे. ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत विशालला सौंदर्याबद्दल पुन्हा एकदा विचारण्यात आले. त्यावेळी विशाल म्हणतो की, ‘सौंदर्या माझी गर्लफ्रेंड होती मात्र आता आमच्यात ब्रेकअप झालं आहे. बऱ्याच जणांना वाटेल की मी खोटं बोलत आहे पण हे अगदी खरं आहे की सौंदर्या माझी गर्लफ्रेंड होती.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून मी आमचे नाते सुरळीत व्हावे म्हणून प्रयत्नात होतो मात्र या काळात बऱ्याच गोष्टी बदलल्या. आमच्यातल नातं आता संपुष्टात आलं आहे पण मी कुठेही गेलो तरी मला सौंदर्याबद्दल विचारले जाते मात्र आता आमच्यात ब्रेकअप झालं आहे हे मला जाहीर करावंच लागेल. मला याची पूर्ण कल्पना आहे की माझ्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही मात्र जे सत्य आहे ते सर्वांच्या समोर आलेच पाहिजे. मागच्या सर्व गोष्टी विसरून आता मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या आयुष्यात या गोष्टी खरोखरच खूप कठीण ठरल्या पण पुढे चालत राहण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे.’ या खुलश्यावर विशाल निकमने आता स्वतःच सौंदर्यासोबत ब्रेकअप झाल्याचे सांगून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. ह्यामुळे हा विषय आता संपला असं त्याने जाहीर केलं.